साबरमती आश्रमातून आजच्याच दिवशी १२ मार्च १९३० ला इतिहासप्रसिद्ध दांडी यात्रा निघाली होती. अहमदाबादच्या साबरमती आश्रमातून सुरू झालेल्या या यात्रेचा उद्देश ब्रिटिशांनी लागू केलेला मिठाचा कायदा मोडून काढणे हा होता. यात्रेची सुरुवात झाली, त्या दिवसाला आज ९४ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त आयोजित ‘आश्रमभूमी वंदना’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले.

या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी १२०० कोटी रुपयांच्या आश्रम प्रकल्पाची पायाभरणी केली. त्यासह त्यांनी साबरमतीतील कोचरब आश्रमाचेदेखील उद्घाटन केले. २०२१ मध्ये या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी गांधीवाद्यांकडून सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. मात्र, आज पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली आहे. आश्रमाचे नूतनीकरण का केले जात आहे? १२०० कोटींच्या या प्रकल्पात नेमके काय? आश्रमात काय बदल होतील? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

trees cut, Metro-3,
मेट्रो-३ प्रकल्पासाठी तोडलेल्या झाडांच्या पुनर्रोपणाचे प्रकरण : कामातील प्रामाणिकपणावर उच्च न्यायालयाच्या विशेष समितीचे बोट
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
mumbai, chembur, govandi, Redevelopment project, cheat case, builder paras dedhia , Three Months Imprisonment, Contempt of Court, crime, marathi news,
चेंबूरगोवंडीतील पुनर्विकास प्रकल्पांमधील अनेकांच्या फसवणुकीचा आरोप, विकासकाला अटक

१२०० कोटींच्या मास्टरप्लॅनमध्ये नेमके काय?

अहमदाबादमधील बिमल पटेल यांच्या नेतृत्वाखालील एचसीपी डिझाईन, प्लॅनिंग अॅण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड (एचसीपीडीपीएम) कंपनीने हा मास्टरप्लॅन तयार केला आहे. साबरमती नदीकाठी १२० एकरांवर पसरलेल्या मूळ आश्रमातील ६३ पैकी अर्ध्या इमारतींचे नूतनीकरण, संवर्धन व पुनर्विकासाचा यात समावेश आहे. त्यातील ३६ इमारतींचे नूतनीकरण केले जाणार आहे.

एचसीपीडीपीएम कंपनीने हा मास्टरप्लॅन तयार केला आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

सध्याचा साबरमती आश्रम मूळ जागेपैकी केवळ पाच एकर क्षेत्रात आहे. त्याचे व्यवस्थापन साबरमती आश्रम प्रिझर्व्हेशन ॲण्ड मेमोरियल ट्रस्ट (एसएपीएमटी)द्वारे केले जाते. नवीन स्मारक ५५ एकरांत असेल; नवीन आश्रमाचा परिसर ३२२ एकर इतका प्रचंड असणार आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सध्याच्या गांधी आश्रमाला भेट दिल्यावर तो पाहण्यासाठी केवळ एक तासाचा अवधी लागतो; मात्र प्रकल्प पूर्ण झाल्यावर संपूर्ण आश्रम पाहण्यासाठी किमान सहा ते सात तास लागतील.

मास्टरप्लॅननुसार, २० इमारतींचे संवर्धन केले जाईल; ज्यात हृदय कुंज, महात्मा गांधी आणि कस्तुरबा यांचे निवासस्थान, दिवंगत चार्ल्स कोरिया यांनी डिझाइन केलेले १९६३ मध्ये उघडण्यात आलेले गांधी स्मारक संग्रहालय, अतिथीगृह नंदिनी निवास, गांधीवादी संस्थापक ईश्वरभाई पटेल यांचा मुलगा जयेश पटेल आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदी पटेल यांचे जावई चालवत असलेले मानव साधना, विनोबा-मीरा कुटीर, जय जगत ॲम्फीथिएटर आणि जुनू रसोडू (जुने स्वयंपाकघर) यांचा समावेश आहे.

यात १३ इमारतींचा जीर्णोद्धार होणार आहे; ज्यात दोन गोशाळा, सरदार वल्लभभाई पटेल यांचे कार्यालय आणि दस ओरडी (दहा खोल्या) यांचा समावेश आहे. या मास्टरप्लॅनमध्ये तीन इमारतींचा पुनर्विकास होणार आहे; ज्यात देहला पुनी केंद्र (कापूस गाठी ठेवण्याची जागा), सात ओर्डी (सात खोल्या) आणि आनंद भवन संघालय यांचा समावेश आहे.

साबरमती येथील गांधी आश्रमाचे ऐतिहासिक महत्त्व

१८९३ ते १९१४ दरम्यान महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या समुदायासाठी डरबानमधील फिनिक्स सेटलमेंट आणि जोहान्सबर्गमधील टॉल्स्टॉय फार्म येथे दोन आश्रम स्थापन केले. जानेवारी १९१५ मध्ये ते भारतात परतले. अहमदाबादच्या सीईपीटी विद्यापीठातील माजी प्राध्यापक नीलकंठ छाया यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘गांधीज प्लेसेस : ॲन आर्किटेक्चरल डॉक्युमेंटेशन’ या पुस्तकात महात्मा गांधीजींच्या आश्रमांबद्दल लिहिले आहे. या पुस्तकात अहमदाबादचे वास्तुविशारद रियाझ तय्यबजी आणि गांधीवादी अभ्यासक त्रिदीप सुहृद यांनी सह-लेखन केले आहे.

साबरमती आश्रमाची रचना गांधीजींनी स्वतः केली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

गांधीजींनी १९१५ मध्ये अहमदाबादमधील कोचरबमध्ये पहिले आश्रम स्थापन केले. “ही आधीपासूनच बांधलेली जागा होती, जी आश्रमाला वापरण्यासाठी भाड्याने देण्यात आली. या जागेची रचना आणि बांधणी गांधीजींच्या स्वतःच्या कल्पनांनुसार नव्हती”, असे छाया यांनी लिहिले. अशाप्रकारे १९१७ मध्ये, गांधींनी साबरमती येथे आश्रमाची स्थापना केली. साबरमती नदीच्या पश्चिम तीरावर गांधीजींनी वास्तव्य केले, असा हा चौथा आश्रम होता. हे स्थान जुना वडज गावाच्या उत्तरेला, चंद्रभागा नदीच्या पलीकडे असल्याचे छाया यांनी आपल्या पुस्तकात लिहिले.

गांधीजींच्या आयुष्यात साबरमती आश्रमाचे महत्त्व अनन्यसाधारण असे होते. या जागेची रचना गांधीजींनी स्वतः केली होती. हा आश्रम स्थानिक साहित्याच्या माध्यमातून उभारण्यात आला. त्यांनी या आश्रमात सर्वाधिक वेळ व्यतीत केला. साबरमती आश्रम भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील मुख्य केंद्र होते. स्वतंत्र लढ्यातील आठ चळवळींची सुरुवात या आश्रमातूनच झाली. १२ मार्च १९३० रोजी गांधीजींनी येथून दांडी यात्रेची सुरुवात केली. याव्यतिरिक्त त्यांनी चंपारण सत्याग्रह (१९१७), अहमदाबाद गिरणी संप आणि खेडा सत्याग्रह (१९१८), खादी चळवळ (१९१८), रौलेट कायदा आणि खिलाफत चळवळ (१९१९) आणि असहकार चळवळ (१९२०) ची सुरुवात गांधींनी साबरमती आश्रमात राहत असताना केली.

पुनर्विकास प्रकल्प काय असेल?

मास्टरप्लॅननुसार, पुनर्विकसित स्मारक आणि परिसरात समुपदेशन केंद्र, विद्वानांसाठी निवासस्थान, पार्किंग क्षेत्र, पाणी साठवण्यासाठी तलाव, जुन्या गोष्टींची दुकाने, प्रदर्शन क्षेत्र, कॅफेटेरिया, कार्यशाळा क्षेत्र आणि एक भव्य प्रवेशद्वार असणार आहे.

आश्रमाचा पुनर्विकास आणि जीर्णोद्धार ‘एसएपीएमटी’ने तयार केलेल्या २०० पानांच्या संकल्पनेवर आधारित आहे. २०० पानांचे हे दस्तावेज आश्रमातील पुस्तकांचा अभ्यास करून आणि गेल्या १० वर्षांत या आश्रमाला भेट दिलेल्या लोकांना आश्रमात नक्की काय हवे आहे, याचा अभ्यास करून तयार करण्यात आले आहे. २०० पानांच्या या संकल्पनेमध्ये आश्रमाच्या आवारातील प्रत्येक इमारत कशी असावी, याची थोडक्यात माहिती देण्यात आली आहे.

साबरमती आश्रम भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील मुख्य केंद्र होते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

आश्रम परिसरात समुपदेशन केंद्र तयार केले जाणार आहे. ही संकल्पना आश्रमाला भेट दिलेल्या शैक्षणिक संस्थांनी सुचवली आहे. १९६३ पासून आश्रमाला भेट देणार्‍या नागरिकांसाठी एक पुस्तक ठेवले जाते, ज्यात लोक आश्रमाबद्दल व्यक्त होतात आणि अनेक बदल सुचवतात. आश्रमाला भेट दिलेल्या यादीत राणी एलिझाबेथ (१९६१), दलाई लामा (१९८४-८५), माजी आयरिश अध्यक्ष मेरी रॉबिन्सन (१९९३), दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्षा नेल्सन मंडेला (१९९५) आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन (२००१) यांच्याही नावाचा समावेश आहे.

पुनर्विकास झाल्यानंतर अस्तित्वात असलेल्या इमारतींचे काय?

सध्याच्या इमारतींमध्ये प्रदर्शनांचे आयोजन केले जाईल. यात भारत आणि परदेशातील गांधींच्या कार्यांवरील प्रदर्शने आयोजित करून, त्यांच्या यात्रांचे वर्णन, त्यांची दैनंदिन दिनचर्या, त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा या प्रदर्शनांमध्ये घेण्यात येईल. यात १९३० पूर्वी गांधी आणि कस्तुरबा यांचे वास्तव्य असताना आश्रमाला भेट दिलेल्या महत्त्वाच्या व्यक्तींची आणि गांधी यांच्या प्रमुख सहकार्‍यांची माहितीही दिली जाईल. मुख्य आश्रमात १९१७ ते १९५१ या काळातील महिला नेत्यांचे दालनदेखील असेल. एका इमारतीत चरखा आणि खादी उत्पादन केंद्र असेल. “गांधीजींचा वारसा” नावाने असलेल्या एका विभागामध्ये गांधींना मिळालेली हस्तलिखिते, सन्मान, टपाल विभागाशी केलेली देवाणघेवाण, जर्नल्स आणि ग्रंथ असतील.

या प्रकल्पांतर्गत आश्रमवासी म्हटल्या जाणाऱ्या आश्रम परिसरातील २६३ पैकी किमान २६१ रहिवाशांची व्यवस्था अन्यत्र करण्यात आली आहे आणि त्यांना नुकसानभरपाई देण्यात आली आहे. आश्रम परिसरात राहणाऱ्या लोकांच्या पुनर्वसनासाठी एकूण ३७५ कोटी रुपये भरपाई देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

नवीन इमारतींमध्ये काय असणार?

दुतर्फा असलेल्या जमीनींना एकत्र आणण्यासाठी सर्वात जुना असलेला आश्रम रोड बंद केला जाईल. याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू होईल आणि पर्यायी रस्ता प्रवाशांसाठी खुला केला जाईल. नवीन इमारतींमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय कार्यालये, बैठक खोल्या, पेपर तयार करण्याच्या कार्यशाळेसाठी जागा, चामडे तयार करण्यासाठी जागा, गांधीवादी इतिहास, व्याख्याने व चर्चासत्रांसह इतर सार्वजनिक सुविधा असतील.

नवीन जागांमध्ये आश्रमाला भेट देणार्‍या लोकांना गांधीजींच्या दैनंदिन दिनचर्येची झलक दिसेल, असे गुजरात सरकारने एका नोटमध्ये म्हटले आहे. “चरखा, हाताने तयार केलेले कापड आणि कागदाचे उत्पादन यांसारख्या उपक्रमांवरील कार्यशाळेसाठीदेखील आश्रमात विशिष्ट जागा असेल. यातून आश्रमाला भेट देणार्‍यांना गांधीजींनी अंगीकारलेल्या स्वदेशी आणि शाश्वत राहील या मूल्यांची नव्याने ओळख होईल.

आश्रमात साधेपणा आणि पावित्र्य टिकवून ठेवण्याचा प्रयत्न

२०२१ मध्ये जेव्हा या प्रकल्पाची घोषणा करण्यात आली, तेव्हा आश्रम “गांधी थीम पार्क”मध्ये बदलेल अशी टीका करण्यात आली होती. इतिहास पुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही सरकारवर करण्यात आला होता. गुजरात सरकारने त्यावेळी आश्रमाच्या विश्वस्तांना आश्वासन दिले होते की, आश्रमाचे सरकारीकरण होणार नाही. गांधी आश्रमाचं पावित्र्य, साधेपणा, आणि गांधींजींच्या तत्त्वांचे कायमच पालन केले जाईल. ‘एसएपीएमटी’ने देशभरातील इतर गांधीवादी संस्थांशी सल्लामसलत करून तयार केलेल्या २०० पानांच्या संकल्पनेत गांधींचे आचरण आणि त्यांनी जपलेला साधेपणा राखला जावा, तसेच आश्रमाला भेट देणार्‍यांकडून किंवा रहिवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, यावर भर देण्यात आला आहे.

हेही वाचा : ऑस्करचं बारसं झालं तरी कसं?

“त्या काळातील कोणत्याही संरचनांना स्पर्श केला जाणार नाही,” असे प्रकल्पांशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले आहे. त्यांनी असेही सांगितले की, विकास प्रकल्पात कोणतेही स्टील, सिमेंट आणि काँक्रीट वापरले जाणार नाही. त्याऐवजी यात चुना प्लास्टर, टेराकोटा फरशा आणि वलसाडी सागवान यांसारख्या स्थानिक सामग्रीचा वापर करण्यात येईल. गुजरात सरकारने म्हटले आहे की, “आश्रमाचा साधेपणा टिकून राहील याची काळजी घेत, नवीन दृष्टिकोनासह आश्रमाला नवीन रूप देण्यात येईल. अत्यंत काळजीपूर्वक हा प्रकल्प हाताळला जाईल. आश्रमाच्या सुशोभीकरणामुळे आश्रमाला भेट देणार्‍या लोकांना प्रसन्नता आणि रम्य शांततेची अनुभूती होईल”, असे गुजरात सरकारने म्हटले आहे.