सध्या अभिनेता शाहरुख खानच्या डंकी या चित्रपटाची देशभरात चर्चा होत आहे. भारतातील पंजाब तसेच अन्य राज्यांतून कॅनडा, अमेरिका यासारख्या देशांत अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न केला जातो. डंकी या चित्रपटात याच अवैध स्थलांतरावर भाष्य करण्यात आलेले आहे. पंजाबी समाजमाध्यमांवर एकदा नजर टाकली तर अवैध मार्गाने अमेरिकेत जाण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मार्गांचे अनेक व्हिडीओ मिळतील. अशा अवैध मार्गांना ‘डाँकी रुट’ म्हटले जाते. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेला जाण्यासाठी पंजाब तसेच अन्य राज्यांतील तरूण नेमकं काय करतात? अवैध पद्धतीने अमेरिके जाणे कितीधोकादायक असू शकते? मानवी तस्करीचे हे जाळे नेमके कसे पसरलेले आहे? यावर टाकलेली ही नजर….

अवैध प्रवासाची माहिती देणारे अनेक व्हिडीओ उपलब्ध

भारतातील पंजाब तसेच पाकिस्तानातून अमेरिकेत जाण्यासाठी कोणकोणते अवैध मार्ग आहेत, याची माहिती देणारे बरेच व्हिडीओ समाजमाध्यमांवर उपलब्ध आहेत. पनामा जंगलातून करावयाच्या प्रवासाचीही माहिती या व्हिडीओंमध्ये आहे. खरं म्हणजे या व्हिडीओंच्या माध्यमातून अशा प्रकारे अवैध पद्धतीने अमेरिकेत जाण्यासाठी प्रयत्न करू नका, असे सांगितले जाते. अवैध मार्गाने परदेशात जाण्यापेक्षा तुमच्या स्वत:च्या देशातच काम शोधा असा संदेश या व्हिडीओंतून देण्याचा प्रयत्न केला जातो. या व्हिडीओंना पाहिल्यानंतर अवैध मार्गाने केलेला अमेरिका प्रवास किती धोकादायक ठरू शकतो, याची कल्पना येते.

How long will America fix cotton rates in India Farmer leader Vijay Javandhias question to PM Narendra
मोदींना शेतकरी नेत्याचा सवाल; म्हणाले, “किती काळ अमेरिका दर…”
ola uber pune ban marathi news
पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
Agreli
जपानच्या चलनाचा कच्चा माल पुरवतो हिमालयाच्या कुशीतला ‘हा’ देश!
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे

अमेरिकेत जाण्यासाठी डाँकी मार्गाची मदत

बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे काय हाल होतात, त्यांना कशा प्रकारे त्रास दिला जातो. त्यांचा मृत्यू कसा होतो, याची माहिती समाजमाध्यमांवरील काही व्हिडीओंच्या माध्यमातून मिळते. मात्र तरीदेखील भविष्य सुखकर व्हावे यासाठी सर्व धोके पत्कारून स्वप्न साकार करण्यासाठी तरुण बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. डाँकी मार्गाचा (डाँकी रुट) वापर अगोदर पंजाब आणि हरियाणा या राज्यांतील लोकांकडून केला जात होता. मात्र गुजरातमध्येही डाँकी मार्गाचे आकर्षण वाढले आहे.

डाँकी मार्ग, डाँकी प्रवासी म्हणजे काय?

शाहरुख खानचा डंकी हा चित्रपट येत्या २१ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अशाच प्रकारच्या स्थलांतरितांवर आधारित आहे. शाहरुख खानने दुबईतील एका कार्यक्रमात बोलताना डंकी या शब्दाचा अर्थ सांगितला. स्वत:च्या देशातून बेकायदेशीरपणे बाहेर पडून अन्य देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करणे यालाच ‘डंकी’ म्हणतात, असे शाहरुखने सांगितले. अशा प्रकारच्या प्रवाशांना ‘डाँकी प्रवासी’ म्हटले जाते.

पहिला थांबा -लॅटिन अमेरिका

अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करायचा असेल तर अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. या डाँकी मार्गातील पहिला थांबा म्हणजे लॅटीन अमेरिकन देश. इक्वेडोर, बोलिव्हिया, गयाना यासारखे देश भारतीयांना येण्यासाठी व्हिसा (व्हिसा ऑन अरायव्हल) देतात. ब्राझील, व्हेनेझुएला यासारखे देश भारतीय नागरिकांना पर्यटक व्हिसा देतात. बेकायदेशीरपणे अमेरिकेत घेऊन जाणाऱ्या एजंन्टचे कोणत्या देशातील मानवी तस्करांशी संबंध आहेत, त्यानुसार डाँकी मार्ग निश्चित केला जातो. अमेरिकेत जाण्यासाठी लॅटीन अमेरिकन देशांत जाणे पुरेसे नाही. या देशांत जाण्यासाठीदेखील कित्येक महिने लागतात. त्यानंतर पुढचा प्रवास आणखी खडतर असतो.

थेट मेक्सिकोत जाणे तुलनेने धोकादायक

याच प्रवासाबाबत आठ महिन्यांत पंजाबहून अमेरिकेत जाणाऱ्या एका व्यक्तीने प्रतिक्रिया दिली. “मला आमच्या एजंन्टने साधारण अर्धा महिना मुंबईत ठेवल होते. ब्राझीलहून संदेश येण्याची मी वाट पाहतोय असे मला सांगण्यात आले होते,” असे या तरुणाने सांगितले. काही एजंन्ट थेट मेक्सिकोला जाण्यासाठी दुबईतून व्हिसा मिळवून देतात. मात्र थेट मेक्सिकोत जाणे हे तुलनेने धोकादायक समजले जाते. कारण मेक्सिकोत गेल्यानंतर तेथील स्थानिक प्रशासन अटक करण्याची शक्यता असते. त्यामुळे बहुतांश एजंन्ट त्यांच्या ग्राहकांना लॅटिन अमेरिकन देशांत उतरवतात. त्यानंतर ते ग्राहकांना कोलंबियात घेऊन जातात. एखादा देश अमेरिकेच्या जेवढा जवळ, तेवढेच त्या देशाचा व्हिसा मिळणे कठीण असते.

धोकादायक जंगलातून प्रवास

एकदा कोलंबिया येथे पोहोचल्यानंतर नंतरचा प्रवास हा पनामा या जंगलातून होतो. या प्रवासात स्थलांतरितांना ‘डॅरिएन गॅप’ या भागातून जावे लागते. डॅरिएन गॅप दोन देशांदरम्यान असलेला घनदाट जंगलाचा प्रदेश आहे. या जंगलात स्वच्छ पाण्याचा अभाव असतो, हिंस्र प्राणी असतात. विशेष म्हणजे या जंगलात गुन्हेगारी टोळ्यादेखील असतात. डॅरिएन गॅपमधून जाणाऱ्या स्थलांतरितांना या सर्व संकटांचा सामना करावा लागतो. अनेकदा स्थलांतरितांना लुटले जाते. अनेकांवर बलात्कार होतो. या प्रदेशात झालेल्या गुन्ह्यांची कोठेही नोंद नसते. त्यामुळे असे गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा मिळण्याची शक्यता कमीच असते. असे असूनही सर्वकाही सुरळीत राहिल्यास या जंगलातील प्रवास हा साधारण आठ ते दहा दिवसांचा असतो. या प्रवासादरम्यान स्थलांतरितांचा दुर्दैवाने मृत्यू झालाच तर अंत्यसंस्कारासाठी त्याला परत त्याच्या मूळ गावी घेऊन जाण्याची कुठलीही सोय नसते.

मृतदेह भारतात आणण्यासाठी सनी देओलची मदत

पमाना जंगलातून निघालेल्या स्थलांतरितांना नंतर ग्वाटेमाला येथे आणले जाते. ग्वाटेमालात स्थलांतरितांना नव्या मानवी तस्करांकडे सोपवले जाते. त्यानंतर अमेरिकेत जाण्यासाठी हे स्थलांतरित मॉस्कोमध्ये प्रवेश करतात. येथे खरा लपाछपीचा खेळ सुरू होतो. कारण या भागात सरकारी यंत्रणा सतर्क असतात. या सरकारी यंत्रणांच्या नजरेत न येण्यासाठी स्थलांतरितांना मोठी मेहनत घ्यावी लागते. २०२३ साली म्हणजेच चालू वर्षात २६ वर्षीय गुरपाल सिंग नावाच्या तरुणाचा मेक्सिकोत बस अपघातात मृत्यू झाला होता. खरं म्हणजे या तरुणासह अनेकांना मेक्सिकन पोलिसांनी अडवले होते. या पोलिसांपासून सुटका व्हावी यासाठी गुरुपालसह अन्य स्थलांतरित बसमध्ये बसून पळून जात होते. मात्र दुर्दैवाने बसचा अपघात झाला होता. याच अपघातात गुरपालचा मृत्यू झाला होता. अपघात झाला त्यावेळी हा तरुण त्याच्या बहिणीशी बोलत होता. या तरुणाच्या कुटुंबीयांना त्याच्या मृत्यूची माहिती नंतर आठवड्याभराने देण्यात आली. भाजपाचे गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांनी गुरपालचा मृतदेह भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले होते.

जंगलापासून सुटका पण संकटं कायम

पनामा जंगलातील प्रवास टाळायचा असेल तर स्थलांतरित आणखी एका मार्गाचा अवलंब करतात. हा मार्ग कोलंबियातील सॅन अँड्रेसपासून सुरू होतो. मात्र हा मार्ग म्हणावा तेवढा सुरक्षित नाही. सॅन अँड्रेसपासून स्थलांतरित बोटीने मध्य अमेरिकेतील निकारगुआ येथे उतरतात. हा प्रवास मासेमारी करणाऱ्या बोटींतून होतो. या बोटी सॅन अँड्रेसपासून साधारण १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या फिशरमॅन्स के वर जातात. त्यानंतर फिशरमॅन्स के या ठिकाणाहून स्थलांतरितांना अन्य बोटीत बसवून मेक्सिकोकडे नेले जाते.

अमेरिकेच्या सीमेवर काय घडतं?

मेक्सिको आणि अमेरिका या दोन देशांत ३१४० किमी लांबीची सीमा आहे. या सीमेवर काटेरी कुंपण आहे. या कुंपणावरून उडी मारून स्थलांतरितांना अमेरिकेत प्रवेश करावा लागतो. अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी अनेकजण धोकादायक असलेल्या रिओ ग्रँड या नदीतून प्रवास करतात. ही सीमा ओलांडताना फारसे कष्ट घ्यावे लागत नाहीत. मात्र सीमा ओलांडल्यानंतर स्थलांतरितांना अमेरिकेतील पोलीस ताब्यात घेतात. अशा स्थलांतरितांना छावण्यांमध्ये ठेवले जाते. ताब्यात घेतलेल्या अशा स्थलांतरितांना अमेरिकेत आश्रय द्यायचा की त्यांच्यासोबत नेमके काय करायचे? याचा निर्णय नंतर अमेरिकन सरकारकडून घेतला जातो.

वेगळा अन् सुरक्षित मार्ग

अमेरिकेत बेकायदेशीरपणे जाण्यासाठी सध्या नव्या मार्गाचा वापर केला जातो. या नव्या मार्गात अनेक स्थलांतरित अगोदर युरोपमध्ये जातात. त्यानंतर युरोपहून थेट मेक्सिकोत जातात. या मार्गाबाबत अमेरिकेत पोहोचण्यासाठी ९ देशांतून प्रवास केलेल्या एका स्थलांतरिताने प्रतिक्रिया दिली. “हा प्रवास पूर्णपणे एजंन्टच्या ओळखीवर अवलंबून आहे. युरोप-मेक्सिको या मार्गाकडे जेव्हा यंत्रणांचे लक्ष जाईल तेव्हा स्थलांतरित आपल्या जुन्याच मार्गाने अमेरिकेत येण्यास प्राधान्य देतील,” असे या स्थलांतरिताने सांगितले.

बेकायदेशीर प्रवास धोकादायक आणि खर्चिक

अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेश करायचा असेल तर हा डाँकी मार्ग फारच खर्चिक असतो. एका प्रवासादरम्यान साधारण १५ ते ४० लाख रुपये मोजावे लागतात. मात्र कधी-कधी तर अशा प्रकारे अवैध प्रवासासाठी ७० लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. काही एजंन्ट्स अधिक पैशांच्या बदल्यात कमी अडचणीच्या प्रवासाचे आश्वासन देतात.

“…तर माझा खून केला असता”

भारतात असलेल्या काही एजंन्ट्सचे अमेरिकेतील मानव तस्करांशी लागेबांधे आहेत. त्यामुळे भारतीय एजंन्ट अमेरिकेतील मानव तस्करांना पैसे देऊ न शकल्यास स्थलांतरितांच्या जीवाला धोका निर्माण होतो. बेकायदेशीरपणे अमेरिकेत जाणाऱ्या तरुण-तरुणींचे कुटुंबीय डाँकी मार्गाने जाण्यासाठी लागणारे पैसे टप्प्याटप्प्याने देतात. अमेरिकेत गेलेल्या अशाच एका ट्रक ड्रायव्हरने या व्यवहाराबाबत माहिती दिली आहे. “मी माझी फीस तीन टप्प्यांत दिली आहे. प्रवास सुरू होण्याआधी मी पहिल्या टप्प्यातील पैसे दिले होते. त्यानंतर अमेरिकेच्या सीमेवर आल्यानंतर मी दुसऱ्या टप्प्यातील पैसे दिले. माझे पालक हे पैसे देऊ शकले नसते तर मानव तस्करांनी कदाचित माझा खून केला असता,” असे या ट्रक ड्रायव्हरने सांगितले.