केंद्र सरकारने उसाचा रस किंवा साखरेच्या पाकापासून थेट इथेनॉल निर्मिती करण्यावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे इथेनॉल निर्मितीवर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे इथेनॉल निर्मितीवर काय परिणाम होणार आहेत. त्याचा आढावा…

इथेनॉलबाबत केंद्राचा नेमका निर्णय काय?

केंद्र सरकारने सात डिसेंबर रोजी उसाचा रस किंवा साखरेच्या पाकापासून थेट इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. साखर कारखान्यांच्या दबावानंतर १५ डिसेंबर रोजी बंदी मागे घेऊन देशातील इथेनॉल निर्मितीची क्षमता असलेल्या कारखान्यांना उसाचा रस किंवा साखरेच्या पाकापासून इथेनॉल निर्मितीचा कोटा ठरवून दिला, जो मागील वर्षाच्या फक्त २५ टक्के आहे. केंद्र सरकार १५ जानेवारी रोजी देशातील साखर उत्पादनाचा आढावा घेऊन कोटा वाढविण्यासंदर्भात निर्णय घेणार आहे. सध्या केंद्राने कारखानानिहाय ठरवून दिलेला कोटा एप्रिलअखेरपर्यंतचा आहे. राज्याचा विचार करता, केंद्राने १५ डिसेंबर रोजी देशातील सर्व कारखान्यांना १७ लाख टन साखरेपासून इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली. पण निर्बंध येण्यापूर्वीच साखरेचा वापर इथेनॉल निर्मितीसाठी करण्यात आला होता. उर्वरित ८.५ लाख टनांपैकी २५ टक्के म्हणजे २.१ लाख टन साखरेपासून एप्रिलअखेरपर्यंत इथेनॉलनिर्मिती करता येणार आहे.

bombay share market, sesex, nifty
भू-राजकीय तणाव वाढण्याच्या भीतीने ‘सेन्सेक्स’ची ४५६ अंश गाळण
Efforts to encroach on flamingo habitat for construction projects in Navi Mumbai
नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?
mumbai, KEM Hospital, Artificial Insemination Center, Project Stalled, Election Code of Conduct, child, Infertility, husband wife, couple for Artificial Insemination, mumbai KEM Hospital,
मुंबई : ‘केईएम’च्या कृत्रिम गर्भधारणा केंद्राला आचारसंहितेचा फटका
crisis on sugar industry 3000 crore hit due to restrictions on ethanol production
साखर उद्योगावर संकट; इथेनॉलनिर्मितीवरील निर्बंधांमुळे तीन हजार कोटींचा फटका

हेही वाचा – कर्नाटकमध्ये दुकानाच्या पाट्यांवरून वाद का होतोय? जाणून घ्या सविस्तर!

इथेनॉल उत्पादनावर किती परिणाम?

यंदा उसाच्या गळीत हंगामापूर्वी ७६६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादनाचा अंदाज होता. पण, निर्बंधांमुळे ७६६ कोटी लिटर इथेनॉल उत्पादन होण्याची शक्यता नाही. २०१८-१९ मध्ये ३५५, २०१९-२० मध्ये ४२७, २०२०-२१ मध्ये ५२०, २०२१-२२ मध्ये ६०८, २०२२-२३ मध्ये ७१८ आणि २०२३-२४ मध्ये हंगाम सुरू होण्यापूर्वी ७६६ लाख इथेनॉल निर्मितीचा अंदाज होता. पण अंदाजाइतके उत्पादन शक्य नाही. इथेनॉल पुरवठा वर्ष नोव्हेंबर ते ऑक्टोबर असे असते. त्यात नोव्हेंबर ते जानेवारी पहिली तिमाही, फेब्रुवारी ते एप्रिल दुसरी तिमाही, मे ते जुलै तिसरी तिमाही आणि ऑगस्ट ते ऑक्टोबर चौथी तिमाही, असे नियोजन असते. सध्या कारखानानिहाय दिलेला कोटा एप्रिलअखेरपर्यंतचा आहे. त्यानंतरचा कोटा पुन्हा ठरवून दिला जाणार आहे. १५ जानेवारी रोजी पहिली आढावा बैठक होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुन्हा आढावा घेऊन कोटा निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे चालू इथेनॉल वर्षात किती इथेनॉल निर्मिती होईल, याचा अंदाज येत नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनाही केंद्राचा आदेश?

पेट्रोलियम कंपन्यांनी इथेनॉल पुरवठा वर्षासाठी (नोव्हेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४) ८२५ कोटी लिटरची निविदा प्रसिद्ध केली होती. त्यापैकी एप्रिल २०२४ पर्यंत ५६२ कोटी लिटरचा पुरवठा करण्याचे करार साखर कारखान्यांनी केले आहेत. पण, १५ डिसेंबरच्या निर्देशानंतर ५६२ कोटी लिटरचा पुरवठा करणे शक्य दिसत नाही. त्याबाबतची सूचना केंद्राने पेट्रोलियम कंपन्यांना दिली आहे. त्यानुसार पेट्रोलियम कंपन्यांनीही आपल्या नियोजनात बदल केला आहे. कंपन्यांना अपेक्षित इथेनॉल मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

यंदाचे १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्य होणार?

देशाने पेट्रोलमध्ये १२.५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट २०२३ मध्ये साध्य केले आहे. सन २०२४ मध्ये पेट्रोलमध्ये १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. पण, इथेनॉल उत्पादनावरील निर्बंधांनंतर हे उद्दिष्ट गाठणे शक्य दिसत नाही. सन २०२०-२१ मध्ये ४०८ कोटी लिटर इथेनॉलनिर्मिती, तर १०.०२ टक्के मिश्रण पातळी गाठली होती. सन २०२२-२३ मध्ये इथेनॉल उत्पादन ७१८ कोटी लिटरवर गेले होते, तर मिश्रण पातळी १२.५ टक्क्यांवर गेली होती. सन २०२४ मधील १५ टक्के मिश्रण पातळी गाठण्याचे उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता दिसत नाही. सन २०२५ पर्यंत मिश्रण पातळी २५ टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी इथेनॉल उत्पादन क्षमता १७०० कोटी लिटरपर्यंत वाढविण्याची गरज आहे.

हेही वाचा – विश्लेषण : भारताकडून जागतिक पतमानांकन संस्थांच्या कार्यपद्धतीवर टीका का?

देशाची इथेनॉल निर्मितिक्षमता किती?

देशाची इथेनॉल निर्मितीक्षमता १,२४४ कोटी लिटरवर पोहोचली आहे. सन २०१४ मध्ये देशाची इथेनॉल निर्मितीक्षमता २१५ कोटी लिटर होती. मागील नऊ वर्षांत ती ८११ कोटी लिटरने वाढली आहे. देशात धान्य आधारित इथेनॉल निर्मिती प्रकल्पांची उत्पादन क्षमता २०१३ मध्ये २०६ कोटी लिटर होती, ती आता ४३३ कोटी लिटरवर गेली आहे. बाकी इथेनॉल साखर कारखान्यांकडून उत्पादित केले जाते. आता देशाची एकूण इथेनॉल निर्मितीक्षमता १२४४ कोटी लिटरवर गेली आहे. सन २०१३-१४ मध्ये तेल कंपन्यांना ३८ कोटी लिटर इथेनॉल पुरवठा करण्यात आला होता. मिश्रण पातळी १.५३ टक्के होती. २०२०-२१ पर्यंत इथेनॉल उत्पादन, पुरवठा आठ पटींनी वाढला आहे. २०२०-२१ मध्ये ४०८ कोटी लिटर इथेनॉल निर्मिती, तर १०.०२ टक्के मिश्रण पातळी गाठली होती. अकरा जूनपर्यंत २०२३ इथेनॉल उत्पादन ३१० कोटी लिटरवर आणि मिश्रण पातळी ११.७० टक्क्यांवर गेली आहे. २०२५ पर्यंत मिश्रण पातळी २५ टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचे उद्दिष्ट असून, त्यासाठी इथेनॉल उत्पादन क्षमता १७०० कोटी लिटरपर्यंत वाढविण्याची गरज आहे.

साखर कारखान्यांची भूमिका काय?

देशाची एकूण इथेनॉल निर्मितीक्षमता १,२४४ कोटी लिटरवर पोहोचली आहे, धान्य आधारित इथेनॉल निर्मितीक्षमता ४३३ कोटी लिटर आहे. म्हणजे देशातील साखर कारखान्यांची सुमारे ८०० कोटी लिटर इथेनॉल निर्मितीक्षमता आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशाला एका वर्षाला सुमारे २८० लाख टन साखर लागते. तितकी साखर देशात सहजपणे निर्मित होऊ शकते. देशाचे साखर उत्पादन ३४० लाख टनांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. पुढील वर्षीसाठी ६० लाख टनांचा संरक्षित साठाही होऊ शकतो. देशातून साखर निर्यातीला बंदी असल्यामुळे देशात पुढील हंगामातील साखर तयार होईपर्यंत साखर पुरेल, अशी सध्याची स्थिती आहे. शिवाय पावसाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात चांगला पाऊस झाल्यामुळे साखर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ जानेवारीच्या आढावा बैठकीत दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे, असे वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी म्हटले आहे.

dattatray.jadhav@expressindia.com