सुप्रसिद्ध अजमेर दर्ग्याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी अजमेर शरीफ दर्गा या श्रद्धेय सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याच्या सर्वेक्षणाची मागणी केली. अजमेर येथील एका न्यायालयाने बुधवारी (२७ नोव्हेंबर) ही याचिका मान्य केली. या ठिकाणी शिवाचे प्राचीन मंदिर असल्याचा पुरावा असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. न्यायालयाने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) व अजमेर दर्गा समितीला नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी २० डिसेंबरला होणार असल्याचे सांगितले आहे. गुप्ता यांनी यापूर्वी मथुरा वादात बालकृष्णाच्या वतीने खटला दाखल केला होता. २०१६ च्या अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या यशासाठी त्यांनी हवनदेखील केले होते. कोण आहेत विष्णू गुप्ता? त्यांनी नक्की काय दावा केला आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

विष्णू गुप्ता कोण आहेत आणि हिंदू सेना काय आहे?

गुप्ता यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील एटा येथे झाला आणि ते तरुण वयात दिल्लीला गेले. त्यांच्यावर हिंदू राष्ट्रवादाचा प्रभाव होता आणि ते शिवसेनेच्या युवा शाखेत विद्यार्थी म्हणून सामील झाले. २००८ मध्ये गुप्ता बजरंग दलाचा भाग झाले. २०११ मध्ये गुप्ता आणि इतर काहींनी हिंदू सेनेची स्थापना केली. या संघटनेचा दावा आहे की, त्यांच्याकडे आता लाखभर सदस्य आहेत आणि त्यांच्या शाखा भारताच्या जवळजवळ सर्व भागांत आहेत. गुप्ता किंवा त्यांची संघटना शिवसेना, संघ परिवार किंवा त्यांच्याशी संबंधित कोणत्याही संघटनेशी संलग्न नाही. आपल्या संकेतस्थळावर हिंदू सेनेने म्हटले आहे की, कोणत्याही स्वरूपात इस्लामीकरण, शरिया कायद्याची अंमलबजावणी, लव्ह जिहाद, इस्लामिक अतिरेक्यांना भारतात विरोध करणे आणि भारताच्या सार्वभौमत्वाला व सनातन धर्माला हानी पोहोचवणाऱ्या संस्था/व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई करणे, हे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : नॉनव्हेज आहार, मानसिक छळ आणि एअर इंडियाच्या वैमानिक तरुणीची आत्महत्या; नेमकं प्रकरण काय?

हिंदू सेनेने आतापर्यंत कोणकोणत्या कारवाया केल्या आहेत?

  • जानेवारी २०१४ मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या तैनातीमध्ये जनमत चाचणी घेण्यात यावी, या तत्कालीन आप नेते प्रशांत भूषण यांच्या सूचनेनंतर गाझियाबादमधील कौशांबी येथील आम आदमी पक्षाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती.
  • फेब्रुवारी २०१४ मध्ये २००७ च्या अजमेर दर्गा, मक्का मस्जिद आणि समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटांप्रकरणी तुरुंगात असलेल्या स्वामी असीमानंद यांच्यावरील अहवालानंतर हिंदू सेनेने ‘द कारवां’ मासिकाच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. त्यानंतर असीमानंद यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.
  • ऑक्टोबर २०१५ मध्ये गुप्ता यांना दिल्ली पोलिसांनी केरळ हाऊस कॅन्टीनमध्ये गोमांस दिले जात असल्याची खोटी तक्रार केल्याबद्दल ताब्यात घेतले होते. केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी पोलिसांच्या छाप्याचा ‘अत्यंत आक्षेपार्ह’ म्हणून निषेध केल्याने वाद निर्माण झाला होता.
  • जानेवारी २०१६ मध्ये गुप्ता यांच्या संघटनेच्या सदस्यांनी नवी दिल्लीतील पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ऑगस्ट २०१६ मध्ये या संघटनेने तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या पाकिस्तान दौऱ्याचा निषेध केला होता.
  • मे २०१६ मध्ये गुप्ता आणि हिंदू सेनेने त्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी हवनाचे आयोजन केले होते. त्यानंतर गुप्ता यांनी ट्रम्प यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमही आयोजित केले आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये त्यांचा विजय झाला. व्हाईट हाऊससाठी डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याविरोधातही त्यांनी निदर्शने केली होती.
  • मे २०१९ मध्ये हिंदू सेनेने अभिनेता-राजकारणी कमल हसन यांच्याविरोधात दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला ‘हिंदू दहशतवादी’ म्हणून संबोधून धार्मिक भावना दुखावल्याबद्दल तक्रार दाखल केली.
  • जून २०२३ मध्ये हिंदू सेनेने ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आणि त्याला सार्वजनिक प्रदर्शनासाठी प्रमाणित न करण्याची मागणी केली.

हेही वाचा : इंटरनेटवर धमाल उडवून देणारं ‘Chill Guy’ मीम काय आहे? नेटिझन्समध्ये याची इतकी चर्चा का?

  • या वर्षी जानेवारीमध्ये हिंदू सेनेने दिल्लीच्या बाबर रोडवरील साइन बोर्डवर ‘अयोध्या मार्ग’ असे स्टिकर्स चिकटवले.
  • फेब्रुवारीमध्ये गुप्ता यांनी दावा केला होता की, कृष्ण जन्मभूमी प्रकरणातून माघार न घेतल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देणारे पत्र त्यांना मिळाले होते.
  • गेल्या काही वर्षांत गुप्ता यांच्या संघटनेने पाकिस्तानमधील ‘बलुचिस्तान स्वातंत्र्यलढ्याला’ पाठिंबा दिला आहे आणि बांगलादेशात हिंदूंविरोधात होणाऱ्या अत्याचाराविरोधात निषेध केला आहे.

Story img Loader