भीषण उष्णतेच्या समस्येला तोंड देणाऱ्या बिहारमध्ये शुक्रवारी (२० मे २०२२ रोजी) अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. वादळी वारे, मेघगर्जनेसहीत बिहारमधील अनेक भागांमध्ये पाऊस पडला. काही तासांच्या या पावसामुळे मोठं नुकसान झालं असून वीज पडल्याने तसेच वादळी पावसाच्या तडाख्याने १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झालाय. बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदतची घोषणा केलीय. मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलंय. बिहारमधील या आस्मानी संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही खेद व्यक्त करतानाच, मदतीचं आश्वासन दिलं आहे. वीज पडून मरण पावणाऱ्यांची भारतातील आकडेवारी फार मोठी आहे. दरवर्षी शेकडो लोक अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे प्राण गमावतात. मात्र वीज पडते म्हणजे नेमकं काय होतं, यासंदर्भात काही काळजी घेता येते का?, असं काही घडल्यास काय करावं यासंदर्भात अनेकांना माहिती नसते. त्यावर टाकलेली ही नजर…

दरवर्षी वीज कोसळ्याने शेकडो लोक आपला जीव गमावतात. एनसीआरबीच्या अहवालानुसार नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी एक तृतीयांश मृत्यू वीज कोसळल्यामुळे झाले आहेत. बर्‍याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. विशेष म्हणजे भारत सरकारने आणि बर्‍याच राज्यांनी विजेच्या कोसळण्याला आपत्ती मानलेले नाही.

land reforms
UPSC-MPSC : भारतातील जमीन सुधारणा अपयशी का ठरल्या? त्यामागची नेमकी कारणे काय होती?
Smartphone
‘डेटा’ग्रस्त समाज.. : समाजभानाचं हरपणं..
Tea and Weight Gain
रोज १ कप चहा प्यायल्याने खरंच वजन वाढतं का? पोषणतज्ज्ञांनी सोडवला वाद
Declaration of self-reliance and policy of import dependence
घोषणा आत्मनिर्भतेच्या आणि धोरण आयातनिर्भरतेचे

नेमकी आकडेवारी किती?
२०२० मध्ये ३१ डिसेंबर रोजी भारतात विजेच्या घटनांशी संबंधित एक अहवाल सादर झाला होता. हवामान खात्यासह काम करणारी संस्था हवामान रेझिलेंट ऑब्झर्झिंग सिस्टम प्रमोशन कौन्सिल (सीआरओपीसी) यांनी सांगितले की, १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० दरम्यान विजेच्या घटनेमुळे १,७७१ लोक मरण पावले. उत्तर प्रदेशात सर्वाधिक मृत्यू २९३, मध्य प्रदेश २४८, बिहार २२१, ओडिशा २०० आणि झारखंड येथे १७२ आहेत. या पाच राज्यात एकूण मृत्यूंपैकी ६०% पेक्षा जास्त नोंद झाली आहे. २०१९  मधील अपघातांमधील मृत्यूंशी संबंधित अहवालात असे दिसून आले आहे की त्या वर्षात एकूण २,८७६ लोक मरण पावले होते.

वीज कशी निर्माण होते?
पावसाळ्याच्या सुरूवातीला उन्हाळ्यात जमिनीजवळची तापलेली गरम हवा आकाशात वर वर जाते. या हवेत काही धुळीचे कणही असतात. हवा जशी जास्त वर जाते तशी ती वरच्या थंड वातावरणामुळे गार-गार होत जाते. तिचे नंतर छोटय़ा छोटय़ा बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. हे लहान लहान बर्फाचे कण एकमेकांवर आपटतात व वरतीच तरंगत रहातात. हे कण एकमेकांवर घासले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स (Electric Charge differance) तयार होतो. अधिक घनभार (Positive Charge) हा ढगांच्या वरच्या बाजूला ओढला जातो किंवा तयार होतो व ऋणभार (Negative Charge) हा ढगांच्या खालच्या बाजूला स्थिरावतो किंवा खालच्या बाजूला तयार होतो. जसे जसे हे घनभारित व ऋण भारित ढग जमिनीवरून वाहू लागतात, तसे तसे जमीन व त्यावरील झाडे व उंच इमारती यांच्यात घनभार (Positive Charge) तयार होतो. हा भारांचा फरक (Differance Between the charges) वाढत जातो, तसा तसा ढग व जमीन यांच्यामध्ये विद्युत प्रवाह वाहू लागतो. (Electrical current begins to move) विद्युत प्रवाह (Electrical current) हा वाहण्यासाठी नेहमी जवळचा मार्ग शोधतो जेव्हा तो आपला मार्ग पूर्ण करतो. (When it completes the circuit it releases the Energy in the form of light) तेव्हा ही एनर्जी प्रकाशाच्या रुपात मुक्त होते व आपल्याला वीज कडाडताना दिसते. विजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो, कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असल्यामुळे विजेचा प्रकाश आधी दिसतो व नंतर आवाज ऐकू येतो

वीजेत नेमकी किती ऊर्जा असते?
आपण ढगांमधील गडगडाट पाहू शकतो आणि त्यात कोणतेही नुकसान होत नाही. मात्र ढगांवरून वीज जमीनीवर आल्यावर मोठे नुकसान करते. वीज कोसळताना पृथ्वीवर प्रचंड प्रमाणात ऊर्जा असलेला एक छोटासाच भाग खाली येतो. एकदा वीज कोसळल्याने कित्येक दशलक्ष वॅट्स ऊर्जा निर्माण होते. यामुळे आसपासचे तापमान १०,००० अंशांपासून ३०,००० अंशांपर्यंत वाढू शकते.

वीजमुळे मृत्यू कसा होता?
आकाशात निर्माण होणाऱ्या वीजेचा झटका लागून अनेकजण मरण पावल्याचं आपण बातम्यांमध्ये वाचतो. मूळात वीज जमीनीवर पडल्यावर त्यामधील प्रवाहामुळे लोकांचा मृत्यू होतो. वीज अनेक मार्गांनी खाली पडू शकते. थेट संपर्क इतका नसला तरी तो सर्वात प्राणघातक मानला जातो. जर एखाद्या व्यक्तीवर थेट वीज कोसळली तर तो डिस्चार्ज चॅनेलचा भाग बनतो. बहुतेक वेळा थेट संपर्क मोकळ्या जागेत होतो. अशा परिस्थितीत ती व्यक्ती त्या विजेसाठी शॉर्ट सर्किट म्हणून काम करते. जेव्हा ती व्यक्ती वीज कोसळलेल्या भागापासून एक किंवा दोन फूट अंतरावर असते तेव्हा हा प्रकार घडतो. याचा सर्वात जास्त प्रभाव झाडाखाली आश्रय घेणाऱ्या लोकांवर होतो.

झाडाखाली धोका अधिक…
झाडांखाली आश्रय घेणाऱ्यांवर वीज पडण्याचा धोका जास्त असतो. या घटनेला ‘साइड फ्लॅश’ म्हणतात. वीजेचा काही भाग पीडित व्यक्तीच्या जवळच्या एखाद्या लांब वस्तूवर पडतो आणि तेव्हा त्यातून ती वीज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचते. भारतातील एकूण मृत्यूंपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे झाडाखाली किंवा जवळ उभे असणाऱ्यांचे झाले आहेत.

ग्राउंड करंट
ग्राउंड करंट हा दुसरा मार्ग आहे. वीज कोसळते त्या ठिकाणच्या भागात तिचा प्रवाह पसरतो. अमेरिकेच्या वेदर सर्व्हिसच्या म्हणण्यानुसार बहुतेक मृत्यू यामुळेच होतात.

वीज पडण्याच्या नेमक्या किती घटना घडतात
वार्षिक वीज कोसळ्याच्या २०१९-२० अहवालानुसार, २५ ते ३१ जुलै दरम्यान मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण आहे. यादरम्यान, देशभरात वीज कोसळण्याच्या चार लाखांहून अधिक घटनांची नोंद झाली.

वीज कोसळणे धोकादायक का असते?
आकाशातील विजेचे तापमान सूर्याच्या वरच्या पृष्ठभागापेक्षा जास्त असते. त्याची क्षमता ३०० केडब्ल्यू म्हणजेच १२.५ कोटी वॅट्सपेक्षा जास्त आहे. ही वीज एक मिलिसेकंदपेक्षा कमी काळ टिकते. वीज दुपारी पडण्याची शक्यता जास्त आहे. याचा मानसाच्या डोक्यावर, मानेवर आणि खांद्यावर सर्वाधिक परिणाम होतो.

मृतांचा आकडा कमी करण्यासाठी काही करता येईल का?
वीज पडण्याच्या घटना सहसा निश्चित स्वरुपाच्या असतात. पूर्वेकडील भागात, कालबैसाखी नावाचे वादळ आले की तेथे वीज कोसळते. बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशात पावसाळ्यापूर्वी विजांचा जोर कायम असतो. यामुळे, शेतकरी, पशुपालक, मुले आणि माळरानावरील लोकांना आधी माहिती देण्याची गरज असते. त्यासाठी स्थानिक पातळीवर योजना आखणे गरजेचे आहे. असं केल्यास नक्कीच या माध्यमातून होणारा मृतांचा आकडा कमी करता येऊ शकतो.

वीज पडल्यास काय करावं?
वीज पडल्यावर काही लोक मरतात, काही जखमी होतात; काही भाजतात; काही अपंग होतात. काहींना हार्ट अ‍ॅटॅक येतो. वीज झाडांवर पडल्यास मोठमोठे वृक्ष कोलमडतात तसेच काही जळून खाक होतात. मोठय़ा इमारतीवर वीज पडल्यांस इमारत कोसळते. जमिनीवर पडल्यास जमिनीत मोठा खड्डा पडतो. आता या विजेपासून आपण आपला व आपल्या संपत्तीचा बचाव कसा केला पाहिजे? हे बघू या. काळे काळे ढग दाटीवाटीने आकाशात जमा झाले, की समजावे आता हमखास वीज कडाडणार आहे. तुम्ही जर अशा वेळेला बाहेर असाल तसेच तेव्हा पाऊस सुरू झाला असेल व तुम्हाला जर वीज कडाडण्याचा आवाज आला; तर प्रथम स्वत:ला सुरक्षित करा. स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी तुम्ही स्वत:च्या घरांत किंवा एखाद्या इमारतीत ताबडतोब शिरा. गुरांचा उघडा गोठा किंवा एखादे शेणाचे शेड तुमचा विजेपासून बचाव करू शकणार नाही हे पक्के लक्षात ठेवा.

…म्हणून घराबाहेर पडू नये
एकदा का तुम्ही घरांत शिरलात की कुठलेही वायू असलेले इलेक्ट्रिकचे उपकरण हाताळू नका; वापरू नका. नळाचे कुठलेही काम करू नका. तसेच दारे व खिडक्यांपासून दूर रहा. विजेपासून वाहणारा प्रवाह (करंट) तारांमधून; केबल मधून; तसेच पाईप मधून वाहून तुमच्या शरीराला इजा, नुकसान पोहोचवू शकतो. पाऊस व वीज होत असताना एखादी इमारत जवळ नसेल तर झाडाखाली चुकूनही उभे राहू नका. हातात छत्री असेल तर बंद करून दूर टाकून द्या, मोकळ्या मैदानांत झाडापासून दूर उभे रहा. एखादी लोखंडाची वस्तू किंवा तांब्याची वस्तू जवळ असेल तर ती तुमच्यापासून दूर फेकून द्या किंवा दूर ठेवून द्या. लोखंडाकडे किंवा तांब्याकडे वीज लगेच (अ‍ॅट्रॅक्ट) आकृष्ट होते. जुन्याकाळी विजा होत असताना लोक एखादा लोखंडाचा मोठा चमचा, पळी किंवा पावशी पळस  बागेत फेकून देत असत. ते ह्यांचसाठी की वीज तिकडे आकर्षित (अ‍ॅट्रॅक्ट) व्हावी व घरावर पडू नये.

पाण्यात असताना असतानाच वीजा चमकू लागल्या तर?
वीज चमकत असताना तुम्ही जर तलावात पोहत असाल किंवा समुद्रात बोटीवर असाल तर पोहणे बंद करून ताबडतोब पाण्यातून बाहेर जमिनीवर या. एखाद्या कारमध्ये (मोटारीत) शिरा. मोठी बोट असल्यास त्याच्या के बिनमधे शिरा. तिथे लोखंडापासून व इलेक्ट्रीक (विद्युत) उपकरणांपासून दूर रहा. तसेच स्वत:चा विजेपासून बचाव करण्यासाठी घराबाहेर पडायच्या आधी हवामानाचा अंदाज घ्या. हवामान अंदाज काय म्हणतो ते बघा. तसेच आकाशाचे निरीक्षण करा. आकाशांत खूप काळे ढग असल्यास व दूरवरून वीज कडाडण्याचा आवाज येत असल्यास घराबाहेर पडू नका.

काय काळजी घ्यावी?
विजा चमकत असताना जर बाहेर असाल, तर सुरक्षित ठिकाणी पोहोचा. उंच वस्तूंखाली आश्रय घेणं टाळा. टेकडी, पर्वत यांच्याखाली आश्रय घेऊ नका. रेडिएटर्स, फोन, लोखंडाचे पाईप, स्टोव्ह इत्यादीसारख्या वीज वाहून नेणाऱ्या वस्तूंपासून दूर रहा. ढगाळ वातावरण असल्यास घराच्या आत रहा. इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नका. वीज चमकत असताना मोबाइल वापरू नका.

घरात काय काळजी घ्यावी?
आकाशात वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना टी.व्ही. बंद ठेवा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा. एरीयल असल्यास एरियल काढून ठेवा. कारण एरियल किंवा विजेच्या तारांमधून ही कडाडणारी वीज शिरून टी. व्ही. (डॅमेज) नादुरुस्त, खराब करू शकते. कधी कधी हायवोल्टेजमुळे टी.व्ही. जळून आगपण लागू शकते; कंम्प्यूटर बंद ठेवा; फ्रिज बंद ठेवा. शक्यतो विजेच्या सर्व महागडय़ा वस्तू बंद ठेवा व त्यांचे प्लग सॉकेट मधून काढून ठेवा.

मोठ्या इमारतींवरील लायटनिंग अरेस्टर कसं काम करतात?
मोठय़ा इमारतीच्या संरक्षणासाठी इमारतीवर (Lightning Arrester) लावतात. लायटनिंग अरेस्टर म्हणजे एक टोकदार तांब्याची सळई व व तिच्या वरच्या बाजूला त्रिशूणासारका आकार केलेला असतो तो लावतात. त्याला तांब्याची पट्टी जोडून ती खाली आणून जमिनीत गाडतात म्हणजेच अर्थिग करतात. वरून दोन वेगवेगळ्या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्यूमिनियमच्या पट्टय़ा आणून खाली जमिनीत त्याचे वेगळे वेगळे आर्थिग केल्यास उत्तम. कारण विजेपासून निर्माण होणारा वीज प्रवाह (Electric current) हा मेगाअ‍ॅंपियरमधे असतो. दोन वेगळ्या पण एकाच धातूच्या पट्टय़ा दोन ठिकाणी अर्थ केलेल्या असल्यामुळे प्रवाह दूभागून वाहतो. त्यामुळे त्याची तीव्रता कमी होते व तो जमिनीत लगेच शोषला जातो, असं अभियंता व ऊर्जा अभ्यासक अनंत ताम्हणे सांगतात.

लायटनिंग अरेस्टरचा वरील भाग टोकदार असतो कारण टोकदार भागाकडे आकाशात निर्माण होणारी वीज ओढली जाते व लगेच जमिनीत शोषली जाते. गाडली जाते. लायटनिंग अरेस्टरचे आथिर्ंग कसे करावे व अर्थिगची उपयुक्तता काय आहे, हे आपण आता बघू या. आर्थिगला इलेक्ट्रिकल इंजिनीअरींगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते. आर्थिग कसे करतात- जमिनीमध्ये साधारणत: ५ फुटापर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक फुटाच्या १’x१’ च्या १’’ (इंच) जाडीची तांब्याची,अ‍ॅल्युमिनीयमची किंवा  (Soft Iron) सॉफ्ट आयर्नची प्लेट पुरतात व प्लेटच्या सभोवताली कोळसा; मीठ; वाळू पुरतात. या क्रियेला ‘अर्थिग’ असे म्हणतात. अर्थिग केलेल्या ठिकाणी व त्याच्या आसपास ओलावा राहील अशी खबरदारी घेतली जाते. वरून आलेल्या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्युमिनीयमच्या पट्टय़ा या तांब्याच्या किंवा अ‍ॅल्युमिनियमच्या प्लेटला जोडतात. दोन एकाच धातूच्या पट्टय़ा एकाच धातूच्या प्लेटला वेगवेगळ्या ठिकाणी जोडतात. त्यामुळे विजेचा हेवी करंट दुभागून लगेच; चटकन अर्थ पट्टीमार्गे जमिनीत वाहून डेड (निकामी) होतो. त्यामुळे इमारतीचे होणारे नुकसान टाळता येते. मनुष्यहानी टाळता येते. महत्त्वाच्या मोठय़ा इमारतींना लायटनिंग अरेस्टर लावलेले असतात. फ्लॅट स्कीम तसेच बंगल्यालासुद्धा हे लावून घ्यायला पाहिजेत. वेगवेगळ्या कंपन्या इंडियन स्टँडर्ड (क.र.) प्रमाणे लायटनिंग अरेस्टर लावून देण्याचे काम करतात.