मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील भोजशाळा मंदिर आणि कमल मौला मशीद संकुलाचे सहा आठवड्यांच्या आत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या वास्तूचे मूळ स्वरूप निश्चित करणे हा यामागील मूळ हेतू आहे. ही वास्तू पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित असून हिंदूंसाठी हे वाग्देवीचे मंदिर आहे, तर मुस्लिमांसाठी कमल मौला मशिदीचे ठिकाण आहे.

गेल्या वर्षी मध्य प्रदेशातील कमल मौला मशिदीत वाग्देवीची प्रतिकात्मक मूर्ती स्थापन केल्याच्या काही तासांनंतर जिल्हा प्रशासनाने ती जागेवरून स्थलांतरित केली. परंतु हिंदू संघटनांनी मूर्तीच्या जीर्णोद्धारासाठी एकत्र येण्याची धमकी दिल्यानंतर त्या परिसरात तब्बल २०० पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. तर आता मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला धार जिल्ह्यातील भोजशाळा मंदिर-कमल मौला मशीद संकुलाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानिमित्ताने हा वाद समजून घेण्याचा हा प्रयत्न.

tigers died in mp graph of tiger deaths increasing in madhya pradesh
मध्यप्रदेशात वाढतो आहे, वाघांच्या मृत्यूचा आकडा, हा रेल्वे ट्रॅक …
Gadchiroli Women Naxalists in the district decided to leave the violent movement and join the mainstream
गडचिरोली : दोन जहाल महिला नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; १६ लाखांचे होते बक्षीस….
Citizens of Dombivli West travel on gravel roads Neglect of MMRDA Public Works Department
डोंबिवली पश्चिमेतील नागरिकांचा खडीच्या रस्त्यांवरून प्रवास; एमएमआरडीए, सार्वजनिक बांंधकाम विभागाचे दुर्लक्ष
medigadda Dam, Damage,
गडचिरोलीतील मेडीगट्टा धरणामुळे शेतजमिनीचे नुकसान, उच्च न्यायालयात याचिका…
Pune, British period Cantonment Court pune, Cantonment Court Relocates to mahatma phule sanskrutik bhavan wanwadi, Cantonment court building Dilapidation , pune Cantonment court Constraints, pune news,
ब्रिटीशकालीन लष्कर न्यायालयाचे स्थलांतर
Mumbai, air pollution, traffic,
मुंबई : रहदारीमुळे होणारे वायू प्रदूषण कमी करण्यासाठी काय कारवाई केली ? तपशील सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे सरकारला आदेश
Ambernath Municipality,
अंबरनाथ पालिका म्हणते वालधुनी नदी नव्हेच ! बांधकाम प्रकरणात स्पष्टोक्ती
Will the 10 percent reservation given to the Maratha community stand the test of law
मराठा आरक्षणाचे भवितव्य टांगणीला?

वाद कशावरून?

ज्या ठिकाणी ही वाग्देवी मूर्ती स्थापन केली होती ते ठिकाण भारतीय पुरातत्त्व खात्यातर्फे (ASI) संरक्षित केलेले आहे. हे स्थळ वाग्देवीचे मंदिर असल्याचे हिंदू मानतात तर ती कमल मौला मशीद असल्याचे मुस्लिम समाज मानतो. ७ एप्रिल २००३ रोजी भारतीय पुरातत्त्व विभागाकडून (ASI) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या स्थळावर मुस्लिमांना नमाज अदा करण्याची परवानगी आहे. याच पार्श्वभूमीवर देवीची मूर्ती स्थलांतरित केल्यामुळे या परिसरात तणावग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळेच पोलिसांनी परिसराची सुरक्षा वाढविली आहे. याविषयी एएसआयचे प्रादेशिक संचालक भुवन विक्रम सांगितले की, “आम्ही यासंदर्भात तात्काळ कारवाई केली आणि मूर्ती हटविण्यात आली. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल” असेही त्यांनी नमूद केले होते.

आणखी वाचा: छत्रपती शिवाजी महाराजांनी बलात्काऱ्यांना कोणती शिक्षा दिली?

छुपा अजेंडा असल्याचा आरोप

त्याच पार्श्वभूमीवर शेहर काझी वकार सदिकी यांनी जिल्हा प्रशासनाला याप्रकरणी कारवाईची मागणी करणारे निवेदन दिले होते. ते म्हणाले, “आम्ही आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सुरक्षा कर्मचार्‍यांवर कारवाईची मागणी करत आहोत कारण हा वाद केवळ कायदा आणि सुव्यवस्थेशी संबंधित नाही तर या मागे छुपा अजेंडा असल्याचे दिसत आहे.”

भोजशाळा संघर्ष समितीची बाजू

असे असले तरी, स्मारकावर हक्क मागणाऱ्या भोजशाळा संघर्ष समितीचे सदस्य गोपाल शर्मा यांनी मूर्ती हटवल्याबद्दल जिल्हा प्रशासनावर टीका केली होती. “आम्ही भोजशाळेत मूर्ती असणारा फोटो आणि व्हिडिओ पाहिला पण आम्ही पोहोचलो तोपर्यंत प्रशासनाने मूर्ती काढून टाकली होती. त्यांनी मूर्ती जप्त करू नये, कारण ही श्रद्धेची बाब आहे. (भोजशाळेवर हक्क मिळवण्यासाठी) आम्ही बराच काळ लढत आहोत” असे त्यांनी नमूद केले. “मूर्ती परत न ठेवल्यास आम्ही रस्त्यावर उतरू,”असेही ते म्हणाले होते.

निवडणुकीची पार्श्वभूमी व राजकीय वाद

मे २०२२ मध्ये, एएसआयच्या २००३ च्या निर्णयाविरुद्ध मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठासमोर, हिंदू समुदायाशी संबंधित कायदेशीर समस्या हाताळणार्‍या हिंदू फ्रंट फॉर जस्टिस या संघटनेने एक जनहित याचिका दाखल केली होती, ज्यामध्ये हिंदूंसाठी दररोज प्रार्थना करण्याची परवानगी मागितली होती. न्यायालयाने याप्रकरणी एएसआय, केंद्र आणि राज्य सरकारला नोटीस बजावली. या याचिकेवर राज्याने अद्याप प्रतिसाद दिलेला नाही. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने (भाजपा) देखील जीर्णोद्धाराची मागणी केल्याने भोजशाळेतील मूर्तीवरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भाजपाची खेळी असल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे.

भोजशाळा म्हणजे काय?

भोजशाळा हे मूलतः ११ व्या शतकात बांधलेली ऐतिहासिक वास्तु आहे. हीच वास्तु वाग्देवीचे मंदिर असल्याचे मानले जाते. वाग्देवी हे सरस्वती देवीचेच दुसरे नाव आहे. परमार घराण्यातील प्रसिद्ध भोज राजाच्या काळात ही वास्तु बांधण्यात आली. भोज राजा याचे स्वतःचे असे ऐतिहासिक महत्त्व आहे. भोज राजा हा महान सम्राट आणि शिक्षण तसेच साहित्याचा एक निष्ठावान प्रवर्तक होता, याने धार येथे एक महाविद्यालय स्थापन केले, जे भोजशाळा म्हणून ओळखले जाते.

धार हे भोज राजाच्या काळात राजधानीचे ठिकाण होते. हेच महाविद्यालय वाग्देवी मंदिर म्हणून ओळखले जाते. या महाविद्यालयात देशी विदेशी विद्यार्थी संगीत, संस्कृत, खगोलशास्त्र, योग, आयुर्वेद आणि तत्त्वज्ञान शिकण्यासाठी येत असत. भोजशाळा ही हजारो विद्यार्थी आणि बुद्धिजीवी यांना सामावून घेणारी एक मोठी शैक्षणिक संस्था होती.

ऐतिहासिक संदर्भानुसार मुस्लीम आक्रमणात या वाग्देवी मंदिराच्या जागी कमल मौला मशीद उभारण्यात आली, आजही तेथे भोजशाळेचे अवशेष पाहता येतात. मशिदीत वापरलेले कोरीव खांब हे भोजशाळेत वापरलेले खांब आहेत. मशिदीच्या भिंतींवर केलेले नक्षीकाम आणि अभिलेख आजही आपण पाहू शकतो. हे शिलालेख संस्कृतमध्ये असून काही शिलालेख राजा भोजानंतर झालेल्या सम्राटांची स्तुती करणारे आहेत. काही शिलालेखांमध्ये संस्कृतमध्ये केलेल्या नाट्यरचना देखील कोरलेल्या आहेत. हे शिलालेख ११ व्या आणि १२ व्या शतकातील आहेत.

आणखी वाचा: चिंचेच्या झाडाखाली झोपणे वैज्ञानिकदृष्ट्या निषिद्ध का मानले जाते? 

भोज सरस्वती लंडनमध्ये

या मंदिरात असलेली देवी सरस्वतीची मूर्ती सध्या लंडनमधील संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. तत्कालीन राजकवी मदन यांनी आपल्या कवितांमध्ये या देवी सरस्वती मंदिराचा उल्लेख केला आहे.

खिलजीचे आक्रमण

१३०५, १४०२ आणि १५१४ साली मुस्लीम आक्रमकांनी भोजशाळेतील भव्य मंदिरे आणि विद्येच्या केंद्राची वारंवार नासधूस केली. १३०५ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणात त्याने भोजशाळेचा नाश केला. असे असले तरी इस्लामिक प्रसाराची प्रक्रिया मध्य प्रदेश मध्ये खिलजीच्या आधी ३६ वर्षांपूर्वीच सुरु झाली होती. १२६९ मध्ये, कमल मौला नावाचा मुस्लीम फकीर माळव्यात पोहोचला तेव्हा या घटनाक्रमाला सुरुवात झाली.

कमल मौला

कमल मौला यांनी अनेक हिंदूंना इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यासाठी फसव्या पद्धतींचा वापर केला. ही प्रक्रिया जवळपास ३६ वर्षे चालली. इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल खिलजीने भोजशाळेतील १२०० हिंदू विद्यार्थी आणि शिक्षकांची हत्या केली आणि मंदिर परिसर उद्ध्वस्त केला, असे सांगण्यात येते. सध्याच्या मशिदीला त्याच कमल मौलाचे नाव आहे.

इंग्रजांची भूमिका

१७०३ मध्ये मराठ्यांनी माळवा ताब्यात घेतला, त्यामुळे मुस्लीम राजवट संपुष्टात आली. ईस्ट इंडिया कंपनीने १८२६ मध्ये माळवा ताब्यात घेतला. त्यांनीही भोजशाळेवर आक्रमण करून अनेक स्मारके आणि देवळे नष्ट केली. लॉर्ड कर्झनने भोजशाळेतून देवतेची मूर्ती काढून १९०२ मध्ये इंग्लंडमध्ये नेली. ही मूर्ती सध्या लंडनमधील वस्तू संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. मुस्लीम राजवटीनंतर प्रथमच, १९३० मध्ये ब्रिटिश सत्तेच्या काळात मुस्लिमांनी भोजशाळेत प्रवेश करून नमाज अदा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न आर्य समाज आणि हिंदू महासभेच्या हिंदू कार्यकर्त्यांनी हाणून पाडला होता.

स्वातंत्र्योत्तर काळात भोजशाळा

१९५२ मध्ये केंद्र सरकारने भोजशाळा भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाकडे सोपवली. त्याच वर्षी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदू महासभेच्या प्रचारकांनी हिंदूंना भोजशाळेबद्दल माहिती प्रसार करण्यास सुरुवात केली. याच काळात हिंदूंनी श्रीमहाराजा भोज स्मृती वसंतोत्सव समितीची स्थापना केली. त्यानंतर १९६१ मध्ये प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ, कलाकार, लेखक आणि इतिहासकार पद्मश्री डॉ. विष्णू श्रीधर वाकणकर यांनी लंडनला भेट दिली आणि लंडनमध्ये ठेवलेली वाग्देवी मूर्ती हीच खरी भोजशाळेत राजा भोजने स्थापित केलेली मूर्ती असल्याचे सिद्ध केले. भोजशाळा एप्रिल २००३ मध्ये हिंदूंसाठी उघडण्यात आली. हिंदू भाविकांना मंगळवार व्यतिरिक्त दररोज दर्शनाची परवानगी होती.