जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांच्या मुलाचे सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) या गंभीर आजारामुळे निधन झाले. सत्या नडेला यांचा मुलगा जैन नडेला लहानपणापासूनच या आजाराने ग्रस्त होता. त्याच्या निधनाची माहिती स्वतः सत्या नडेला यांनी दिली. केवळ २६ वर्षाच्या वयामध्ये जैन नडेला याने जगाचा निरोप घेतला. जैन याच्या निधनाच्या बातमीनंतर सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) म्हणजे नेमकं काय अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. तर जाणून घेऊया सेरेब्रल पाल्सी म्हणजे काय आणि याची लक्षणे काय आहेत.

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) म्हणजे काय?

सेरेब्रल पाल्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे जो लहान मुलांमध्ये होतो, ज्यामुळे रुग्णाच्या हालचाल करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. असे मानले जाते की याचा परिणाम मुलांच्या मेंदू आणि स्नायूंवर जन्मापूर्वी किंवा नंतर देखील होतो. काही मुलांमध्ये जन्मापूर्वीच या आजाराची लक्षणे दिसू लागतात. हा आजार एक प्रकारे अपंगत्वाच्या श्रेणीत मोडतो. यामुळे मुलाची वाढ वेळेत होऊ शकत नाही. २०१७ साली सत्या नडेला यांनी एक पुस्तक लिहले होते. यात त्यांनी आपल्या मुलाच्या या आजाराबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.

सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy)ची लक्षणे :

रिपोर्टनुसार, सेरेब्रल पाल्सी हा मेंदूशी संबंधित एक अतिशय गंभीर आजार आहे. असे मानले जाते की जर मूल जन्मत: रडत नसेल तर त्याला सेरेब्रल पाल्सी झाल्याची शक्यता असते. तुम्ही पाहिलं असेल की काही मुले जन्मतःच कावीळ आजाराने ग्रस्त असतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडे डॉक्टरांच्या देखरेखीखाली विशेष लक्ष देण्याची गरज असते. याशिवाय बाळाच्या जन्मानंतर त्याच्या तोंडातून जास्त लाळ गळणे हे देखील बाळ सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त असण्याचे लक्षण आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आजाराने ग्रस्त असलेली मुले थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना चालण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत या गोष्टीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण सेरेब्रल पाल्सी या आजारामुळे मुलांच्या चालण्याच्या क्षमतेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. असे मानले जाते की या आजाराच्या उपचारात औषधासोबतच फिजिओथेरपीचाही महत्त्वाचा वाटा आहे.