‘नॉन फंजीबल टोकन्स’ म्हणजेच ‘NFT’ हा ब्लॉक चेन टेक्नॉलॉजीमधील अत्यंत लोकप्रिय असा प्रकार आहे. कलाकार, सर्जनशील तंत्रज्ञ तसेच मुख्य प्रवाहातील ब्रँड्सनीही ‘एनएफटी’ना जवळ केल्यामुळे त्यांचा प्रसार व्हायला मदत झाली आहे. भारतातलंच उदाहरण म्हणजे क्रिकेटच्या चाहत्यांना ‘एनएफटी’च्या माध्यमातून व्यवहार करता येईल असं रारिओनं सुरू केलेलं व लोकप्रिय झालेलं व्यासपीठ. आवडत्या क्रिकेटर्सच्या रंजक क्षणांपासून ते त्यांच्या चित्रापर्यंत अनेक गोष्टींची या प्लॅटफॉर्मवर खरेदी व विक्री होते. रारिओचे ‘क्रिकेट एनएफटी’ म्हणजे वास्तव जगात ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या प्रतिकृतींचा व्यवहार करणारा बाजार असं म्हणता येईल. रारिओनंच स्पष्ट केल्याप्रमाणे ‘क्रिकेट एनएफटी’ म्हणजे क्रिप्टोकरन्सी नाही. दोघेही ब्लॉक चेन तंत्रज्ञान वापरतात एवढंच काय ते साम्य. ऋषभ पंत, राशिद खान सेहवागसारखे ब्रँड अॅम्बॅसेडर आणि ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाची भागीदारी रारिओकडे आहे. हजारो क्रिकेटर्सशी त्यांचा करार असून अनेक स्पर्धांशीही ते जोडलेले आहे. त्यामुळे व्हिडीओ क्षणांपासून ते छायाचित्रांपर्यंत सर्व प्रकारच्या क्रिकेट एनएफटीचे व्यवहार रारिओ करतं.

‘एनएफटी’बाबत असा दावा आहे की, ते अधिकृत प्रमाणपत्र देतात आणि तुम्ही बाळगून असलेली संपदा ही एकमेव आहे याची हमी देतात. म्हणजे, तुम्ही जेव्हा एनएफटीच्या माध्यमातून एखादी डिजिटल मालमत्ता विकत घेता, तेव्हा तुम्ही खरंतर त्या संपत्तीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या कोडसाठी पैसे मोजत असता. हे टोकन म्हणजे एक मेटाडेटा असतो जो तुमच्या ब्लॉकचेनमधील पत्त्यावर पाठवला जातो.

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
BJP using social media influencers for election campaign Lok Sabha elections 2024
निवडणूक प्रचारात इन्फ्लूएन्सर्सची एंट्री; भाजपाची काय आहे क्लृप्ती?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

एनएफटी म्हणजे काय?

एनएफटी ही खरी डिजिटल मालमत्ता नसून ब्लॉकचेनवर कायमस्वरुपी प्रिंट केलेला एक पुरावा असतो. यामध्ये लोकांना मूल्य दिसलं तर तुम्ही ते एनएफटी म्हणून देऊ शकता, ब्लॉकचेनवर छापू शकता आणि एनएफटीच्या बाजारात विक्रीसाठी ठेवू शकता. यात तुम्हाला रस असेल तर तुम्ही तुमचे स्वत:चे एनएफटी काढू शकता. तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझ्याकडे स्वत:चा कंटेंट आहे तर मला एनएफटीची गरज काय? त्यानं असा काय मोठा फरक पडणार आहे?

विश्लेषण: युरोपच्या एका निर्णयामुळे Apple ला iPhone ची चार्जिंग सिस्टीमच बदलावी लागणार! काय घडतंय युरोपमध्ये?

तांत्रिक बाबींचा विचार केला तर तुमचा अगदी स्वत:चा कंटेंट असेल व तो मध्यवर्ती यंत्रणेवर असेल तर तुम्ही सर्वस्वी मालक नसता. तुमचा कंटेंट अशा प्लॅटफॉर्मवर ठेवण्यासाठी तुमच्या उत्पन्नातलाच काही भाग घेतला जातो. एखाद्या गाण्याचे हक्क कुठल्यातरी कंपनीकडे असतात. या गाण्याच्या गायकाला ते गाणं कुठे लाइव्ह गायचं असेल तरी त्याला त्या कंपनीची परवानगी घ्यावी लागते. मध्यवर्ती यंत्रणा किंवा सेंट्रलाइझ प्लॅटफॉर्मवर तुमचा कंटेंट गेला की त्या कंटेंटची मालकी तितकी साधी राहत नाही, गुंतागुंतीची होते.

ज्यांना व्यासपीठ सहजासहजी मिळत नाही, अशांना यू ट्यूबनं चांगलाच हात दिलाय. पण कसलीही तक्रार झाली तर यू ट्यूब हा सेंट्रलाइज प्लॅटफॉर्म असल्याने तुमचा कंटेंट डिमॉनेटाइज करू शकते, तुमचे उत्पन्न बंद होऊ शकते. आणि यू ट्यूबवरही सहजासहजी पैसे मिळत नाहीत. त्यासाठी खूप सबस्क्रायबर लागतात, वॉच अवर्स लागतात. मग तुम्ही पार्टनर झालात की तुमचं चॅनेल मॉनेटाइज करता येतं. पण या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार यू ट्यूब ५५ टक्के उत्पन्न मालकाला देते व ४५ टक्के उत्पन्न स्वत:कडे ठेवते.

जर सेंट्रलाइज प्लॅटफॉर्म्सना द्यावा लागणारा हा वाटा निर्मात्यालाच मिळाला तर? असं सांगतात शेतकऱ्याला बाजारातील किमतीच्या तुलनेत फार कमी भाव मिळतो, जास्त मलिदा तर मधली साखळीच खाते. ते टाळता येईल का तुमच्या कंटेंटच्या बाबतीत?

विश्लेषण : आता मतदारांना खोटी आश्वासनं देता येणार नाहीत, निवडणूक आयोगाच्या आदर्श आचार संहितेत कोणते बदल प्रस्तावित?

तुम्हाला तुमचे एनएफटी या बाजारात विकायला ठेवायचे असतील तर ते छापण्यासाठी एकदाच गॅस फी भरावी लागते व एनएफटी विकले गेल्यावर फी भरावी लागते. समजा एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडील एनएफटी १० हजार रुपयांना विकत घेतले तर तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार १० ते १५ टक्के बाजारातील ही संधी उपलब्ध करून देणाऱ्यांना द्यावे लागतात व ८५ ते ९० टक्के रक्कम तुम्हाला मिळते.

त्यामुळे एनएफटीचे समर्थक सांगतात की जर तुमच्या उत्पन्नातला शक्य तितका जास्त वाटा तुम्हाला हवा असेल, मधल्या साखळीत हरवू द्यायचा नसेल तर एनएफटी छापा.

एनएफटी बनवायचे कसे?

डिजिटल असेट्सची मालकी नक्की कुणाकडे आहे हे निश्चित करायला एनएफटी मदत करतं. निर्मात्याला, सर्जनशील व्यक्तीला एक ठोस पुरावा दिला जातो ज्याच्या माध्यमातून मालकी सिद्ध होते. ती झाली की कुणाही मध्यस्थाशिवाय त्या मालकाला ही मालमत्ता विकता येते. तर, कसे बनतात ही मालकी देणारे एनएफटी.

समजा तुम्हाला एथरम ब्लॉकचेनवर तुमची एनएफटी छापायची आहे. तर तुम्हाला मेटामास्कसारखं वॉलेट लागेल. मेटामास्कचा मोबाइल अॅपसारखा वापर करता येतो. मग, NFTically, Mineable, Opensea यासारखा बाजार निवडायचा जिथं एनएफटी छापून मिळते. तुम्ही ज्याची निवड कराल ते तुम्हाला एनएफटी तयार कशी करायची, छापायची कशी याचं प्रात्यक्षिक दाखवतात. ज्या डिजिटल असेटची एनएफटी बनवायचीय ती तुमच्याकडे प्रत्यक्ष असलेली डिजिटल असेट अपलोड करावी लागते. मग तुम्हाला संबंधित प्लॅटफॉर्म एनएफटी बनवण्याचा पर्याय देतो.

विश्लेषण : २०२० या एका वर्षात सात कोटी लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले गेले; जागतिक बँकेची आकडेवारी, पण कारण काय ठरलं?

डिजिटल असेट अपलोड झाल्यावर तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे विशिष्ट अशी गॅस फी क्रिप्टो वॉलेटच्या माध्यमातून भरावी लागते. ही प्रक्रिया पूर्ण झाली की एनएफटी छापायची प्रक्रिया सुरू होते. सुपररेअरसारख्या ठिकाणी ट्रॅन्झॅक्शन फी म्हणून १० ते १५ टक्के रक्कम घेतली जाते. तसंच एथरम ब्लॉकचेनवर एनएफटी छापण्याचा खर्च १०० डॉलर असेल तर तुमच्या कंटेंटच्या विक्रीचे मूल्य १०० डॉलर्सपेक्षा खूप जास्त असायला हवे हे महत्त्वाचे.

ज्यांच्याकडे विक्री करता येईल अशी दर्जेदार डिजिटल मालमत्ता आहे व त्यांना मध्यस्थ टाळून थेट खरेदीदाराला ती विकून पैसे कमवायचेत तर एनएफटी हा एक चांगला पर्याय आहे. थोडक्यात निर्माता व खरेदीदार यांच्यात थेट संबंध प्रस्थापित करणारा एनएफटी हा एक पर्याय आहे.