पंजाब राज्यासह दिल्ली परिक्षेत्रातील काही भागात शेतातील पेंढा आणि खुंटं जाळण्याच्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषणात चिंताजनक वाढ झाली आहे. याच कारणामुळे दिल्लीमध्ये शासनातर्फे काही उपाययोजना राबवल्या जात आहेत. दरम्यान, एकीकडे या भागातील काही शेतकरी आम्ही शेतातील भाताचे खुंट आणि पेंढा (पाचट) यांची अंशत: जाळणी करत आहोत, असे सांगत आहेत. याच पार्श्वभूमीवर खुंट आणि मोकळा पेंढा (पाचट) यांची अंशत: जाळणी काय असते, त्यामुळे प्रदूषण होतो का, हे जाणून घेऊया.

हेही वाचा >>> विश्लेषण : आयपीएस अधिकाऱ्याविरोधात महेंद्रसिंह धोनीची न्यायालयात धाव, नेमकं कारण काय?

मोकळा पेंढा आणि खुंट म्हणजे काय?

पंजाब तसेच दिल्ली परिक्षेत्रात शेतकरी मोठ्या प्रमाणात भात, गव्हाची शेती करतात. हे पीक कापल्यानंतर शेवटी खुंट तसेच पेंढा (पाचट) शिल्ल्क राहतो. कमी आणि जास्त कालावधीच्या भातपिकांची उंची उनुक्रमे ४ आणि ५ फूट असते. पिकाची पूर्ण वाढ झाल्यानंतर शेतकरी पीक काढणीयंत्राच्या मदतीने पिकाचा वरचा भाग कापून घेतात. त्यानंतर खाली १५ ते १८ इंच लांबीचे खुंट शिल्लक राहते. यालाच शेतातील उभी खुंट (Standing Stubble) म्हणतात. पीक काढणी यंत्राच्या मदतीने जेव्हा भात वेगळा तेव्हा मोकळा पेंढा (पाचट) बाहेर फेकला जातो. हाच मोकळा पेंढा (पाचट) शेतामध्ये ढिंगाऱ्यांमध्ये जमा केला जातो.

हेही वाचा >>> विश्लेषण : भाजपाच्या लोकांकडून आमदारांना लाच? कथित ‘डील’च्या व्हिडीओने खळबळ, चंद्रशेखर राव यांचे आरोप काय?

अंशत: जाळणी म्हणजे काय?

पिकाची कापणी केल्यानंतर शेतकरी मोकळा पेंढा (पाचट) जाळून टाकतात. त्यायाधी हा पेंढा काही दिवस उन्हात वाळायला ठेवतात. नंतर पुढील पिकासाठी हा मोकळा पेंढा जाळून टाकला जातो. काही शेतकरी पूर्ण शेत जाळण्यापेक्षा पेंढा ढिगाऱ्यांमध्ये जमा करून ते जाळून टाकतात. यालाच ढोबळमाणाने शेतकरी अंशत: जाळणी ( Partial Stubble Burning) म्हटले जाते.

शेतकरी अंशत: जाळणीचा पर्याय का निवडतात?

शेतकरी पेरणीयंत्राच्या मदतीने भात आणि गहूलावणी करतात. मात्र काही शेतकरी पेरणीयंत्र भाड्याने घेऊन पेरणी करतता. पेरणीसाठी हॅपी सीडर, स्मार्ट सीडर आणि सुपर सीडर अशी तीन यंत्रे वापरली जातात. खरंतर नवे पीक घेण्यासाठी भातकाढणी केल्यानंतर खुंटं जाळण्याची गरज नसते. मात्र तरीदेखील ही खुंंटं जाळली जातात. शेतात खुंटं असतील तर पीक चांगले येणार नाही, असा समज शेतकऱ्यांचा असतो. काही शेतकऱ्यांना मोकळा पेंढा जाळून टाकायचा नसतो. मात्र मोकळा पेंढा जाळून टाकल्यानंतर पेरणीयंत्र चांगल्या पद्धतीने काम करते, असे शेतकऱ्यांना पेरणीयंत्राचा मालक सांगतो. परिणामी काही शेतकरी इच्छा नसतानाही पूर्ण शेतच जाळून टाकतात.

हेही वाचा >>> विश्लेषण : इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने बंद पडण्यामागचं कारण काय?

‘कोणतेही पीक घेण्याअगोदर शेतकऱ्यांना त्यांचे शेत मोकळे आणि स्वच्छ असावे, असे वाटते. याच कारणामुळे शेतकरी माती तसेच हवेची काळजी न करता शेतातील खुंट आणि मोकळा पेंढा जाळतात. शेतकऱ्यांनी शेत स्वच्छ असावे हा हट्ट सोडून पर्यावरण स्वच्छ कसे राहील याचा विचार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी पिकाची खुंट तसेच पेंढा जाळणेदेखील बंद केले पाहिजे,’ असे या क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले.

अशंत: जाळणी केल्याने प्रदूषण कमी होईल का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तज्ज्ञांच्या मते शेतकऱ्यांनी पूर्ण शेत जाळण्यापेक्षा मोकळा पेंढा जमा करून तो १० ते १२ ठिकाणी जाळला तर आग पूर्ण शेतात पोहोचणार नाही. मात्र असे होण्याचे प्रमाण फार कमी आहे. शेतकऱ्यांनी शेताची अंशत: जाळणी केली तर ४० ते ५० टक्क्यांनी प्रदूषण कमी होईल.