आशियातील सर्वांत मोठा Air Show अशी ओळख असलेला Aero India हा Air Show दर दोन वर्षांनी भारतात बंगळूरू इथे भारतीय वायू दलाच्या येलहंका या तळावर भरवला जातो. १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यानच्या यावेळच्या Aero India चे हे १४ वे वर्ष असून दरवर्षी Air Show ला प्रतिसाद वाढत असल्याचं चित्र आहे. ‘The runway to a billion opportunities’ असं या वेळचे घोषवाक्य असून एकप्रकारे संरक्षण आणि हवाई क्षेत्रातील गुंतवणूकीसाठी व्यासपीठ या Air Show च्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. यानिमित्ताने विविध देशांशी संबंध अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकण्यात येईल असं Aero India 2023 निमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटलं आहे.

यावेळच्या Aero India 2023 मध्ये ३२ देशांचे संरक्षण मंत्री भेट देणार असून २९ देशांचे हवाई दल प्रमुख, संरक्षण क्षेत्रात विविद उत्पादने घेणाऱ्या ७३ कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी येणार आहेत.

Pimpri Chinchwad, Pimpri Chinchwad Police, Weekly Complaint Redressal Day, 18 may , pimpri news, police news, marathi news,
पिंपरी : आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा…पोलिसांनी सुरू केला अनोखा उपक्रम…
number of agri startups jumps in india
कृषी नवउद्यमी नऊ वर्षांत सात हजारांवर
profit, government banks,
सरकारी बँकांचा एकूण नफा १.४० लाख कोटींपुढे
The price of gold is increasing
सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढतीच; गुंतवणूकदारांनी काय करावे?
Country largest state bank quarterly profit at Rs 21384 crore
देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँकेचा तिमाही नफा २१,३८४ कोटींवर; भागधारकांना  प्रति समभाग १३.७० रुपयांचा लाभांश घोषित 
Services sector growth at 14 yr high
सेवा क्षेत्राची सक्रियता १४ वर्षांच्या उच्चांकी; महिनागणिक किंचित मंदावूनही एप्रिलमध्ये ६०.८ गुणांवर
mixed effects on companies share value after godrej group split
गोदरेज समूहाच्या विभाजनाचे कंपन्यांच्या समभाग मूल्यांवर संमिश्र परिणाम
survey shows citizens have no confidence in food inspection agencies
खाद्यपदार्थांची तपासणी करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा अविश्वास, सर्वेक्षणातून माहिती उघडकीस

Aero India show काय आहे?

संरक्षण मंत्रालयाचा संरक्षण उत्पादन विभाग आणि Hindustan Aeronautics Limited (HAL) तर्फे यावेळच्या शोचे आयोजन करण्यात आले आहे. जगातील दिग्गज संरक्षण उत्पादक कंपन्या Airbus, Boeing, Dassault Aviation, Lockheed Martin, Israel Aerospace Industry, SAAB, Rolls Royce या कपंन्यांबरोबर देशातील BrahMos Aerospace Larsen & Toubro, Bharat Forge Limited, Bharat Electronics Limited (BEL), Bharat Dynamics Limited (BDL) and BEML या कंपन्या या शोमध्ये सहभागी झाल्या असून संरक्षण विषयक विविध उत्पादने मांडणार आहेत.

स्वदेशी बनावटीचे जगातील सर्वांत लहान लढाऊ विमान अशी ओळख असलेले तेजस – Light Combat Aircraft (LCA), लढाऊ विमानाचे प्राथमिक प्रशिक्षण देणारे HTT-40 तसंच Light Utility Helicopter (LUH), Light Combat Helicopter (LCH) and Advanced Light Helicopter (ALH) अशा या स्वदेशी उत्पादनांची निर्यात होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यानिमित्ताने देशातील लघु उद्योजकांना संधी मिळेल, नव उद्योजकांसाठी नवी संधी मिळेल आणि परदेशी गुंतवणूकदार इथे गुंतवणूक करतील, भविष्यात उत्पादन करतील असं संरक्षण विभागाने स्पष्ट केलं आहे.

यावेळी Aero India 2023 मध्ये पाच लाखांपेक्षा जास्त लोकं भेट देतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यावेळच्या प्रदर्शनात काय अपेक्षित आहे?

विविध प्रकारचे सेमिनार आयोजित करण्यात आले असून या माध्यमातून माजी सैनिक-अधिकारी यांचा संरक्षण उत्पादन क्षेत्रात कसा सहभाग वाढवता येतील याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. तसंच अवकाश उद्योगात खाजगी क्षेत्राच्या प्रवेशासाठी अधिक चांगले वातावरण निर्मिती करण्यासाठी या सेमिनारचा कसा उपयोग करुन घेता येईल याकडेही लक्ष दिले जाणार आहे.

‘संरक्षण क्षेत्रात संयुक्त भागीदारीतून सर्वसमावेशक प्रगती’ या ध्येयवाक्यावर आधारीत संरक्षण मंत्र्यांतर्फे चर्चासत्राचे आयोजन केले असून त्यामध्ये विविध देशांचे संरक्षण मंत्रीही सहभागी होणार आहेत.

या पाच दिवसांत देशातील विविध कंपन्यांबरोबर संरक्षण मंत्रालय हे एकुण २५१ विदेशी कंपन्यांशी सामंजस्य करार करणार असून यामुळे ७५ हजार कोटींची गुंतवणूक होईल असा एक अंदाज आहे.

Aero India 2023 शो च्या माध्यमातून एकप्रकारे हवाई क्षेत्रातील सामर्थ्य दाखण्याचा भारत प्रयत्न करत असतो. तसंच देशाच्या हवाई क्षेत्रात पदार्पण करणारी संभाव्य विविध उत्पादनेही इथेच पहिल्यांदा प्रदर्शित केली जातात. संरक्षण क्षेत्रातील जगातील सर्वात मोठा आयतदार असलेला भारत परेदशातील गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न या शो च्या माध्यमातून करत असतो. भारतासह विविध देशांची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर, ड्रोन यांच्या चित्तथरारक हवाई कसरती इथपासून विविध प्रकारचे रडार, रायफल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे बघण्याची संधीही या Aero India show मध्ये मिळते.