भारतीय रेल्वे क्षेत्रात मागील काही वर्षांमध्ये मोठे आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्याा मदतीने भारतीय रेल्वेने लक्षणीय प्रगती केलेली आहे. वंदे भारत एक्स्प्रेमुळे तर भारतीय रेल्वेमध्ये उल्लेखनीय बदल झाला आहे. असे असतानाच आता भारत सरकार लवकरच वंदे भारत एक्स्प्रेसच्या रुपात ‘टिल्टिंग रेल्वे’ आणणार आहे. भारतात २०२५ सालापर्यंत टिल्टिंग तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या साधारण १०० वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केल्या जाणार आहेत. याच पार्श्वभूमीवर टिल्टिंग रेल्वे म्हणजे काय? हे तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी भारत सरकारकडून काय प्रयत्न केले जात आहेत? या तंत्रज्ञानामुळे भारतीय रेल्वेमध्ये काय बदल होणार? हे जाणून घेऊया.

‘टिल्टिंग रेल्वे’बद्दल एका रेल्वे अधिकाऱ्याने पीटीआयला सविस्तर माहिती दिली आहे. “आपल्या देशात लवकरच टिल्टिंग रेल्वे येणार आहेत. हे तंत्रज्ञान भारतात आणण्यासाठी आपण लवकरच करार करणार आहोत. आगामी दोन ते तीन वर्षांत साधारण १०० वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये या टिल्टिंग तंत्रज्ञानाचा समावेश केला जाईल,” असे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : मतदानाचे वय १८वरून १६ वर्षे का केलं जातंय? जाणून घ्या न्यूझीलंड सरकारसमोरील अडचणी?

टिल्टिंग रेल्वेचा काय फायदा?

सामान्य रेल्वे जेव्हा वळण घेते तेव्हा रेल्वेमध्ये बसलेले प्रवासी एका बाजूने ओढले जातात. तर उभे राहिलेल्या प्रवाशांच्या तोल ढळतो. मात्र टिल्टिंग ट्रेनमध्ये प्रवाशांना ही अडचण जाणवत नाही. टिल्टिंग ट्रेनमध्ये मोशन कंट्रोल टेक्नॉलॉजी असते. या तंत्रज्ञानामुळे रेल्वे रुळावरून अधिक वेगाने धावण्यास मदत होईल.

टिल्टिंग ट्रेनसाठी आतापर्यंत काय प्रयत्न झाले?

याआधीही केंद्र सरकारने भारतीय रेल्वेंमध्ये ‘टिल्टिंग रेल्वे’ तंत्रज्ञानाचा समावेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे. २०१७ साली भारतीय रेल्वेने टिल्टिंग रेल्वे विकसित करण्यासाठी स्वित्झर्लंड देशाशी एक करार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत तंत्रज्ञानविषयक सहकार्य करण्याासाठी हा करार करण्यात आला होता. पीटीआयच्या वृत्तानुसार यासंबंधीचा पहिला करार २०१६ साली झाला होता. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि स्वित्झर्लंडचे राजदूतामध्ये हा करार झाला होता.

हेही वाचा >>> विश्लेषण: भारतातील निवडणुकांचा चेहरामोहरा बदलणारे टी. एन. शेषन कोण होते? त्यांनी कोणत्या सुधारणा केल्या?

आतापर्यंत कोणकोणत्या देशांत टिल्टिंग रेल्वे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताआधी अनेक देशांत टिल्टिंग रेल्वे सुरू आहेत. यामध्ये प्रामुख्याने इटली, पोर्तुगाल, स्लोव्हेनिया, फिनलंड, रशिया, रोमानिया, युके, स्वित्झर्लंड, चीन, जर्मनी या देशांमधील रेल्वेंमध्ये हे तंत्रज्ञान आहे. अमेरिकेमध्ये २००२ सालीच टिल्टिंग रेल्वे सुरू झालेल्या आहेत. Virgin Trains या कंपनीद्वारे या रेल्वे चालवल्या जातात.