-गौरव मुठे
ग्राहकांकडून वस्तू किंवा सेवा खरेदी करताना डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून व्यवहार केला जातो. अशा वेळी ग्राहकाला त्याच्या बँकेचा आणि संबंधित कार्डाचा तपशील व्यापाऱ्याला द्यावा लागतो. मात्र व्यापाऱ्याकडून बँकेशी संबंधित गोपनीय माहिती गहाळ होऊ शकते आणि त्या माहितीच्या आधारे सायबर भामटे खात्यातील पैसे काढून घेऊ शकतात. यासाठी कार्डाशी संबंधित सर्व माहिती सुरक्षित राहावी यासाठी ती सांकेतिक पद्धतीने (टोकन) साठवली जाते. थोडक्यात टोकनीकरण म्हणजे कार्डाच्या मूळ तपशिलाला टोकनने बदलणे होय. रिझर्व्ह बँकेच्या मते, टोकनीकरण कार्ड व्यवहार अधिक सुरक्षित असतात. डिजिटल व्यवहार प्रक्रियेदरम्यान मूळ कार्ड तपशील व्यापाऱ्याला अवगत केला जात नाही.

टोकनीकरण काय?

switching your exercise routine have several benefits
काही ठराविक महिन्यानंतर व्यायामामध्ये बदल करणे आवश्यक आहे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
tax harvesting in marathi
Money Mantra: टॅक्स हार्वेस्टिंग म्हणजे काय? त्याचा वापर कसा कराल? केव्हा टाळाल?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
toll plaza
विश्लेषण : भविष्यात टोलनाके बंद होणार? कशी असेल GPS आधारित नवी यंत्रणा?

सध्या, ऑनलाइन धाटणीच्या कार्ड व्यवहारांमध्ये, व्यापाऱ्यांसह अनेक संस्थांकडून ग्राहकांच्या कार्डाचा तपशील अर्थात कार्ड क्रमांक, समाप्तीची तारीख वगैरे ‘कार्ड-ऑन-फाइल’ तपशील जतन करून ठेवला जातो. जेणेकरून भविष्यात व्यवहार करताना कार्डधारकांना हा तपशील पुन्हा नमूद करावा न लागता, सोयीस्करपणे व अल्पवेळेत व्यवहार मार्गी लावणे शक्य बनते. परंतु अनेक व्यापारी संस्थांकडे अशा तऱ्हेने कार्डाचा तपशील असल्यामुळे तो चोरला जाण्याची अथवा त्याचा दुरुपयोग होण्याचा धोकाही वाढतो. शिवाय व्यापाऱ्यांकडूनच साठविलेल्या अशा तपशिलाबाबत हयगय आणि गैरवापर झाल्याची आणि कार्डधारकांना त्यातून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे कार्ड वितरण जाळे आणि कार्ड जारीकर्त्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही संस्थेस कार्डाचा तपशील जतन करता येणार नाही, असे निर्देश रिझव्‍‌र्ह बँकेने दिले आहेत. तसेच व्यापारी व देयक व्यवहार मंचांना कार्डचे सर्व तपशील हटवून, ग्राहकांच्या संमतीने ते ‘टोकन’रूपात बदलून घ्यावे लागणार आहेत.

रिझर्व्ह बँकेकडून टोकनीकरणासाठी मुदत वाढ कधीपर्यंत?

क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना त्यांच्या कार्डाचे चिन्हांकन अर्थात टोकनीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने आणखी तीन महिन्यांचा कालावधी देऊ केला आहे. कार्ड टोकनीकरणाची अंतिम मुदत तीन महिने पुढे म्हणजे ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी तिने जाहीर केला. या प्रक्रियेला दिली गेलेली ही तिसरी मुदतवाढ असून,  मध्यवर्ती बँकेने त्यासाठी ३० जून ही अंतिम मुदत निश्चित केली होती.

मध्यवर्ती बँकेकडून मुदतवाढ का?

व्यापारी व देयक व्यवहार मंचांना कार्डाचे सर्व तपशील हटवून, ग्राहकांच्या संमतीने ते टोकन रूपात बदलून घ्यावे लागण्याच्या या प्रक्रियेला मुदतवाढीची कारणमीमांसा रिझव्‍‌र्ह बँकेने नुकतीच केली आहे. विशिष्ट प्रकारच्या व्यवहारांच्या संदर्भात नव्या आदेशाच्या अंमलबजावणीशी संबंधित समस्यांकडे उद्योग क्षेत्राकडून लक्ष वेधण्यात आल्याचे तिने म्हटले आहे. तसेच, टोकन वापरून प्रक्रिया केलेल्या व्यवहारांची संख्या व्यापाऱ्यांच्या सर्व श्रेणींकडून अद्याप प्राप्त झालेली नाही, असे उद्योग क्षेत्राकडून सूचित केले गेले आहे. या समस्यांची दखल घेऊन त्यासंबंधी सर्व भागधारकांशी सल्लामसलत करून त्यांचे निराकरण केले जात असल्याचे रिझव्‍‌र्ह बँकेने म्हटले आहे. हा विस्तारित कालावधी व्यापारी संस्था व देयक उद्योगाद्वारे, टोकनीकृत व्यवहार हाताळण्यासाठी सर्व भागीदारांची सज्जता करण्यासाठी, टोकन-आधारित व्यवहारावर प्रक्रिया आखण्यासाठी, तसेच कार्डधारकांमध्ये जनजागृतीसाठी वापरात येईल, असा विश्वास रिझव्‍‌र्ह बँकेने व्यक्त केला आहे. टोकनीकृत कार्डाची एक पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या दिशेने या काळात पावले टाकली जातील, असेही मध्यवर्ती बँकेला अपेक्षित आहे.

टोकनीकरणाचा फायदा काय? ते कसे केले जाते?

टोकनीकरण झालेल्या कार्डामार्फत व्यवहार अधिक सुरक्षित समजले जातात. कारण, व्यवहार-प्रक्रियेदरम्यान प्रत्यक्ष कार्डावरील तपशील व्यापाऱ्याला दिला जात नाही. बँकेकडून म्हणजेच टोकन देणाऱ्या संस्थेकडून (टोकन रिक्वेस्टर) उपलब्ध करण्यात आलेल्या अॅपवर, एक विनंती टाकून कार्डधारक, ते कार्ड टोकनीकृत करून घेऊ शकतो. टोकन रिक्वेस्टर ती विनंती कार्ड नेटवर्ककडे पाठवेल व हे नेटवर्क, कार्ड देणाराच्या सहमतीने, कार्ड, टोकन रिक्वेस्टर व डिव्हाईस या तिघांच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीच्या आधारे एक टोकन देईल. ही सेवा पूर्णपणे नि:शुल्क असते.

टोकनीकरण केल्यानंतर ग्राहकाच्या कार्डावरील तपशील सुरक्षित असतो का?

प्राधिकृत कार्ड नेटवर्ककडून, प्रत्यक्ष कार्डावरील माहिती (डेटा), टोकन व संबंधित इतर तपशील सुरक्षित रितीने साठविली जात असते. टोकन रिक्वेस्टर, कार्डावरील क्रमांक किंवा कार्डाचा अन्य कोणताही तपशील साठवू शकत नाही. जागतिक पातळीवरील सर्वमान्य पद्धत अनुसरून कार्डाच्या सुरक्षेसाठी टोकन रिक्वेस्टर प्रमाणित करून घेणे कार्ड नेटर्वक्ससाठी बंधनकारक करण्यात आले आहे.

टोकन कसे मिळवाल?

बँकेच्या संकेतस्थळावर किंवा अॅपवर टोकन देण्याची मागणी करून कार्ड टोकन मिळवता येते. ग्राहकाने मागणी नोंदवल्यानंतर रिक्वेस्टर थेट क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेला विनंती पाठवेल (व्हिसा / मास्टरकार्ड / डिनर/ रुपे). टोकन रिक्वेस्टरकडून टोकन रिक्वेस्टर प्राप्त करणारी संस्था एक टोकन तयार करेल. जे टोकन रिक्वेस्टर आणि मर्चंटची संबंधित असेल.