Iran Strait of Hormuz: इराणने आण्विक तळांवर केलेल्या हल्ल्यांचा बदला म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. इराणची ही धमकी व्हाईट हाऊसने गांभीर्याने घेतली असून, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आधीच तेलाच्या किमती वाढू नयेत, अशी मागणी केली आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी इराणकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करणाऱ्या बीजिंगशी संपर्क साधल्याचे सांगितले आहे. अशा परिस्थितीत वॉशिंग्टन चिंतेत पडणे साहजिकच आहे. शेवटी तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, अशा प्रकारच्या निर्णयांमुळे जगभरात तेलाचे भाव गगनाला भिडू शकतात. मात्र, काही देशांना याची झळ सर्वाधिक पोहोचू शकते, त्यामध्ये प्रामुख्याने आशियातील देशांचा समावेश असेल.
जर इराणने अमेरिकेच्या अणुसूत्रांवर केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेतला, तर चीन, भारत, दक्षिण कोरिया व जपान या आशियाई देशांना त्रास सहन करावा लागेल. कारण- होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे जाणारे सुमारे ८४ टक्के तेल आशियात येते.
तज्ज्ञांच्या मते, पूर्व आशियातून आयात केल्या जाणाऱ्या तेलाच्या अर्ध्याहून अधिक तेलाचा पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे केला जातो. यूएस एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशन (EIA)नुसार, दररोज सुमारे १४.२ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आणि ५.९ दशलक्ष बॅरल इतर पेट्रोलियम उत्पादने या सामुद्रधुनीमार्गे जातात. म्हणजे जागतिक उत्पादनाच्या पहिल्या तिमाहीतील सुमारे २० टक्के, तसेच सौदी अरेबिया, यूएई, इराक, कुवेत, कतार आणि इराणमधील कच्चे तेल जवळजवळ केवळ याच कॉरिडॉरमधून जाते.
भारत
भारत होर्मुझच्या सामुद्रधुनीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. ईआयएच्या आकडेवारीनुसार, पहिल्या तिमाहीत या कॉरिडॉरमधून दररोज २.१ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले जाते. स्थानिक माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे की, २०२५च्या सुरुवातीला भारताने आयात केलेल्या तेलापैकी सुमारे ५३ टक्के तेल पश्चिम आशियाई पुरठादारांकडून त्यातही प्रामुख्याने इराक आणि सौदी अरेबियाकडून आले होते. पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाची काळजी घेत केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षांत रशियन तेलाची आयात वाढवली आहे. “आम्ही गेल्या दोन आठवड्यांपासून पश्चिम आशियातील विकसित होणार्या भू-राजकीय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. गेल्या काही वर्षांत आम्ही आमच्या पुरवठ्यात विविधता आणली आहे आणि आता आमचा मोठा पुरवठा होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे येत नाही. आमच्या नागरिकांना इंधनाच्या पुरवठ्यात स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आवश्यक ती पावलं उचलू”, असे भारताचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी रविवारी सांगितले.
दक्षिण कोरिया
दक्षिण कोरियाच्या कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे ६८ टक्के तेल होर्मुझच्या सामुद्रधुनामार्गे जाते. या वर्षी दररोज १.७ दशलक्ष बॅरल एवढ्या तेलाचा पुरवठा त्या मार्गाने केला गेला आहे. दक्षिण कोरिया विशेषत: त्याच्या मुख्य पुरवठादार सौदी अरेबियावर अवलंबून आहे. सेऊलच्या व्यापार आणि ऊर्जा मंत्रालयाने म्हटले आहे की, दक्षिण कोरियाच्या कच्च्या तेल आणि एलएनजी आयतीत आतापर्यंत कोणताही अडथळा आलेला नाही. माक्र पुरवठ्याबाबत संकटाची शक्यता लक्षात घेता, आम्ही संभाव्य अडथळ्यांसाठी नियोजन करीत आहोत.
“सरकार आणि उद्योगातील भागधारकांनी सुमारे २०० दिवसांच्या पुरवठ्याइतका धोरमात्मक पेट्रोलियम साठा राखून आपत्कालीन परिस्थितीसाठी तयारी केली आहे, असेही मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
चीन
पूर्व आशियातून आयात होणाऱ्या तेलाच्या अर्ध्याहून अधिक तेल हे होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे चीनला जाते, असा अंदाज तज्ज्ञांचा आहे. ईआयएनुसार, या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत होर्मुझमधून दररोज ५.४ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात करणारा चीन हा सर्वांत मोठ्या खरेदीदारांपैकी एक आहे. सौदी अरेबिया हा चीनचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार आहे. सोदी अरेबिया त्याच्या एकूण तेल आयातीपैकी १५ टक्के, दररोज १.६ दशलक्ष बॅरल तेलाची आयात करतो. विश्लेषण फर्म केप्लरच्या मते, चीन इराणमधून आयात केल्या तेलापैकी ९० टक्क्यांहून अधिक तेल निर्यात करतो. एप्रिलमध्ये त्यांनी दररोज १.३ दशलक्ष बॅरल इराणी कच्चे तेल आयात केले, जे मार्चमधील पाच महिन्यांच्या उच्चांकापेक्षा कमी आहे.
जपान
ईआयएनुसार, जपानने होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे दररोज १.६ दशलक्ष बॅरल कच्चे तेल आयात केले. जपानी सीमाशुल्कांच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी ९५ टक्के कच्च्या तेलाची आयात पश्चिम आशियातून झाली होती. देशाच्या ऊर्जा मालवाहतूक कंपन्या सामुद्रधुनीच्या संभाव्य नाकेबंदीसाठी सज्ज आहेत. “आम्ही सध्या आखातात आमच्या जहाजांचा वेळ शक्य तितका कमी करण्यासाठी उपाययोजना करrत आहोत”, असे शिपिंग दिग्गज मित्सुइ ओएसकेने म्हटले आहे.

पहिल्या तिमाहीत दररोज होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे जाणारे सुमारे २० लाख बॅरल कच्चे तेल आशियातील इतर भागांसाठी म्हणजेच प्रामुख्याने थायलंड आणि फिलीपिन्स, तसsच युरोप आणि अमेरिकेत पाठवfण्यात आले होते. आशियाई देश त्यांच्या तेल पुरवठादारांमध्ये विविधता आणू शकतात. मात्र, पश्चिम आशियातून येणाऱ्या तेलाची मोठ्या प्रमाणात भरपाई करणे कठीण आहे. सौदी अरेबिया आणि यूएईकडे सामुद्रधुनीतून जाण्यासाठी पायाभूत सुविधा आहेत. त्यामुळे तसा व्यत्यय कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यांची वाहतूक क्षमता दररोज सुमारे २.६ दशलक्ष बॅरल एवढी म्हणजे खूपच मर्यादित आहे. गेल्या वर्षापासून निष्क्रिय असलेल्या ओमानच्या आखातातून निर्यात करण्यासाठी इराणने बांधलेली गोरेह-जास्क पाइपलाइनची कमाल क्षमता दररोज फक्त तीन लाख बॅरल एवढी आहे.
कच्चे तेल व वायूच्या व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग असलेल्या ‘होर्मुझ खाडी’ची (सामुद्रधुनी) नाकेबंदी करण्याच्या निर्णयाला इराणच्या कायदे मंडळाने मान्यता दिली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय सुरक्षा समितीवर सोपविण्यात आल्याचे वृत्त इराणच्या प्रेस टीव्हीने प्रसिद्ध केले आहे. इराणने हा मार्ग बंद केला, तर त्याचा भारतासह जगभरातील अनेक देशांच्या इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल. अनेक तज्ज्ञांनी अंदाज व्यक्त केला होता की, इराण इतके टोकाचे पाऊल (होर्मुझ जलमार्ग बंद करणे) उचलणार नाही. मात्र, आता इराणने त्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अरागची यांना होर्मुझबद्दल विचारल्यावर ते म्हणाले “इराणकडे विविध पर्याय उपलब्ध आहेत”