नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात NSE ने पंकज सोनू (Pankaj Sonu) नावाच्या व्यक्तीबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. NSE ने सांगितले की, हा व्यक्ती विविध स्किमच्या आधारे गुंतवणूकदारांकडून पैसे घेऊन त्यांना अधिक फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवत आहे.

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) ने गुंतवणूकदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंकज सोनू नामक व्यक्ती ‘ट्रेडिंग मास्टर’ या नावाची संस्था चालवतो. यो दोन्हींपासून गुंतवणूकदारांनी लांब राहावे, असे एनएसईने सांगितले आहे. पंकज सोनू हा भोळ्या गुंतवणूकदारांशी संपर्क साधतो आणि त्यांना स्टॉक मार्केटच्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परतावा देण्याचे आमिष दाखवतो. तसेच गुंतवणूकदारांनी त्यांच्या ट्रेडिंग खात्याचे लॉगिन डिटेल्स शेअर करावे, जेणेकरून तो स्वतः गुंतवणूकदारांच्या वतीने व्यवहार करू शकेल, अशी बतावणीदेखील या सोनूकडून करण्यात येते.

arvind kejriwal
अरविंद केजरीवालांचे वजन घटले नाही, तर १ किलो वाढले? भाजपा नेत्याच्या दाव्याने चर्चांना उधाण!
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
High class houses out of MHADA lottery Thinking of stopping construction of expensive houses from now on
म्हाडा सोडतीतून उच्च गटातील घरे बाद? यापुढे महागड्या घरांची निर्मिती थांबवण्याचा विचार
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त

पंकज सोनू आणि ट्रेडिंग मास्टर काय आहे?

२०२१ साली स्थापन झालेल्या ट्रेडिंग मास्टरने दावा केला होता की, त्यांच्या कंपनीने स्वयंचलित ट्रेडिंग सेवा देणारे तंत्रज्ञान विकसित केले असून ट्रेडिंग मास्टर त्याद्वारे वित्तीय सेवा देत आहे. नोएडा, उत्तर प्रदेश येथे स्थित असलेल्या या कंपनीच्या वेबसाईटने असाही दावा केला की, त्यांच्याकडे आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स (AI) प्रोग्रामिंग तंत्रज्ञान आहे आणि त्या माध्यमातून खात्रीशीर परतावा मिळतो.

गेल्या वर्षी कंपनीने मास्टर बॉट लाँच केला होता. AI सक्षम असलेले हे बॉट गुंतवणूकदारांना स्टॉक मार्केटमध्ये खरेदी आणि विक्रीचे संकेत देण्यात मदत करेल, असे सांगण्यात आले होते.

मोडस ऑपरेंडी कशी आहे?

सोनू लोकांना भूलथापा देऊन सिक्युरिटीज मार्केटमध्ये चांगला परतावा मिळतो, असे सांगून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत आहे. असे आश्वासन या क्षेत्रात कार्यरत असलेल्या लोकांना देता येत नाही. त्यामुळे पंकज सोनू दिशाभूल करून जनतेकडून पैसे उकळत आहे. त्याचबरोबर सोनू गुंतवणूकदारांना त्यांचे लॉगिन डिटेल्स आणि पासवर्ड शेअर करण्यास सांगून त्यांचे ट्रेडिंग खाते हाताळण्याची ऑफर देत असल्याचे सांगितले जात आहे.

सोनूसारख्या बोगस लोकांनी संपर्क केल्यावर काय कराल?

एनएसईने गुंतवणूकदारांना याबाबत आधीच सूचना देऊन सावध केलेले आहे. शेअर बाजारातील गुंतवणुकीवर परताव्याची हमी देणाऱ्या सोनू किंवा कोणत्याही घटकाने ऑफर दिल्यास अशा कंपनीचे किंवा योजनेचे सदस्यत्व घेऊ नये, असे एनएसईने सूचित केलेले आहे. तसेच गुंतवणूकदारांनी त्यांच्या डिमॅट किंवा ट्रेडिंग खात्याचा तपशील, लॉगिन डिटेल्स कुणासोबतही शेअर करू नयेत, असेही सांगण्यात आले आहे.

पंकज सोनू किंवा ट्रेडिंग मास्टरसारखे ब्रोकर हे एनएसईमध्ये अधिकृत नोंदणी झालेले नाहीत, असेही एनएसईने आपल्या निवेदनात सांगितले आहे.

पंकज सोनूसारख्या बोगस व्यक्तीवर विश्वास ठेवला तर काय होईल?

एनएसईने स्पष्ट केले की, अशा भूलथापा देणाऱ्या आणि प्रतिबंधित असलेल्या स्कीममध्ये पैसे गुंतविल्यास त्याची संपूर्ण जोखीम ही गुंतवणूकदारांची आहे. अशा स्कीममध्ये गुंतवलेला पैसा आणि परिणाम याला मान्यता दिली जात नाही. जर अशा स्कीममध्ये गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले असल्यास त्यांना पुढील लाभ मिळणार नाहीत.

  • एनएसईच्या अधिकारक्षेत्रात गुंतवणूकदारांच्या संरक्षणाचे फायदे
  • एएसईची वादनिराकरण यंत्रणा
  • एनएसईची गुंतवणूकदार तक्रारनिवारण यंत्रणा