पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणातील फरार आरोपी मेहुल चोक्सीला मोठा दिलासा मिळाला आहे. चोक्सीचे नाव इंटरपोलच्या रेड नोटीसच्या माहितीसंचातून (डेटाबेस) काढून टाकण्यात आले आहे. याच कारणामुळे भारतातून पळून गेलेल्या लोकांची नव्याने चर्चा होत आहेत. कथित मुस्लीम धर्मगुरू झाकीर नाईक हासुद्धा यापैकीच एक असून भारताकडून त्याचा शोध घेतला जात आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात कतार येथे पार पडलेल्या फिफा वर्ल्ड कपदरम्यान नाईकला आमंत्रित करण्यात आल्याचा दावा केला जात होता. मात्र आम्ही नाईकला आमंत्रित केलेले नाही, असे स्पष्टीकरण कतारने दिले होते. याच पार्श्वभूमीवर झाकीर नाईक कोण आहे? त्याच्यावर काय आरोप आहेत? हे जाणून घेऊ या.

हेही वाचा >>>> विश्लेषण : खड्डे खोदून विनाकारण होणारे नुकसान टळणार; जाणून घ्या, ‘Call Before u Dig’ ॲपची वैशिष्टे

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
transgender votes went from 32 to 28 in 24 hours difference in figures given to candidate
तृतीतपंथयांची मते २४ तासात ३२ वरून २८ वर, उमेदवाराला दिलेल्या आकडेवारीत तफावत
murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
Pune Police Arrest Nigerian Woman in Mumbai for Mephedrone Smuggling
मेफेड्रोन तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांची कामगिरी; मुंबईत नायजेरियन महिलेला अटक

झाकीर नाईक कोण आहे?

झाकीर नाईक (५७) मुस्लिम धर्मगुरू असल्याचा दावा करतो. २०१६ साली त्याने भारतातून पलायन केले. आर्थिक गैरव्यवहार आणि समाजात द्वेष पसरवण्याचे त्याच्यावर आरोप आहेत. झाकीर नाईकने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत. माझ्या वक्तव्यांचा विपर्यास करण्यात आला. तसेच माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असा दावा झाकीर नाईककडून केला जातो. झाकीर नाईकची भाषणं ‘पीस टीव्ही’ या चॅनेलवर प्रदर्शित केली जायची. मात्र कॅनडा, ब्रिटन, बांगलादेश तसेच भारतात या चॅनेलवर बंदी घालण्यात आलेली आहे. झाकीर नाईकचा जन्म मुंबईत झालेला आहे. तो उच्चशिक्षित असून त्याने वैद्यकशास्त्रातील एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. वयाच्या २० व्या वर्षांपासून तो धार्मिक कार्यक्रमांत भाग घ्यायचा. पुढे त्याने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (आयआरएफ) नावाच्या संघटनेची स्थापना केली. या संघटनेवर भारतात बंदी आहे.

हेही वाचा >>>> विश्लेषण : चढाओढीच्या राजकारणामुळे डोंबिवलीचा सांस्कृतिक चेहरा हरवतोय?

धार्मिक द्वेष पसरवल्याचा आरोप

२०१६ साली ढाका येथील एका कॅफेवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात २२ लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपीने झाकीर नाईकच्या भाषणातून मला प्रेरणा मिळालेली आहे, असे विधान केले होते. त्यानंतर नाईक जगभरात चर्चेचा विषय बनला. त्याच वर्षी दहशतवादविरोधी पथकाने नाईकविरोधात गुन्हा दाखल केला होता. समजात धार्मिक द्वेष पसरवणे तसेच अन्य बेकायदेशीर गोष्टींना पाठिंबा दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे.

हेही वाचा >>>> विश्लेषण : अनिल जयसिंघानीच्या अटकेमुळे पोलीस-सट्टेबाज संबंध पुन्हा अधोरेखित?

भारतात आयआरएफ संघटनेवर बंदी

१७ नोव्हेंबर २०१६ रोजी नाईक याच्या आयआरएफ संघटनेवर बंदी घालण्यात आली. हीच बंदी नोव्हेंबर २०२१ मध्ये पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली. आयआरएफ संघटनेकडून देशाच्या सुरक्षेला धोका आहे. तसेच या संघटनेकडून देशातील शांतता, जातीय सलोखा बिघडवण्याचे काम केले जाते, असा आरोप करण्यात आलेला आहे.

हिंदू आणि चीनी समुदायाला उद्देशून केली होती आक्षेपार्ह टिप्पणी

नाईक याच्या संघटनेवर बंदी घालण्यात आल्यानंतर पुढे तो मलेशियामध्ये पळून गेला. सध्या झाकीर नाईक मलेशियामध्येच वास्तव्यास आहे. भारत सरकारकडून नाईकच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न केला जात आहे. मात्र अद्याप भारताला यात समाधानकारक यश मिळालेले नाही. इंटरपोलने नाईकविरोधात रेड नोटीस जारी करण्यास नकार दिलेला आहे. झाकीर नाईकने मलेशियामध्ये हिंदू आणि चीनी समुदायाला उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. पुढे त्याने या प्रकरणात माफीदेखील मागितली होती. मात्र २०१९ साली मलेशिया सरकारने त्याच्यावर सार्वजनिक ठिकाणी बोलण्यास बंदी घातली.

हेही वाचा >>>> विश्लेषण : हुंडा दिला म्हणून मुलीचा वडीलांच्या संपत्तीवर अधिकार उरत नाही? उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल

झाकीर नाईकचे भारत सरकारवर गंभीर आरोप

दरम्यान, झाकीर नाईकने २०२० साली भारत सरकारवर गंभीर आरोप केले होते. कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला पाठिंबा दिल्यास, भारताकडून माझ्यावर कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासन भारत सरकारने दिले होते, असा आरोप नाईकने केलेला आहे. झाकीर नाईक अद्याप मलेशियामध्ये असून त्याचे प्रत्यार्पण करण्याचा भारत सरकारकडून प्रयत्न केला जात आहे.