पँगाँग त्सोच्या काठावर १४,३०० फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. पँगाँग सरोवर भारत आणि चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आहे. हे सरोवर सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. भारतीय लष्कराने २६ डिसेंबर रोजी तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला आणि दोन दिवसांनी ही घोषणा केली. पूर्व लडाखमधील पँगाँग तलावाच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजीचा पुतळा बसवणे महत्त्वाचे मानले आहे. कारण- ते चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) आहे. परंतु, काही स्थानिकांनी लडाखच्या संस्कृतीशी त्याच्या प्रासंगिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. हा नवा वाद नक्की आहे तरी काय? या प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे महत्त्वाचे का मानले जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

लडाखमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

भारतीय लष्कराच्या लेह येथील १४ कॉर्प्सला फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्स म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी शनिवारी (डिसेंबर २८) पुतळ्याच्या उद्घाटनाची घोषणा केली आणि म्हटले की ते मराठा योद्धाच्या ‘अटूट आत्म्याचा’ उत्सव साजरा करतात. “शौर्य, दूरदृष्टी व अतूट न्यायाचे प्रतीक असलेल्या या पुतळ्याचे उद्घाटन जनरल ऑफिसर कमांडिंग फायर अॅण्ड फ्युरी कॉर्प्स लेफ्टनंट जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते करण्यात आले. ते मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कर्नलदेखील आहेत,” असे ‘एक्स’वरील पोस्टमध्ये सांगण्यात आले आहे. “हा कार्यक्रम भारतीय शासकाच्या अविचल भावनेचा उत्सव साजरा करतो, ज्यांचा वारसा पिढ्यान् पिढ्यांना प्रेरणा देणारा आहे,” असेही त्यात लिहिण्यात आले आहे.

हेही वाचा : इस्रो इतिहास रचणार; अंतराळात जोडणार दोन स्पेसक्राफ्ट, ‘Spadex Mission’ भारतासाठी किती महत्त्वाचे?

‘पीटीआय’ वृत्तसंस्थेने नमूद केल्याप्रमाणे, हा विकास आधुनिक लष्करी क्षेत्रामध्ये भारताच्या प्राचीन सामरिक कौशल्य समाकलित करण्याच्या लष्कराच्या अलीकडील प्रयत्नांदरम्यान झाला आहे. देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श मानणारा वर्ग मोठा आहे. उत्तरेकडील सीमेवरील अत्यंत आव्हानात्मक भागात हा पुतळा उभारणे म्हणजे देशाचे सामर्थ्य दर्शविण्यासारखे आहे. चीन आणि भारत यांच्यात झालेल्या युद्धानंतर या भागात अनेकदा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या भागात महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे म्हणजे ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे.

पुतळ्यावरील वाद काय?

हा पुतळा उभारताना चुशुल कौन्सिलर कोंचोक स्टॅनझिन यांनी स्थानिक समुदायांशी सल्लामसलत न केल्याबद्दल निराशा व्यक्त करण्यात आली आहे. “एक स्थानिक रहिवासी म्हणून मी पँगाँग येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल माझ्या चिंता व्यक्त करणे आवश्यक आहे. हा पुतळा स्थानिक मते विचारात न घेता उभारण्यात आला होता आणि मी आमच्या अद्वितीय पर्यावरण व वन्यजीव यांच्याशी त्या घटनेला जोडतो आहे. आपल्या समाजाचे आणि निसर्गाचे खरोखर प्रतिबिंब व आदर करणाऱ्या प्रकल्पांना आपण प्राधान्य देऊया,’ असे ट्वीट त्यांनी केले. काही लष्करी दिग्गजांनी असेही म्हटले आहे की, हा पुतळा डोगरा जनरल जोरावर सिंग यांचा असावा. १९ व्या शतकात लडाख जिंकण्यासाठी त्यांनी जम्मूच्या डोग्रा आर्मीचे नेतृत्व केले होते.

द ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, १८३४ व १८४० मधील जनरल सिंग यांच्या लष्करी मोहिमेला पूर्वीच्या लडाख राज्याचे डोगरा साम्राज्यात विलीनीकरण करण्यामुळे श्रेय दिले जाते. हे राज्य लाहोरचे महाराजा रणजीत सिंग यांनी शासित असलेल्या शीख साम्राज्याचा भाग होते. लष्करी कारवाईमुळे लडाख जम्मू आणिव काश्मीरच्या पूर्वीच्या संस्थानात सामील झाला आणि सध्याच्या पूर्व लडाखच्या सीमा तयार झाल्या. काहींनी शिवाजी महाराजांचा सन्मान करण्याच्या भारतीय लष्कराच्या निर्णयाचे स्वागत केले आहे; तर टीकाकारांनी या प्रदेशात जनरल जोरावर सिंग यांचा वारसा ओळखून त्यांचे स्मरण करण्याचे आवाहन केले आहे. स्थानिक विरोधकांचे म्हणणे आहे की, या पुतळ्यात सांस्कृतिक रूप आणि परिसंस्थेची छाप दिसायला हवी होती. स्थानिकांचे असेही सांगणे आहे की, या प्रदेशातील विशिष्ट पर्यावरण आणि प्राणिजीवन पाहता, पुतळा उभरण्याआधी आमची मते जाणून घेणे आवश्यक होते; परंतु तसे केले गेले नाही.

हेही वाचा : ‘ब्लॅक मून’ म्हणजे काय? या दुर्मिळ घटनेमागील रहस्य आणि विज्ञान काय सांगते?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुतळ्याचे स्थान महत्त्वाचे का?

पूर्व लडाखमधील नयनरम्य पँगाँग त्सोच्या किनाऱ्यावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला भारताच्या चीनबरोबरच्या अलीकडील सीमा तोडण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्व आहे. १३५ किलोमीटर लांब असलेला मोक्याचा तलाव दोन शेजारी देशांमधील वास्तविक सीमा म्हणजेच एलएसीवर आहे. ऑक्टोबरमध्ये भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील एलएसी येथे डेमचोक व डेपसांग या दोन संवेदनशील क्षेत्रातील सैन्य काढून टाकण्याचे काम पूर्ण केले. पँगाँग लेक परिसरात भारतीय आणि चिनी सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर एलएसीच्या अनेक ठिकाणी २०२० मध्ये निर्माण झालेल्या सुमारे साडेचार वर्षांच्या सीमावादाचा अंत झाला. लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या मालिकेनंतर दोन्ही बाजूंनी २०२१ मध्ये पँगाँग त्सोच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर तोडफोड पूर्ण केली. चीनबरोबरच्या सीमेवरील तणावापासून भारतीय सैन्याने लडाखमध्ये रस्ते आणि पूल बांधण्यासह पायाभूत सुविधांना बळ दिले आहे.