मनोरंजनसृष्टीत असे बरेच कलाकार आहेत जे चर्चेत राहण्यासाठी कोणत्याही थराला जातात. राखी सावंतपासून उर्फी जावेदपर्यंत कित्येक अभिनेत्री ज्या पद्धतीने सोशल मिडीयावर सक्रिय असतात ते पाहून आपल्यालाही कधी कधी त्यांची कीव येते. राखी आणि उर्फीसारख्या मॉडेल्स या गोष्टी फक्त चर्चेत राहण्यासाठी करतात ही गोष्ट आपण मान्य करतो. पण बॉलिवूडमधील काही मुख्य प्रवाहातील कलाकारसुद्धा आता या वादंगामध्ये वरचेवर पडताना आपल्याला दिसत आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे रणवीर सिंग.

अभिनेता रणवीर सिंग हे नाव ऐकलं की आपल्या प्रत्येकाच्या चेहेऱ्यावर विचित्र हावभाव येतात. काहींना तो अभिनेता म्हणून आवडतो तर काहींना खटकतो. काही लोक त्याच्या फॅशनची प्रशंसा करतात तर काही त्याला खालच्या थराला जाऊन डिवचतात. पण तरीही रणवीरला जे हवंय तेच तो करतो. मग ते भर मंचावर दीपिकाला कीस करणं असो, विचित्र कपडे घालणं असो किंवा आहे ते कपडे काढून न्यूड फोटोशूट करणं असो. रणवीर हा कायम चर्चेचा भाग असतोच. म्हणूनच सध्या वादंग म्हणजे रणवीर सिंग हे समीकरण रूढ झालं आहे.

आणखी वाचा : “भारतीय प्रेक्षक खूप…” अभिनेता, दिग्दर्शक रिषभ शेट्टीने उलगडलं ‘कांतारा’च्या यशामागील रहस्य

नुकतीच रणवीरने नवीन अॅस्टन मार्टिन गाडी घेतली आणि सोशल मीडियावर त्याचीच चर्चा रंगू लागली. या गाडीसह नुकतंच रणवीरला विमानतळावर पाहिलं गेलं आणि कॅमेऱ्यात त्याच्या गाडीचा नंबर कैद झाला. हा नंबर जसा बाहेर आला तसं एक वृत्त तातडीने समोर आलं ते म्हणजे रणवीर चालवत असलेल्या गाडीचं रजिस्ट्रेशन संपलं आहे.

रणवीर खुद्द ती आलीशान गाडी चालवत जातानाचा विमानतळावरील तो व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला. गाडीचं रजिस्ट्रेशन संपल्याचा दावा नेटकरी करू लागले. काहींनी तर थेट मुंबई पोलिसांना टॅग करून रणवीर विरोधात कडक कारंवाई करण्याच्या मागणी केली. याबरोबरच आणखी कुणीतरी रणवीरच्या या गाडीचा इन्शुरन्सदेखील नसल्याचं समोर आणलं आणि या वादात आणखी भर पडली.

या गोष्टीवर सर्वप्रथम रणवीरने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. उलट थोड्याच वेळात रणवीरच्या गाडीचा विमा बरोबर असल्याचं एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झालं आणि सोशल मीडियावर रणवीरला ट्रोल करणाऱ्यांची तोंडं आपोआपच बंद झाली. रणवीरच्या या गाडीबद्दल ज्या व्यक्तीने ही खोटी माहीती पसरवण्याचा प्रयत्न केला होता त्या व्यक्तीने ते ट्वीट डिलिट करून ट्विटरवरच रणवीरची माफीदेखील मागितली.

आणखी वाचा : जाऊ द्या की ओ! सेलिब्रिटींनी ‘ट्रोलधाड’ जरा सबुरीनं घेण्याची गरज कारण…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘कॉफी विथ करण’मध्ये जाऊन आपल्या वैवाहिक जीवनातील खासगी गोष्टींबाबत खुलासा करणं, आपल्याच बायकोचे कपडे घालून फोटोसेशन करणं, चित्रविचित्र कपडे घालून मिरवणं, किंवा कसल्याही परिणामांची परवा न करता विवस्त्र होऊन फोटोशूट करणं अशा कित्येक वादग्रस्त कृतींची यादी रणवीर सिंग या नावापुढे लागते. यासगळ्याच रणवीरवर काहीच परिणाम होत नाही. एका वादानंतर तो पुढच्या वादासाठी कायम तयार असतो. भले ते वाद त्याने स्वतःहून ओढवून घेतलेले नसतात तरी तो त्याकडे कानाडोळा करतो.