मार्च महिन्याच्या सुरुवातीला गोव्यातील जंगलात मोठा वणवा पेटला. वणव्यामुळे जवळपास चार स्क्वेअर किमीवरील जंगलाची हानी झाली. वनविभागाने या वणव्यानंतर याच्या कारणांचा शोध घेतला आणि त्याचा अहवाल केंद्र सरकारला सुपूर्द केला. या अहवालानुसार सदर वणवा नैसर्गिक कारणांमुळे पेटला असल्याचे सांगण्यात आले. प्रदीर्घ काळापासून असलेले कोरडे वातावरण, अभूतपूर्व अशी तापमान वाढ, कमी दमटपणा यामुळे राज्यात तुरळक प्रमाणात आगीचे प्रकार घडत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. महादेई वन्यजीव अभयारण्यात वणवा पेटल्यानंतर हवाई दल आणि नौदलाच्या हेलिकॉप्टर्सनी अनेक फेऱ्या मारून आगीवर पाण्याचा शिडकाव करीत ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. आग लागलेले ठिकाण डोंगररांगांत असल्यामुळे तिथे पोहोचणे कठीण असल्याकारणाने हेलिकॉप्टरद्वारे पाणी शिंपडून आग विझवण्याचा प्रयत्न झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनविभागाकडून आगीसाठी नैसर्गिक कारणांना जबाबदार धरले जात असले तरी विरोधकांनी मात्र यामागे मनुष्याचा हात असून स्वार्थी हितसंबंध जपण्यासाठी जाणूनबुजून हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप केला गेला. याच महिन्यात दक्षिण गोवा येथे पुन्हा एकदा आग लागल्याचा प्रकार घडल्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाओ (Yuri Alemao) यांनी गंभीर आरोप करताना सांगितले की, पारोडा टेकडी आणि चपोली धरण परिसरात लागलेल्या आगीमागे फायर माफियाचा हात आहे. या आगीच्या घटना एकमेकांपासून वेगळ्या नाहीत. रिअल इस्टेटसाठी जमीन मिळावी, यासाठी पद्धतशीरपणे हरितपट्ट्यांचा नाश करण्यात येत आहे, असा आरोप आलेमाओ यांनी केला.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why did goa see forest fires in march what is reason behind this kvg
First published on: 08-05-2023 at 10:33 IST