एचआयव्ही एड्सचे निदान झाल्यानंतर आता मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मागच्या ३० वर्षात औषधांच्या क्षमतेमध्ये कमालीची वाढ झाल्यामुळे उपचारात सुधारणा झाली आहे. जगभरात अनेक ठिकाणी एड्सवरील औषधे मोफत मिळतात. एड्सवर उपचार केलेले रुग्ण एक सामान्य, सुखी आणि आरोग्यदायी जीवन जगू शकतात. जे रुग्ण औषधे घेत आहेत ते कोणत्याही भीती शिवाय आपल्या जोडीदारासोबत लैंगिक संबंध ठेवू शकतात. एचआयव्ही या विषाणूवर गेली अनेक वर्ष काम करणाऱ्या डॉक्टरांनी DW (Deutsche Welle) या संकेतस्थळाला सांगितले की, जॉन्सन आणि जॉन्सनच्या लसीच्या चाचणीत अलीकडे अपयश आले, ही बातमी निराशाजनक असली तरी हा काही जगाचा शेवट नाही. क्लेअर रोथ यांनी आपले अनुभव इंडियन एक्सप्रेसच्या संकेतस्थळावर कथन केले आहेत. त्यासंबंधी घेतलेली ही माहिती.

अमेरिकेच्या फार्मास्युटिकल फर्मने जानेवारीमध्ये एचआयव्ही वरील लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या थांबविल्या. एचआयव्हीचा संसर्ग रोखण्यात सदर लशी निष्प्रभ ठरल्या होत्या. औषधांमध्ये संशोधन होत असले तरी एचआयव्हीची प्रकरणे हवी तितकी कमी होत नाहीत. उलट जगाच्या काही भागांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. युएनने मागच्या वर्षी जाहीर केलेल्या एका अहवालात सांगितले होते की, १.५ दशलक्षाहून अधिक लोकांना २०२१ मध्ये एचआयव्हीचा संसर्ग झाला होता. जागतिक स्तरावर रुग्णवाढीचा जो अंदाज होता, त्यापेक्षा तिपटीने ही संख्या अधिक आहे. आतापर्यंत व्हायरसने संक्रमित झालेल्या ३८ दशलक्ष रुग्णांपैकी सुमारे ७३ टक्के लोक उपचार घेत होते. तर १५ टक्के लोकांना हे माहितच नव्हते की, त्यांना संसर्ग झालेला आहे, असे या अहवालात म्हटले आहे. २०२१ मध्ये जगभरात एचआयव्ही आणि एड्स प्रतिबंध कार्यक्रमांना देण्यात येणाऱ्या निधीमध्ये कपात करण्यात आली म्हणून रुग्णसंख्या कमी होण्यात स्थिरता आल्याचे सांगितले जाते. पण हे पूर्णसत्य नाही.

tuberculosis marathi news, tuberculosis genetic sequencing marathi news
क्षयरोग उपचारामध्ये जनुकीय क्रमनिर्धारण महत्त्वपूर्ण, औषध प्रतिरोधकातील बदल समजण्यासाठी मदत
RRB Recruitment 2024
RRB Recruitment 2024: रेल्वे विभागात काम करण्याची सुवर्णसंधी; ८ हजारांवर टीटीई पदांसाठी बंपर भरती; ‘या’ तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

एड्सबाधितांची संख्या काही भागात का वाढतेय?

या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एड्सला रोखण्याचा सर्वत पहिली पायरी म्हणजे एखाद्याला याचा संसर्ग झाला आहे का? हे जाणून घेणे. परंतु समाजाच्या भीतीने लोक चाचणी करण्यास टाळाटाळ करतात. १९८० च्या दशकात एड्सला आळा घालण्यासाठी ज्या प्रकारची आरोग्य मोहीम राबविली गेली, त्या मोहिमेमुळे जगभरातील लोकांच्या मनावर या विषाणूबद्दल पूर्वग्रह मनात बसले आहेत. या विषाणूबद्दल नैतिकतेच्या धारणेतून विचार केला जातो. क्रोएशियामध्ये एचआयव्हीवर उपचार करणारे डॉक्टर जोसिप बेगोव्हॅक म्हणाले, लोकांना चाचण्या करायच्या नाही कारण त्यानंतर समाजकडून भेदभाव होईल या भीतीने त्यांना उपचार घ्यायचे नाहीत.

बेगोव्हॅक पुढे म्हणाले की, लैंगिक समस्यांनी ग्रस्त रुग्णांवर उपचाराकरीता असलेल्या एकात्मिक आरोग्य केंद्राकडे मात्र कलुषित नजरेने पाहिले जात नाही. अशा केंद्रावर सिफिलिस, गोनोरिया आणि क्लॅमिडीया अशा आजारांचे निदान करत असताना या केंद्रावर एचआयव्हीचा धोका असलेल्या लोकांपर्यंत पोहोचता येत आहे. क्रोएशियामध्ये उपचार एड्सचे उपचार घेणाऱ्या आणि विमा असणाऱ्या लोकांना मोफत उपचार दिले जात आहेत. मात्र जे स्थलांतरीत लोक क्रोएशियात आहेत, त्यांना विम्याशिवाय मोफत उपचार दिले जात नाहीत. विशेष म्हणजे क्रोएशियामध्ये केवळ एकच एचआयव्ही उपचार केंद्र आहे, त्यामुळे उपचार घेण्यासाठी लोकांना चार किंवा पाच तासांपर्यंतचा प्रवास करावा लागतो.

उपचारासाठी प्रवेश मिळाला, पण घर व नोकरी गमावली

हाँगकाँग मधील सामाजिक शास्त्राच्या प्राध्यापक हर्बरी च्युंग यांनी थायलंडमधील अविवाहीत मातांमधील एचआयव्हीच्या पुर्वग्रहाबाबतचे संशोधन केले आहे. त्यांनी सांगितले की, ग्रामीण दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना एचआयव्हीवरील उपचार घेण्यासाठी दूरवर प्रवास करावा लागतो. थाई प्रांतांमध्ये काही भागातील लोकांना उपचार केंद्रापर्यंत पोहोचायला एक पूर्ण दिवस लागतो. एखादी महिला एचआयव्ही केंद्रावर पोहोचल्यानंतर त्यांना मोफत उपचार दिला जातो. मात्र उपचार घेणे हे महिलेसाठी खूप त्रासदायक ठरते. त्या एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे गावात कळल्यानंतर त्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. रेस्टॉरंट्स किंवा मसाज पार्लरमध्ये काम करणाऱ्या महिलांना एचआयव्ही झाल्याचे कळताच कामावरुन काढून टाकण्यात आले होते. थायलंडमध्ये एचआयव्हीबाबत जरा वेगळी धारणा आहे. इथे बौद्ध धर्माचा प्रभाव आहे. इथे विषाणूला वाईट कर्म म्हणून पाहिले जाते, मागच्या जन्मात केलेल्या चुकींच्या कामांचे हे फळ आहे, अशी इथल्या लोकांची धारणा आहे.

च्युंग यांच्या यांच्या लक्षात आले की, थायलंडमध्ये एचआयव्हीचे निदान झालेल्या अनेक लोकांना त्यांच्या गावातून बहिष्कृत केले गेले. थायलंडमध्ये महिला आणि पुरुषांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण सारखेच आहे. तरिही बहुतेक वेळेला पुरुषी मानसिकतेमुळे हा महिलांचा आजार असल्याचे आहे, असे मानले जाते. याला कारण म्हणजे १९८४ मध्ये या विषाणूचा पहिला रुग्ण एक पाश्चात्य पुरुष होता. ज्याने एका थाई सेक्स वर्कर महिलेसोबत लैंगिक संबंध ठेवले होते.

मुलांना एचआयव्हीचा संसर्ग झाल्यास कुटुंबाची ओढाताण

सायरस मुगो हे केनिया मधील लहान आणि तरुण एचआयव्ही बाधित मुलांमध्ये काम करतात. त्यांचे म्हणणे आहे की, एचआयव्हीचे संक्रमण इथे शिक्षणावर परिणाम टाकणारे ठरते. केनियामध्ये २०१६ पासून एचआयव्हीवरील जीवरक्षक औषधे उपलब्ध झाली आहेत. मात्र एचआयव्हीग्रस्त असल्यामुळे अनेक पालकांच्या मुलांना वसतिगृहात प्रवेश दिला जात नाही. युनिसेफच्या मते, २०२० मध्ये केनियामध्ये ३५ टक्के नवीन एचआयव्ही संसर्ग मुलांमध्ये होतो.

एचआयव्हीवर उपचार कसा केला जातो

एचआयव्हीवरील उपचारामध्ये अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (एआरटी) नावाचे औषध दररोज घ्यावे लागते. एआरटी औषध १९९० च्या दशकात अनेक विकसित देशांमध्ये देण्यात येत होते. २००३ च्या दरम्यान विकसनीशल देशांमध्येही हे औषध उपलब्ध करुन देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे एचआयव्हीचा मृत्यूदर कमी करण्यासाठी हे उपचार खूप यशस्वी ठरत आहेत. तसेच एचआयव्हीवर आणखी एक उपचार पद्धती म्हणजे PrEP. तोंडाद्वारे घेण्यात येणारे हे औषध जगातील काही देशांमध्येच उपलब्ध आहे.