Republic Day Parade 2024 : भारत आज आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्तव्यपथावर (पूर्वीचे राजपथ) भारताच्या संरक्षण क्षमतेचे भव्य प्रदर्शन करण्यात आले आहे. त्यामध्ये भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना, पोलीस आणि निमलष्करी दलांच्या रेजिमेंट्स दिल्लीतील कर्तव्यपथावरील संचलनामध्ये सहभागी होतील. मात्र, भारतात २६ जानेवारी रोजी या संचलनाचे आयोजन का केले जाते? आणि मुळात संविधान स्वीकारण्याचा आणि लष्करी संचलनाचा काय संबंध आहे? तुम्हाला याबाबत काही माहीत आहे का? या लेखातून तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करू या.

हेही वाचा – प्रजासत्ताक म्हणजे नेमके काय? प्रजासत्ताक दिन २६ जानेवारीलाच का साजरा केला जातो? वाचा सविस्तर…

Iran Israel Attack Updates in Marathi
जप्त केलेल्या जहाजावरील १७ कर्मचारी भारतीय अधिकाऱ्यांना भेटणार, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी केलं स्पष्ट
Iran Israel Attack Updates in Marathi
Iran Israel Attack : इस्रायलवरील हल्ल्यानंतर भारताने जाहीर केली भूमिका; निवेदनात म्हटलं, “दोन्ही देशांतील शत्रूत्वाबद्दल…”
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…

लष्करी संचलनाचा इतिहास काय? :

प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतात लष्करी संचलनाचे आयोजन का केले जाते, हे समजून घेण्यापूर्वी या संचलनांचा इतिहास नेमका काय आहे? हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. काही ऐतिहासिक अहवालांनुसार प्राचीन काळात लष्करी संचलनाचा वापर आपली राजकीय आणि सैन्यशक्ती दाखवण्यासाठी केला जात असे. त्या काळी मेसोपोटेमियाच्या राजाने आपला विजय दर्शविण्यासाठी संपूर्ण शहरात भित्तीचित्रे लावली होती. तसेच बॅबिलोनमधील राजाने आपल्या सैन्यासह इश्तारच्या पवित्र आणि भव्य महाद्वारातून मार्गक्रमण केले होते.

रोमन साम्राज्याच्या काळात विजयी सैन्याने जेव्हा मार्स मैदानातून टेम्पल ऑफ ज्युपिटरकडे कूच केली, तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या जनतेने घोषणा देत त्यांचे स्वागत केले. ते एक प्रकारे लष्करी संचलनच होते. आपल्या राज्याची प्रतिष्ठा वाढवणे, तसेच राजकीय आणि सैन्यशक्तीचे प्रदर्शन करणे, हा त्यामागचा उद्देश होता.

जसजसा काळ लोटला, त्यानुसार या लष्करी संचलनाचे आधुनिकीकरण होत गेले आणि त्याचे स्वरूपही बदलले. प्रुशियाला (आजच्या जर्मनीचा एक भाग) आधुनिक लष्करी संचलनाचा प्रणेता म्हणून ओळखले जाते. खरे तर लष्करी संचलनामध्ये होणारी ‘गूज स्टेप’; जी पुढे हिटलरच्या नाझी सैन्याचे प्रतीक बनली, ती स्टेप प्रुशियाच्या सैन्यातून घेण्यात आल्याचे काही इतिहासकार सांगतात.
‘गूज स्टेप’ ही एक अशी विशिष्ट कृती असते; जी लष्करी संचलनादरम्यान सादर केली जाते.

भारत आणि लष्करी संचलन :

भारताला लष्करी संचलनाचा मोठा इतिहास आहे. ब्रिटिश काळात असे संचलन आणि मिरवणुका सातत्याने आयोजित केल्या जात असत. भारतीयांना आणि युरोपमधील आपल्या प्रतिस्पर्ध्यांना ब्रिटिश साम्राज्याचे सामर्थ्य दाखवणे हा यामागचा उद्देश होता. पुढे १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा भारतीय राज्यकर्त्यांनी अनेक ब्रिटिशकालीन परंपरा पुढेही सुरू ठेवल्या. त्यापैकीच एक लष्करी संचलन होती.

१९५० मध्ये भारताने संविधान स्वीकारले आणि भारत एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून उदयास आले. या दिवसाची आठवण म्हणून लष्करी संचलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ब्रिटिश राजवटीवरील भारताचा विजय आणि एका प्रजासत्ताक देशाच्या उदयाचे प्रतीक म्हणून हे लष्करी संचलन सुरू करण्यात आले होते. त्याशिवाय जगाला भारतीय लष्करी सामर्थ्य आणि आपल्या भूमीच्या रक्षणासाठी भारत सक्षम आहे, हे दाखवणे हादेखील एक उद्देश होता. त्यानुसार २६ जानेवारी १९५० रोजी भारताने आपले पहिले लष्करी संचलन आयोजित केले होते.

हेही वाचा – विश्लेषण : भारतात प्रजासत्ताक दिनासाठी येणाऱ्या प्रमुख पाहुण्यांची निवड कशी केली जाते? ही प्रक्रिया कधी सुरू होते?

महत्त्वाचे म्हणजे हे संचलन आयर्विन ॲम्फी थिएटर म्हणजे आताच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर आयोजित करण्यात आले होते. त्याचदरम्यान भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचा शपथविधीही पार पडला होता. आज ज्या प्रकारे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याप्रमाणेच पहिल्या प्रजासत्ताक दिनाला इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो उपस्थित होते. त्यानंतर १९५१ पासून हे संचलन राजपथ येथे आयोजित करण्यात येत आहे. आज त्याचे कर्तव्यपथ, असे नामकरण करण्यात आले आहे. पुढे काही वर्षांनी या संचलनामध्ये विविध राज्यांच्या संस्कृतींचे प्रदर्शन करणाऱ्या चित्ररथांचाही समावेश करण्यात आला. भारताच्या विविधतेतील एकता दाखवणे हा यामागचा उद्देश होता.

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी त्यांच्या ‘इंडिया आफ्टर गांधी’ या पुस्तकात भारताच्या पहिल्या लष्करी संचलनाचा उल्लेख केला आहे. पुस्तकात त्यांनी असे म्हटले आहे, “पहिल्या लष्करी परेडदरम्यान सशस्त्र दलातील तीन हजार जवानांनी राष्ट्रपतींसमोर पथसंचलन केले. त्यावेळी ३१ तोफांची सलामी देण्यात आली होती.”

इतर देशांतही लष्करी संचलन आयोजित केली जातात?

लष्करी संचलन आयोजित करणारा भारत हा एकमेव देश नाही. फ्रान्समध्ये दरवर्षी १४ जुलै रोजी बॅस्टिल दिनानिमित्त लष्करी संचलनाचे आयोजन केले जाते. १७८९ मध्ये बॅस्टिल तुरुंगात घडलेल्या घटनेच्या स्मरणार्थ हे संचलन आयोजित केले जाते. पुढे हीच घटना फ्रेंच राज्यक्रांतीला कारणीभूत ठरली होती. त्याशिवाय चीन, रशिया व उत्तर कोरिया या देशांमध्येही लष्करी संचलनाचे आयोजन केले जाते.