FIFA World Cup 2018 : रशियामध्ये आजपासून विश्वचषक स्पर्धेची धूम सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रत्येक गोष्टीचे नीट नियोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामन्यांसाठी वापरण्यात येणारा फुटबॉल हा ‘टेलस्टार १८’ या नाव ओळखला जात आहे. मात्र या फुटबॉलचे विशेष म्हणजे हा फुटबॉल अशा एका देशाने तयार केला आहे, ज्या देशाचा संघ या स्पर्धेत खेळत नाही. इतकेच नव्हे तर २०१४च्या फुटबॉल विश्वचषकातही याच देशात तयार करण्यात आलेला फुटबॉल वापरला गेला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

FIFA World Cup 2018 या स्पर्धेत वारपण्यात आलेला फुटबॉल हा पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आला आहे. पाकिस्तनामधील सियालकोट या शहरात हा फुटबॉल बनवण्यात आला असून ‘आदिदास’ या ख्यातनाम क्रीडा कंपनीने या फुटबॉल डिझाईन केला आहे. पाकिस्तनाचा संघ फिफा विश्वचषकात अद्याप खेळला नसला, तरीही फुटबॉलच्या रूपाने पाकिस्तान सामन्यांदरम्यान मैदानावर असणार आहे.

टेलस्टार हा फुटबॉल प्रथम १९७० साली मेक्सिको येथे वापरण्यात आला होता. ‘आदिदास’ने डिझाईन केलेला हा पहिला विश्वचषकातील फुटबॉल होता.

इतकेच नव्हे, तर २०१४ साली ब्राझीलमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील ‘ब्राझुका’ हा फुटबॉलदेखील पाकिस्तानातच बनवण्यात आला होता.

ब्राझुका या फुटबॉलने २०१४चा विश्वचषक खेळण्यात आला

 

दरम्यान, यंदाच्या विश्वचषकातील फुटबॉल नवे इतिहास घडवेल, असा विश्वास फिफाने व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व फिफा २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup 2018 official football made in pakistan by adidas
First published on: 14-06-2018 at 13:11 IST