गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. घराघरात उत्साह, सजावट आणि प्रसादाची लगबग सुरु झाली आहे. गणपती बाप्पााला नैवेद्यासाठी, प्रसादासाठी वेगवेगळे पदार्थ केले जातात. मोदक हा गणपतीचा आवडता मानला जातो, पण दरवर्षी फक्त मोदकच नव्हे तर इतर गोड पदार्थ बनवले तर सणाचा आनंद दुप्पट होतो. या गणेशोत्सवात तुम्हीही काही पारंपरिक आणि चविष्ट मिठाई बनवून बाप्पाला नैवेद्य दाखवू शकतात.

१.श्रीखंड

श्रीखंड साहित्य

  • सामग्री,
  • दही
  • पिठीसाखर
  • वेलची पूड
  • केशर –
  • सुका मेवा (बदाम, काजू, पिस्ते)

कृती

सर्वात आधी दही एका कपड्यात बांधुन ६-७ तास ठेवा ,त्यातील पाणी निघुन घट्ट दही तयार होईल ,त्यात साखर घालून छान हलवा. मग त्यात वेलची पूड आणि केशर टाका. त्यानंतर त्यात वरुन सुका मेवा टाका आणि सगळं एकत्र मिसळा. थोडा वेळ फ्रिजमध्ये ठेवा आणि नंतर थंडगार श्रीखंडचा बाप्पाला नैवेद्य द्या.

२.रवा लाडू

रवा लाडू साहित्य

  • सामग्री
  • रवा
  • साखर
  • तूप
  • वेलची पूड
  • सुका मेवा
  • बदाम, काजू, मनुका (बारीक चिरलेले)
  • दूध

कृती

कढईत तूप गरम करून त्यात रवा टाका .मंद गॅसवर रवा थो़डा लालसर होईपर्यंत आणि छान सुगंध येईपर्यंत भाजा. दुसऱ्या भांड्यात साखर आणि थोडं पाणी घेऊन पाक बनवा .भाजलेला रवा या पाकात टाका त्यात वेलची पूड आणि सुका मेवा मिसळा. मिश्रण अजून कोमट असतानाच १ चमचा दूध टाकुन हाताने लाडू वळा.छान गोडसर आणि सुगंधी रवा लाडू तयार!

३.कलाकंद

कलाकंद साहित्य

  • सामग्री
  • दूध
  • साखर
  • वेलची पूड
  • थोडंसं तूप

कृती

एक भांड्यात दु़ध टाका दूध गरम करायला ठेवा. दूध अर्धे होईपर्यंत आटवून घ्या. दूध उकळायला लागल्यावर त्यात लिंबू घालून दूध फाडून घ्या.पाणी आणि पनीर वेगळे करा. पनीर क्रश करून घ्या.या पनीरच्या मिश्रणात पिठी साखर आणि वेलची पूड घाला.या पनीरच्या मिश्रणात पिठी साखर आणि वेलची पूड घाला.हे मिश्रण मंद ते मध्यम आचेवर १५ ते २० मिनिटे शिजवा. मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर गॅस बंद करा.एका तूप लावलेल्या ताटलीमध्ये हे मिश्रण पसरवा आणि थंड झाल्यावर बर्फीच्या आकारात कापा.

४.पिस्ता बर्फी

पिस्ता बर्फी साहित्य

  • सामग्री
  • पिस्त्याची पेस्ट
  • दूध पावडर
  • साखर
  • चमचे तूप
  • वेलची पावडर

कृती

एका जाड कढईत तूप गरम करा. त्यात पिस्त्याची पेस्ट टाकुन मंद आचेवर २-३ मिनिटे परतून घ्या. त्यात मिल्क पावडर टाकुन नीट मिसळून घ्या. त्यात साखर घालून हलवत राहा जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत. ते घट्ट होईपर्यंत शिजवा. कढईच्या कडेने सुटायला लागल्यावर वेलची पावडर घालून मिसळा. एका तुप लावलेल्या ताटामध्ये ते मिश्रण टाका .वरून बारीक केलेले पिस्ते भुरभुरा.पूर्णपणे थंड झाल्यावर सुरीने बर्फीचे तुकडे करा.

५.गुलाबजाम

गुलाबजाम साहित्य

  • सामग्री
  • खवा / मावा
  • मैदा
  • बेकिंग सोडा
  • साखर
  • पाणी
  • वेलची पूड
  • तेल

कृती

एका भांड्यात साखर आणि पाणी घालून ८–१० मिनिटे उकळवा.त्यात वेलची पूड टाका. पाक जास्त घट्ट नको . त्यानंतर खवा, मैदा आणि बेकिंग सोडा एकत्र करून मऊसर मळून घ्या. त्यानंतर त्याचे छोटे गोळे करुन घ्या .कढईत तूप/तेल हलक्या गॅस तापवा. गोळे हलक्या गॅसवर तळा, लालसर रंग येईपर्यंत. गरमगरम गुलाबजाम तळून झाल्यावर लगेच साखरेच्या पाकात सोडा. १ तास झाकून ठेवा, म्हणजे ते छान रसाळ होतात.