scorecardresearch

Premium

VIDEO: गणपतीला वापरलेल्या फुलांपासून ५ मिनिटांत बनवा घरीच धुप; घर राहील फ्रेश, कायम सुगंधित

Viral video: वापरलेल्या फुलांपासून फक्त ५ मिनिटांत बनवा घरीच धुप

How do you make homemade Dhoop sticks from flowers?
वापरलेल्या फुलांपासून बनवा घरीच धुप (फोटो: युट्युब/@Puneritadkaवरून साभार)

How to make a Dhoop at home? गणपती बाप्पाचं आगमन काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. यावेळी पुजेसाठी आणि घरातल्या इतर कामांसाठी धूपाचा वापर केला जातो. घर सुगंधित होण्यासाठी धुप लावणं उत्तम मानलं जातं. बाजारातून आणलेल्या धूपात केमिकल्स असण्याची शक्यता असते. जे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगले नाही. केमिकलयुक्त धुपाचा धूर फुफुसात गेल्याने अनेक आजार उद्भवतात. त्यामुळे घरगुती धूप करून पाहा. सुगंधित धूप आपण घरच्याघरी देखील बनवू शकता. तेही वापरलेल्या फुलांपासून…कसा? चला पाहुयात वापरलेल्या फुलांपासून घरच्या घरी धुप कसा बनवायचा.

सर्वात आधी फुलं सुकवायची. आता ऊन कमी आहे पण जेवढं ऊन पडेल त्या उन्हात फुलं वाळवायची. मिक्सरमध्ये फिरवून त्यांची बारीक भुकटी करायची. मग त्यात अंदाजे तूप आणि कापूर भूकटी घालून लहान लहान गोळे करायचे. ओलसर लागतात गोळे. आपण यात इतर सुगंधित पदार्थ घालून देखील बनवू शकता. चॉकलेट ट्रे असेल तर त्या आकारात ते सारण भरुन कडक वाळवून घ्यायचं. ऊन्हात आठ दिवस कडक वाळवायचं. चांगले कडक वाळले की आपला सुगंधी धूप तयार. अतिशय सौम्य सुगंधाचा धूप घरी वापरण्यासाठी असा तयार करता येतो. एका गृहिणीने ही सोपी पद्धत दाखवली आहे.

Man Kicked Out From Plane For Farting Too much Calls Co Passenger Rude Then Farts Again Saying Eat Smelly Snacks Funny Incident
पोटातील गॅसने विमानात झाला गोंधळ! सहप्रवासी भडकताच ‘तो’ उर्मटपणाने म्हणतो, “आता अजून सुगंधित..”, नेमकं घडलं काय?
young person murder kalyan body well crime
कल्याण मध्ये तरुणाची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला
Uric Acid Removal Food
रक्तातील खराब युरिक अ‍ॅसिड झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ पाच पदार्थ; डॉक्टरांकडून जाणून घ्या सेवनाची योग्य पद्धत
Nashik Cold Temperature
नाशिकमध्ये थंडीची लाट, तापमान ८.६ अंशावर

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Kitchen Jugaad: ‘हे’ ५ पदार्थ मिक्सरमध्ये चुकूनही वाटू नका; भांड्यातील पाती बिघडून खडखडा वाजू लागतील

अगदी कमीत कमी खर्चात ऑरगॅनिक धूप तयार होईल. हे धूप आपण बनवून साठवून ठेवू शकता. या धुपाच्या वापरामुळे डास देखील घरातून पळून जातील. व घर कायम फ्रेश व सुगंधित राहेल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व गणेश उत्सव २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: How do you make homemade dhoop sticks from flowers making of organic dhoop sticks at home srk

First published on: 12-09-2023 at 18:01 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×