अकोला : लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला गणेशोत्सव विदर्भातील काही जुन्या गणेशोत्सव मंडळांनी आणि घराण्यांनी तेवढ्याच श्रद्धेने व भक्तिभावाने जोपासला आहे. या मंडळ व घराण्यांच्या उत्सवाने आता शतके ओलांडली आहेत. मात्र, त्यांच्याकडील गणेशाची मूर्ती, त्यामागच्या कलाकारांचे हात आजही ती परंपरा जतन करून आहेत. अकोल्यातील जुने शहरात जयहिंद चौकातील १३३ हून अधिक वर्षांचा इतिहास असलेला मानाचा श्री बाराभाई गणपती विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे. या गणपतीची प्राचीन परंपरा नाथ कुटुंबीय व अकोलेकरांनी भक्तिभावाने जपली.श्री बाराभाई गणपती अकोला शहरातील गणेशोत्सवाचे एक आगळे-वेगळे आकर्षण. वऱ्हाडातील सर्वात प्राचीत व पारंपरिक गणपती म्हणून श्री बाराभाई गणपतीचा नावलौकिक आहे.

श्री बाराभाई गणपतीची स्थापना नेमकी केव्हापासून झाली याची कोणतीही नोंद नाही. या गणपतीचा पेशवे कालिन बाराभाईच्या कारस्थानाशी निकट संबंध असावा म्हणूनच याला बाराभाई हे नाव प्राप्त झाल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्राचीन काळी श्री बाराभाई गणपतीची रुढीपरंपरेने स्थापना केल्या जात होती. मात्र, कालांतराने गणेशोत्सवातील सार्वजनिक उत्साह कमी झाला व ही परंपरा संपुष्टात येऊ नये म्हणून संस्थापक अध्यक्ष कै.भगवाननाथ इंगळे यांनी आपल्या घरी श्री बाराभाई गणपतीची स्थापना केली. तेव्हापासून श्री बाराभाई गणपती संपूर्णत: नाथ कुटुंबाचा आहे.

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध

हेही वाचा >>>चंद्रपूर: वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

श्री बाराभाई गणपतीची परंपरा नाथ कुटुंबियांनी गेल्या अनेक वर्षांपासून जोपासली. या गणपतीला मानाचे स्थान प्राप्त होऊन आज १३३ वर्ष लोटले आहेत. लोकमान्य टिळक यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर इंग्रजकालीन परिस्थतीतही अकोल्यातून कै.भगवाननाथ इंगळे यांनी श्री बाराभाई गणपतीसह शहरातील सात-आठ मंडळांची मिरवणूक काढली होती. तेव्हापासून अकोल्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत पहिल्या स्थानावर श्री बाराभाई गणपती व दुसऱ्या स्थानावर श्री राजराजेश्वाराचा गणपती पालखीत असतो. अकोल्यातील ही प्रथा १८९० च्या सुमारास सुरु झाली. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक दिंड्या असतात. श्री बाराभाई गणपतीची पालखी वाहणारे भोईराज सुध्दा पिढ्यांपिढ्या आपली सेवा गणेश चरणी अर्पण करीत आहेत. अनेक वर्षांपासून असलेल्या या गणपतीचे अकोलेकरांच्या मनात श्रद्धेचे भाव आहेत. श्री बाराभाई गणपतीला अनेक जण नवस बोलतात, साकडे घालतात. भक्तांच्या श्रद्धेला आणि विश्वासाला श्री बाराभाई गणपतीने कधीही तडा जाऊ दिला नाही, असे मोठ्या अभिमानाने नाथ कुटुंबीय सांगतात. अकोल्यातील श्री बाराभाई गणपती एकात्मतेचे प्रतीक आहे.

हेही वाचा >>>बनावट ऑनलाइन गेमिंग ऍप : सोंटू जैनच्या जामिनावर २६ सप्टेंबरला निर्णय

शंभरहून अधिक वर्षांपासून एकच मूर्ती

श्री बाराभाई गणपतीची मूर्ती गेल्या शंभर वर्षाहून अधिक वर्षांपासून एकच आहे. या अगोदर जुन्या पिढीतील मूर्तीकार ओंकारराव मोरे ठाकूर हे श्री बाराभाई गणपतीची मूर्ती तयार करीत होते. त्यांच्या मृत्यूनंतर वारंवार प्रयत्न करुनही श्री बाराभाई गणपतीची मूर्ती तयार करण्यात यश आले नाही. त्यामुळे ही मानाची मूर्ती विसर्जीत करण्यात येत नाही. पुजेच्या मूर्तीचे मात्र विसर्जन करण्यात येते.