scorecardresearch

Premium

बनावट ऑनलाइन गेमिंग ऍप : सोंटू जैनच्या जामिनावर २६ सप्टेंबरला निर्णय

जैन याने विदेशातील काही सॉफ्टवेअर तज्ञाच्या माध्यमातून बनावट गेमींग अॅप तयार केले. अग्रवाल यांना अनंत जैन याने लिंक पाठवून गेम खेळण्यास प्रोत्साहित केले होते.

court room
नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची सोंटूने आर्थिक फसवणूक केली होती.(फोटो- प्रातिनिधिक)

लोकसत्ता टीम

नागपूर : बनावट ऑनलाइन गेमिंग ऍप तयार करून देशभरातील हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधीने लुटणाऱ्या गोंदियातील सोंटू जैनच्या अंतरिम अटकपूर्व जामिनावर गुरूवारी तीनही पक्षांची बाजू मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ऐकून घेतली. याप्रकरणी न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी जामिनाच्या निर्णयावर (क्लोज फॉर ऑर्डर) निर्णय राखून ठेवला आहे. पुढील सुनावणी आता २६ सप्टेंबरला होणार आहे.

paytm payment bank rbi
पेटीएम पेमेंट्स बँकेला व्यवहार गुंडाळण्यासाठी १५ दिवसांची वाढीव मुदत; रिझर्व्ह बँकेचा १५ मार्चपासून बँकेवर व्यवहार प्रतिबंधाचा निर्णय
Sony Group explores new opportunities after parting ways with Zee
‘झी’शी फारकतीनंतर सोनी समूहाकडून नवीन संधींचा शोध
Investors adopted a cautious stance in the backdrop of monetary policy by the Reserve Bank
पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा; सेन्सेक्स-निफ्टी किरकोळ घसरणीसह बंद
prabhakar devdhar
इलेक्ट्रॉनिक्स धोरणाचे शिल्पकार

उच्च न्यायालयाने ५ सप्टेंबरला सोंटू जैनला अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तसेच न्यायमूर्ती महेंद्र चांदवाणी यांनी सायबर पोलिसांना नोटीस बजावून १२ सप्टेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेशही दिले होते. सोंटूला ८, १0 व १२ सप्टेंबरला सिव्हील लाईन्स, सदर येथील सायबर पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले होते.

आणखी वाचा-सावधान! शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष अन…

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या अटीनुसार सोंटू लगेच दुबईवरून नागपुरात आला होता. सोंटूने तीन दिवस पोलीस ठाण्यात हजेरी दिली होती. नागपूर पोलिसांनी जैनच्या घरातून २६ कोटी ४0 लाख रुपयांचे घबाड जप्त केले होते. त्यात १२.४ किलो सोने, २९४ किलो चांदी आणि १६ कोटी ९० लाख रोख रकमेचा समावेश आहे. नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल यांची सोंटूने आर्थिक फसवणूक केली होती.

आणखी वाचा-नागपूर विभागात ‘या’ ५०० जागांची भरती होणार, आयुक्तांनी घेतला आढावा

जैन याने विदेशातील काही सॉफ्टवेअर तज्ञाच्या माध्यमातून बनावट गेमींग अॅप तयार केले. अग्रवाल यांना अनंत जैन याने लिंक पाठवून गेम खेळण्यास प्रोत्साहित केले होते. ५८ कोटींची रक्कम सोंटूने हडप केली होती. फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर अग्रवाल यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रार केली. आयुक्तांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देऊन आरोपीच्या घरावर धाड टाकली होती. फिर्यादी अग्रवाल यांच्यातर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, सोंटू जैनतर्फे अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण यांनी बाजू मांडली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fake online gaming app sontu jains bail decision on september 26 september adk 83 mrj

First published on: 22-09-2023 at 13:21 IST

आजचा ई-पेपर : नागपूर / विदर्भ

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×