नवीन प्रकारच्या प्रतिकारशक्ती पेशी उपचारपद्धतीने एका लहान मुलीचा रक्ताचा कर्करोग बरा करण्यात यश आले आहे यात तिच्याच स्वत:च्या शरीरातील टी पेशींचा वापर कर्करोगाचा सामना करण्यासाठी केला गेला. एमिली उर्फ एम्मा व्हाईटहेड या सात वर्षांच्या मुलीवर हे उपचार करण्यात आले असून त्यामुळे लिंफोब्लास्टिक ल्युकेमिया (ऑल)या रक्ताच्या कर्करोग प्रकारावर उपचारांना नवी दिशा मिळाली आहे. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन या संस्थेतील संशोधनानुसार दुसऱ्या एका मुलीत अशाच प्रकारे टी पेशींचे रिप्रोग्रॅमिंग करण्यात आले होते. तिला मात्र वाचवता आले नव्हते. त्यामुळे या उपचार पद्धतीबाबत ठोस निष्कर्ष काढता येत नाहीत. या प्रकारचा कर्करोग लहान मुलांमध्ये दिसून येतो व तो बराही करता येतो पण या दोन मुलांच्या प्रकरणात मात्र तो अतिशय जोखमीच्या पातळीवर होता, पारंपरिक उपचारांना तो दाद देत नव्हता. एमिली ही तिला जैवअभियांत्रिकी तंत्राने सुधारणा केलेल्या टी पेशी दिल्यानंतर ११ महिन्यात कर्करोगातून मुक्त झाली, असे युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्वानियाच्या संशोधकांनी म्हटले आहे. यातील दुसरे दहा वर्षांच्या मुलात अशाच उपचारांनंतर दोन महिने कर्करोग पेशी दिसून आल्या नाहीत पण नंतर मात्र कर्करोग उलटला. टी पेशींचा वापर करून अशा प्रकारे कर्करोग बरा करता येतो असा दावा एका संशोधन निबंधाचे सह लेखक स्टीफन ग्रुप यांनी केला आहे. या दोन्ही मुलांच्या वैद्यकीय चाचण्या जिथे झाल्या त्या फिलाडेल्फिया येथील मुलांच्या रूग्णालयात ते संशोधन करतात. रक्ताच्या  कर्करोगाच्या काही प्रकारात मात्र या उपचारपद्धतीत काही सुधारणा कराव्या लागणार आहेत, त्यात ल्युकेमिया पेशींच्या पृष्ठभागावर दिसणाऱ्या नवीन रेणूंवर हल्ले करण्याची योजना करावी लागेल. या टी पेशी उपचार पद्धतीत रूग्णाच्याच शरीरातील टी पेशी घेऊन त्यात जैव अभियांत्रिकीने सुधारणा केल्या जातात व त्यात त्यांना बी पेशींचा हल्ला ओळखण्याची क्षमता दिली जाते, या बी पेशी कर्करोगग्रस्त असतात व त्या पेशींच्या पृष्ठभागावर सीडी१९ नावाचे प्रथिन असते. जैव अभियांत्रिकीने टी पेशीत सुधारणा केल्या शिवाय त्या कर्करोगाचा सामना करू शकत नाहीत, जेव्हा त्यांच्यात सुधारणा करून सीटीएल ०१९ या पेशी निर्माण केल्या व त्या रूग्णाच्या शरीरात सोडल्या तेव्हा त्यांची संख्या वाढली व व्हाइटहेड नावाच्या या मुलीचा कर्करोग बरा झाला. पेनसिल्वानिया विद्यापीठआत वैज्ञानिकांनी टी पेशीत सुधारणा करून कर्करोगावर उपचार करण्याची पद्धत शोधून काढली, अर्थाच तिचा पहिला वापर हा प्रौढांमधील क्रोनिक लिंफोटिक ल्युकेमिया या प्रकारच्या रक्ताचा कर्करोग बरा करण्यासाठई केला गेला होता. त्यासाठी २०११ मध्ये चाचण्या घेतल्या असता तीन पैकी दोन रूग्णांना चांगला फायदा झाला.