News Flash

स्टॉप व्हॉयलंस अगेंस्ट वुमेन

पोलिसांनी स्त्रियांसाठी १०३ आणि १०९१ या हेल्पलाइन सुरू केल्या आहेत

पोलिसांनी स्त्रियांसाठी १०३ आणि १०९१ या हेल्पलाइन सुरू केल्या आहेत. घरगुती हिंसाचार, छळ, रस्त्यावर होणारी छेडछाड, विनयभंग, लैंगिक गुन्हा अशा बाबींसंदर्भात तक्रार करायची असल्यास या क्रमांकांवर तक्रार करता येते. तक्रार करणाऱ्या स्त्रीची तक्रार नोंदवून घेतली जाते आणि ती स्त्री ज्या ठिकाणी असेल, त्या ठिकाणच्या बीट मार्शलला ती तक्रार कळवली जाते. त्या बीट मार्शलकडून तातडीने कारवाई होऊन त्या स्त्रीला मदत मिळू शकते.

* ‘स्टॉप व्हॉयलंस अगेंस्ट वुमेन’ नावाची एक संस्था आहे. त्यांचे www.vawhelp.org  हे संकेतस्थळ आहे. त्या संकेतस्थळावर असलेल्या चौकटींमध्ये गरजू स्त्रीने आपले ठिकाण, आवश्यक मदतीचे स्वरूप वगैरे माहिती भरायची. लगेचच त्या स्त्रीच्या ठिकाणच्या जवळपासच्या मदत केंद्रांची किंवा स्वयंसेवी संघटनांची माहिती संगणकाच्या स्क्रीनवर उपलब्ध होते. संबंधित स्त्रीला त्या पत्त्यावर संपर्क साधता येतो व मदत मिळवता येते.

* लक्षात ठेवायला सोपा असा दूरध्वनी क्रमांक आहे ८८८८८८८८८८. या क्रमांकावर संपर्क साधल्यास गरजू स्त्रीच्या आवश्यकतेप्रमाणे तिच्या जवळपासच्या संस्था, संघटनांची माहिती मिळू शकते.
याशिवाय इतर काही हेल्पनंबर्स –

– दयासदन कम्युनिटी सेंटर, धारावी, मुंबई, दू. क्र. – २४०९०७२९.
– महाराष्ट्र महिला परिषद, कोपर खैरणे, नवी मुंबई, दू. क्र. – २७५४४२१९, २७५४८२१२.
– अभयन एस.ओ.एस., दादर, मुंबई, दू. क्र. – ६६३००३००.
– फेमिनाईन कंपॅनियन, अंधेरी, मुंबई, दू. क्र. – ७६००९५६२०१.
– लाबिया, मुंबई, दू. क्र. – ९८३३२७८१७१.
– फेडरेशन ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप, चेंबूर, मुंबई, दू. क्र. – २५२५५५५८, ९९६९०८३८२२.
– पॉवर टू चेंज, दू. क्र. – १८००१०२४०००.
– घरगुती हिंसाचारग्रस्त स्त्रियांना कायदेसंबंधात मदत करणारी संस्था – वुमेन राईट इनिशिएटिव्ह,
मुंबई, दू. क्र. – ४३४११६०३, ४३४११६०४.  या संस्थेचा ई मेल आय.डी. आहे – wri.bombay@lawyerscollective.org

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2016 1:14 am

Web Title: stop violence against women
Next Stories
1 निर्भया हेल्पलाइन
2 स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी..
3 मैत्र जीवांचे
Just Now!
X