आयपीएलच्या गुण तक्यात तळाला असणाऱ्या मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्सला १४ धावांनी हरवले. मागील काही सामन्यांमध्ये चांगली धावसंख्या उभारूनही सतत पराभव पत्करावा लागत असलेल्या बंगळुरुसाठी हा विजय नक्कीच खास आहे. या सामन्यामध्ये विराट कोहलीने ३२ धावांची मोलाची खेळी केली. मात्र सामना जिंकल्यानंतरही नेटकरी विराटवर नाराज आहेत. आणि या नाराज असण्यामागील कारणं आहे विराटने दाखवलेली अखिलाडू वृत्ती. अनेक नेटकऱ्यांनी यासाठी विराटला चांगलेच धारेवर धरले असून विराटला खडे बोल सुनावले आहेत.

झाले असे की फ्लिंटन डीकॉक बाद झाल्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर खेळायला मैदानात उतरला. इन फॉर्म असणारा विराट थोडा सेट झाल्यानंतर सामन्यातील १४व्या षटकात जसप्रीत बुमराह गोलंदाजी करत होता. त्यावेळी विराट २४ धावांवर फलंदाजी करत होता. बुमराहचा ऑफ स्टॅम्पवरील एक चेंडू विराटच्या बॅटची कड घेऊन इशान किशनच्या हताता स्थिरावला. त्यावर मुंबईच्या दोन खेळाडूंनी अपीलही केले. तरीही विराट कोहली काहीच न झाल्याच्या अविर्भावात क्रिजवर उभा होता. पंचांनी नकारार्थी मान डोलवत मुंबईच्या खेळाडूंची हाफ हार्टेड अपील फेटाळून लावली. मुंबईच्या संघाने या पंचाच्या या निर्णयावर रिव्ह्यू घेतला नाही आणि सामना सुरु राहिला. मात्र त्यानंतर मैदानातील मोठ्या स्क्रीनवर चेंडूचा बॅटला स्पर्श झाला की नाही हे दाखवताना अल्ट्राएज तंत्रज्ञानात चेंडू बॅटला चाटून गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर मैदानात चाहत्यांनी मोठा आवाज करत कल्ला केला. मात्र तोपर्यंत रिव्ह्यू घ्यायला उशीर झाला होता. अर्थात यानंतर अवघ्या आठ धावांची भर घालून विराट तंबूत परतल्याने मुंबईला बंगळुरुच्या धावसंख्येवर अंकुश ठेवता आला. पण या प्रसंगानंतर ट्विटवरवर लगेचच अनेकांनी विराटच्या या अखेळाडू वृत्तीवर चांगलेच ताशेरे ओढले.

बॅटला चेंडू लागल्याचे समजल्यानंतर विराटने क्रिज सोडणे अपेक्षित होते असे मत अनेकांनी नोंदवले. तर काहींनी आपण सचिन, द्रविड, गांगुली, गावस्कर यांचे वारसदार आहोत याचे तरी विराटने भान ठेवायल हवे होते असे मत नोंदले. अनेकांनी विराटच्या याच कृतीवर टिका करताना म्हणून सचिन सचिन आहे असे म्हणत विराटला सुनावले. पाहुयात असेच काही ट्विटस…

धोनी असता तर…