22 October 2020

News Flash

IPL जगात भारी: पहिल्याच सामन्याने मोडले Viewership चे विक्रम, इतक्या कोटी लोकांनी पाहिला सामना

मुंबई विरुद्ध चेन्नईच्या पहिल्याच सामन्याने मोडला रेकॉर्ड

रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी (फोटो - IPL)

आयपीलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झाली असून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्जच्या पहिल्याच सामन्याने जागतिक विक्रम केला आहे. २० कोटी लोक एकाच वेळी हा सामना पाहत होते. बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. १९ सप्टेंबरला झालेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईने मुंबईचा पराभव केला. चेन्नईने मुंबईवर ५ गडी राखून विजय मिळवला होता.

बीसीसीआयचे सेक्रेटरी जय शाह यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. “आयपीएलच्या पहिल्या सामन्याने नवा रेकॉर्ड केला आहे. BARC नुसार, अभूतपूर्व प्रतिसादासोबत २० कोटी लोकांनी सामना पाहिला. कोणत्याही देशातील स्पोर्टिंग लीगला इतक्या प्रमाणात दर्शक मिळालेले नाहीत. कोणत्याही लीगला सुरुवातीलाच इतका मोठा प्रतिसाद मिळालेला नाही,” असं ते म्हणाले आहेत.

महेंद्रसिंग धोनीने मुंबईला सलामीच्या सामन्यात पराभूत करून इतिहास रचला. चेन्नईच्या संघाचे नेतृत्व करताना हा धोनीचा १००वा विजय ठरला. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना १०० विजय मिळवणारा धोनी IPL इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीने IPLमध्ये कर्णधार म्हणून एकूण १०५ विजय मिळवले आहेत, पण त्यातील ५ विजय त्याने पुणे वॉरियर्स संघासाठी मिळवले होते.

असा रंगला पहिला सामना-
मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी चांगली सुरूवात केली होती. पण रोहित (१२) झेलबाद झाला. पाठोपाठ क्विंटन डी कॉकही ३३ धावांवर माघारी परतला. सौरभ तिवारी आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चांगली भागीदारी होत होती, पण मोठा फटका खेळण्याच्या नादात तो १७ धावांवर बाद झाला. दमदार फलंदाजी करणारा सौरभ तिवारीदेखील ३१ चेंडूत ४२ धावा करून बाद झाला. मधल्या आणि तळाच्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. हार्दिक पांड्या (१४), कृणाल पांड्या (३) आणि कायरन पोलार्ड (१८) यांनी निराशा केली. त्यामुळे मुंबईला २० षटकात ९ बाद १६२ धावांपर्यंतच मजल मारता आली.

१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अनुभवी आणि धोकादायक शेन वॉटसन ५ धावांवर माघारी परतला. पाठोपाठ मुरली विजयही पायचीत झाला. दोन गडी स्वस्तात बाद झाल्यावर अंबाती रायडू आणि फाफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईला सावरलं. रायडूने ७१ धावा ठोकल्या. तो बाद झाल्यावर डु प्लेसिसने नाबाद राहत विजयी चौकार मारला. त्याने नाबाद ५८ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 4:12 pm

Web Title: bcci secretary jay shah tweets ipl opener between mi and csk breaks viewership records sgy 87
टॅग IPL 2020
Next Stories
1 Video : सरावादरम्यान रसेलची फटकेबाजी, कॅमेऱ्याची काच फोडली
2 IPL 2020 : SRH च्या अडचणी वाढल्या, मिचेल मार्श संपूर्ण स्पर्धेला मुकण्याची शक्यता
3 Video : दुहेरी धाव घेताना हैदराबादच्या खेळाडूंची मैदानात टक्कर, विकेटही गमावली
Just Now!
X