22 October 2020

News Flash

IPL 2020 : चेन्नई विरुद्ध राजस्थान समान्यात चर्चा दिल्लीच्या ऋषभ पंतची; जाणून घ्या काय आहे कारण?

पहिल्या इनिंगनंतर हजारहून अधिक लोकांनी पंतबद्दल केलं आहे भाष्य

(फोटो : Twitter/RishabhPant17 वरुन साभार)

संधीचं सोन कसं करावं याचं उत्तम उदाहरण आज इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३ व्या हंगामातील तिसऱ्या सामन्यामध्ये राजस्थान रॉयल्सच्या संजू सॅमसनच्या रुपाने पाहायला मिळालं असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. संजू सॅमसनने षटकारांचा पाऊस पाडला. तुफान फटकेबाजी करणाऱ्या संजूने ३२ चेंडूमध्ये ७४ धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकावण्याच्या विक्रमाशी बरोबरीही केली. संजूची फलंदाजी पाहून अनेकांनी संजूला भारतीय संघामध्ये स्थान का दिलं जात नाही असा प्रश्न ट्विटवर उपस्थित केला आहे.

नक्की वाचा >> IPL 2020 : निव्वळ योगायोग की…?; जोफ्रा आर्चरची पाच वर्षांपूर्वीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

सध्या भारतीय संघामध्ये संधी देण्यात येणारा ऋषभ पंतपेक्षा संजू उत्तम असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केली आहे. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीर यानेही संजू सध्याच्या घडीला भारतातील सर्वात स्फोट फलंदाज आणि वयाने सर्वात लहान यष्टीरक्षक असल्याचे म्हटले आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर दिल्ली संघातून खेळाणारा ऋषभ पंत चर्चेत आला आहे. संजूच्या फलंदाजीनंतर ‘Rishabh Pant’ हा टॉपीक ट्विटवर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला. काहींनी पंतला ट्रोल केलं तर काहींनी पंतऐवजी संजूला संधी देण्याची मागणी केली.

सामन्याच्या तिसऱ्या षटकामध्ये राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल माघारी परतल्यानंतर संजू फलंदाजीसाठी आला. जोस बटरलच्या अनुपस्थितीत संजूला संघात स्थान देण्यात आल्याने तिसऱ्या क्रमांकावर तो फलंदाजीसाठी आला. त्यानंतर पुढील आठ षटकांमध्ये संजू आणि स्टीव्ह स्मिथने तुफान फलंदाजी करत १०० धावांची पार्टनरशीप केली. संजूने अवघ्या १९ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केलं. संजूने चेन्नईच्या फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रविंद्र जाडेजा आणि पियुष चावला यांच्या दोन षटकांमध्ये संजूने एकूण चार षटकार लगावले. आपल्या ७४ धावांच्या खेळीमध्ये संजूने ५४ धावा ९ षटकारांच्या मदतीने केल्या. ३२ चेंडूतील ७४ धावांपैकी ५८ धावा संजूने षटकार आणि चौकाराच्या माध्यमातून काढल्या. संजूची खेळी पाहून पंतची चिंता वाढली असेल असे अनेक मजेदार ट्विट नेटकऱ्यांनी केले.पाहुयात काही व्हायरल झालेले ट्विट…

१) संजूला पाहून पंत म्हणत असेल करियर संकटात आहे

२) संजूची फलंदाजी बघताना

३) संजू कधीही चांगलाच

४) पंतही असंच काहीतरी म्हणत असेल

५) काय झालं पंत?

६) पंत दबावाखाली येणार

७)अशीही स्पर्धा सुरु झाली

८)संधी दिली तर

९) संजूची फलंदाजी पाहून

१०) त्याने सर्वांना हैराण केलं आहे

एकीकडे पंतबद्दल चर्चा सुरु असली तरी दुसरीकडे संजूने आपल्या कामगिरीने चेन्नई विरुद्ध सर्वात जलद अर्धशतक झळकवणाऱ्यांच्या यादीमध्ये विक्रमाची बरोबर केली आहे. संजूने १९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवले. याआधी चेन्नईविरुद्ध २०१९ साली मोहालीमध्ये के. एल. राहुलने १९ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकवलं होतं. आज संजूने डेव्हिड वॉर्नरला या यादीमध्ये मागे टाकलं. वॉर्नरने २०१५ साली हैदराबादमध्ये खेळताना २० चेंडूत चेन्नईविरुद्ध अर्धशतक झळकावलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 10:48 pm

Web Title: ipl 2020 csk vs rr rishabh pant in trending topic after sanju samson inning against csk scsg 91
Next Stories
1 IPL 2020 : पदार्पणाच्या सामन्याआधी यशस्वी जैस्वालने घेतले धोनीचे आशिर्वाद, पाहा व्हिडीओ
2 IPL 2020 : निव्वळ योगायोग की…?; जोफ्रा आर्चरची पाच वर्षांपूर्वीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली
3 IPL 2020 : राजस्थानच्या वादळात CSK चा पालापाचोळा, एन्गिडीच्या नावावर नकोसा विक्रम
Just Now!
X