इतिहासात पहिल्यांदाच IPLची अंतिम फेरी गाठणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघापुढे आज चार वेळा IPL विजेतेपद मिळालेल्या मुंबई इंडियन्सचं आव्हान आहे. यंदाच्या हंगामात मुंबई आणि दिल्ली यांच्यात ३ सामने झाले. तीनही सामन्यात मुंबईने दिल्लीला मात दिली. तशातच आज होणाऱ्या दिल्ली-मुंबई सामन्याआधी दिल्लीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या ताफ्यातील एक अनुभवी खेळाडू दुखापतीने ग्रासला असल्याने संघात चिंतेचे वातावरण असल्याची चर्चा आहे.

IPL FINAL Photos: ‘दिल्ली कॅपिटल्स’ला स्टेडियममध्ये येऊन पाठिंबा देणारी ‘ती’ तरूणी नक्की कोण?

दिल्लीच्या संघाचा फिरूकीपटू सध्या दुखापतीग्रस्त असल्याचं सांगितलं जात आहे. अश्विन खांद्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात अश्विनने नव्या चेंडूने गोलंदाजी केली. त्यानंतर जेव्हा त्याला पुन्हा गोलंदाजी देण्यात आली तेव्हा त्याने केवळ कॅरम बॉलचाच मारा सुरू ठेवला. त्यावेळी समालोचन करत असलेल्या ग्रॅम स्वानने ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती. तसेच, याच दुखापतीमुळे अश्विनला ठेवणीतील अस्त्र असलेल्या ऑफ स्पिनचा मारा करणं जड जातंय का असा सवालही त्याने उपस्थित केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

IPL FINAL: भारतात परतलेला दिल्लीचा ‘हा’ खेळाडू पुन्हा दुबईला रवाना, कारण…

दरम्यान, या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संघाचे फिजीओ आणि सहाय्यक कर्मचारी अश्विनच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहेत. अश्विनची ही दुखापत त्याच्या गोलंदाजीसाठी अडथळा ठरू नये यासाठी त्यांचे सर्वतोपरि प्रयत्न सुरू आहेत. अश्विनच्या खांद्याला झालेली दुखापत सध्या त्याला त्रासदायक ठरताना दिसत आहे. पण अंतिम सामन्यात अश्विन चांगली गोलंदाजी करण्यास सक्षम आहे, अशी माहितीदेखील सूत्रांकडून देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अश्विनची दुखापत बरी न झाल्यास हा दिल्लीसाठी मोठा धक्का ठरू शकतो.