25 January 2021

News Flash

IPL 2020 : धोनीला सूर गवसला, पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी

धोनीची नाबाद ४७ धावांची खेळी व्यर्थ

फोटो सौजन्य - Ron Gaunt / Sportzpics for BCCI

गेल्या काही दिवसांपासून जगभरातील चाहते ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण अखेरीस आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीने सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात आपली जबाबदारी ओळखत लवकर फलंदाजीला येत आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला. सलामीच्या फलंदाजांची हाराकिरी, मोक्याच्या क्षणी जाडेजासोबत तुटलेली भागीदारी आणि दुबईतलं उष्ण हवामान या सर्वांचा सामना करत धोनीने चांगली फटकेबाजी केली. परंतू संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला.

हैदराबादविरुद्ध सामन्यात धोनीने ३६ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४७ धावा केल्या. अखेरच्या षटकांत धोनीने दोन-दोन धावा घेत गोलंदाजांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान उष्ण हवामानामुळे धोनीला दमही लागला. यानंतर वैद्यकीय उपचार आणि थोडावेळ श्वास घेत धोनीने पुन्हा एकदा संघाला विजय मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. अखेरच्या षटकांत चेन्नईला विजयासाठी २८ धावांची गरज होती. परंतू युवा अब्दुल समदने आश्वासक गोलंदाजी करत हैदराबादला सात धावांनी मात केली.

दरम्यान, तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची ही हॅटट्रीक ठरली आहे. सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हरवल्यानंतर चेन्नईला राजस्थान, दिल्ली आणि हैदराबाद या तीन संघाकडून पराभव पत्करावा लागला आहे. आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी केलेली हाराकिरी चेन्नईच्या पराभवाला कारणीभूत ठरली आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी या सामन्यात टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना संधीच दिली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 12:09 am

Web Title: ipl 2020 ms dhoni finds rhythm but fails to win match for team psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : भुवनेश्वरकडून वॉटसनची पुन्हा शिकार, चेन्नईची आघाडीची फळी ढेपाळली
2 IPL 2020 : CSK ची झुंज अपयशी, रंगतदार सामन्यात सनराईजर्स हैदराबादची बाजी
3 Video : भन्नाट इनस्विंगवर बेअरस्टोची दांडी गूल, दीपक चहरची धडाकेबाज सुरुवात
Just Now!
X