News Flash

IPL 2020: ‘गुरू’ जॉन्टी ऱ्होड्सचा पूरनच्या प्रयत्नाला मानाचा मुजरा…

पूरनच्या फिल्डिंगवर सचिनसह सारेच फिदा

पंजाबविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण राजस्थानचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसला. मयंक अग्रवालचं धमाकेदार शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक यांच्या बळावर पंजाबने २० षटकात २ बाद २२३ धावा ठोकल्या आणि राजस्थानला विजयासाठी डोंगराएवढं आव्हान दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या फलंदाजांनीही तुफान प्रत्युत्तर दिलं.

२२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने नवव्या षटकात शंभरी गाठली. कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि संजू सॅमसन यांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली. सामन्यात निकोलस पूरनने ८ चेंडूत २५ धावा कुटल्या. त्यात ३ षटकार आणि १ चौकाराचा समावेश होता. त्यानंतर पंजाबच्या गोलंदाजीच्या वेळीदेखील तो चर्चेत राहिला. संजू सॅमसनने लगावलेला उत्तुंग फटका षटकार जाणार असं साऱ्यांनाच वाटत असताना पूरनने झेप घेत चेंडू सीमारेषेबाहेरून अडवला. पूरनचा हा प्रयत्न पाहून साऱ्यांचेच डोळे विस्फारले. केवळ क्रिकेटविश्वातूनच नव्हे, साऱ्याच क्षेत्रातून त्याच्यावर स्तुतिसुमनं उधळण्यात आली. सोशल मीडियावर त्याच्या फिल्डिंगचीच चर्चा रंगली होती. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे फिल्डिंगमध्ये साऱ्यांचे गुरू असलेला जॉन्टी ऱ्होड्स याने पूरनला चक्क सामना सुरू असताना मानाचा मुजरा केला.

दरम्यान, पंजाबकडून मयंक अग्रवाल आणि राहुल यांनी शतकी सलामी दिली. मयंक अग्रवालने आपल्या IPL कारकिर्दीतील पहिलंवहिलं शतक ठोकलं. त्याने सामन्यात ५० चेंडूत १०६ धावांची खेळी केली. त्यात १० चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता. राहुलने ५४ चेंडूत ६९ धावा करत त्याला चांगली साथ दिली. त्यानंतर पूरनने ८ चेंडूत २५ धावांची खेळी करत पंजाबला २२३ धावांपर्यंत मजल मारून दिली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 11:10 pm

Web Title: nicolas pooran superb fielding video fielding coach jonty rhodes standing ovation salute vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: पूरनने सीमारेषेबाहेरून अडवला सिक्सर; रितेश देशमुख म्हणतो…
2 IPL 2020 : माझ्या आयुष्यात पाहिलेली सर्वोत्तम फिल्डींग ! पूरनच्या कसरतीवर सचिन फिदा
3 VIDEO: अविश्वसनीय! हवेत झेप घेत सीमारेषेबाहेरून अडवला सिक्सर…
Just Now!
X