भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज लाखोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत असतानाच आरोग्य व्यवस्थेवरही ताण आलाय. याच पार्श्वभूमीवर आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातून खेळणाऱ्या पॅट कमिन्स या ऑस्ट्रेलियन जलदगती गोलंदाजाने काही दिवसांपूर्वीच ५० हजार अमेरिकन डॉलर म्हणजेच ३७ लाख रुपयांची मदत भारतातील ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भातील कामासाठी केलीय. मात्र ही मदत करण्यासंदर्भातील कल्पना कुठून आली याबद्दल पॅटने पहिल्यांदाच भाष्य केलं असून या कल्पनेमागील अभिनेता शाहरुख खानशी असलेलं कनेक्शनही सांगितलं आहे.
Photos: कमिन्सने दिले ३७ लाख… भारतीय खेळाडूंनी करोना काळात किती मदत केलीय जाणून घ्याhttps://t.co/bn1SuYSXlZ#PatCummins मदतीनंतर भारतीय खेळाडूंवर होतेय टीका, पण खरोखरच भारतीयांनी किती मदत केलीय जाणून घ्या#Corona #Covid19 #CoronaSecondWave #CoronavirusIndia
— LoksattaLive (@LoksattaLive) April 27, 2021
कमिन्सने ५० हजार डॉलरची मदत जाहीर करताना २६ एप्रिल रोजी ट्विटरवर एक मोठा मेसेज लिहिला. त्याने आपल्याला भारत अतिशय आवडता देश असून मी माझ्या आयुष्यातील काही सर्वात चांगल्या लोकांना या देशात भेटल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच या संकटाच्या काळामध्ये आयपीएलसारख्या स्पर्धांच्या आयोजनामधून देशातील लोकांना थोडा विरंगुळा मिळेल असा सरकारचा या स्पर्धेच्या आयोजनाला परवानगी देण्यामागील दृष्टीकोन असल्याचंही कमिन्सनने म्हटलं आहे. इतकच नाही तर कमिन्सने आयपीएलमध्ये खेळणाऱ्या जगभरातील इतर खेळाडूंनीही पुढाकार घेत या संकटाच्या काळामध्ये मदत निधी द्यावा आणि मदतीसाठी पुढे यावं असं आवाहन केलं आहे.
नक्की वाचा >> करोनामुळे आयपीएल स्थगित करावं का?; भारताला मदत करणारा कमिन्स म्हणतो, “हा काही…”
तसेच लोकांनी आपल्या भावानांना योग्यपद्धतीने वापरुन त्याचा कामामध्ये वापर केल्यास बदल नक्की घडले आणि या परिस्थितीवर मात करणं शक्य होईल असंही कमिन्स म्हणाला आहे. मी केलेली मदत फार नाहीय पण त्यामुळे काही लोकांच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल अशी मला आशा आहे, असंही कमिन्सने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
— Pat Cummins (@patcummins30) April 26, 2021
…म्हणून मदत केली
याच मदतीसंदर्भात कमिन्सला नुकत्याच ‘विनो’ या वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान प्रश्न विचारण्यात आला. ही मदत करण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली असं कमिन्सला विचारण्यात आलं असता त्याने कोलकाता नाईट रायडर्समधील चर्चेबद्दल माहिती दिली. “कोलकाता नाईट रायडर्सच्या संघातील काही खेळाडूंशी बोलताना मागील वर्षी त्यांनी पंतप्रधान सहायत्ता निधीसाठी मदत केल्याचं कळालं. संघमालक असणाऱ्या शाहरुख खाननेही मदत केली होती. त्यामुळेच मी सुद्धा मदत करण्याचा निर्णय घेतला,” असं कमिन्स म्हणाला.
नक्की वाचा >> कमिन्सकडून PM Cares साठी ३७ लाख घेताना करोना Internal Matter असल्याचं मोदी सरकार विसरलं का?
ऑस्ट्रेलियातून मदत आणणार…
भारतातील करोनाची दुसऱ्या लाटेसंदर्भात जगभरात चिंता व्यक्त केली जात असतानाच ऑस्ट्रेलियामध्येही भारताला मदत पाठवण्यासाठी वेगवेगळे ग्रुप तयार करण्यात आल्याचं कमिन्सने सांगितलं. “ऑस्ट्रेलियातील लोकांना भारताची मदत करायची आहे. त्यामुळे तेथील काही संस्थांच्या माध्यमातून आम्ही ग्रुप तयार करुन मदत भारतात पाठवण्यासंदर्भातील काम करत आहोत,” असं कमिन्सने म्हटलं आहे. कमिन्सने भारतातील करोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मदतनिधी दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू आणि सध्या आयपीएलमध्ये समालोचक असणाऱ्या ब्रेट लीनेही भारताला मदत म्हणून ४२ लाख रुपये देण्याची घोषणा केली.