News Flash

विद्यापीठ कायद्याबाबत शासनाची दुटप्पी भूमिका

भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर विखे-पाटील माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची टीका

‘विद्यापीठांमुळे महाविद्यालये उभी नाहीत तर महाविद्यालयांमुळे विद्यापीठे उभी आहेत. महाविद्यालयांच्या व्यवस्थापनाचे प्रतिनिधी, प्राध्यापक, प्राचार्याचे अधिकार नाकारणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांच्या निवडणुका घ्यायच्या आणि अधिकारमंडळाच्या नाकारायच्या हे शासनाचे दुटप्पी धोरण आहे,’ अशी टीका विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मंगळवारी केली.

भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमानंतर विखे-पाटील माध्यमांशी बोलत होते. या वेळी ते म्हणाले, ‘एकीकडे विद्यापीठ कायद्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या निवडणुका घ्यायच्या, तर याउलट अधिकार मंडळावरील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या नामनिर्देशनाने करायच्या यावरून सध्याच्या सरकारची दुटप्पी भूमिका दिसून येते. नामनिर्देशनाच्या माध्यमातून नियुक्तया करून विद्यापीठेच ताब्यात घ्यायची, अशी सरकारची भूमिका होती. या पद्धतीमुळे हुकूमशाही वाढेल. कुलगुरूंकडे सर्वाधिकार देणे चुकीचे आहे.’ या कायद्याच्या मसुद्याबाबत आम्ही घेतलेले बहुतांश आक्षेप दूर केले आहेत. त्याबाबत सर्वपक्षीय लवकरच बठक होणार असून, त्यानंतर हा कायदा येत्या अधिवेशनात येईल, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 2:39 am

Web Title: radhakrishna vikhe patil comment on university act
Next Stories
1 ५०० अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रस्ताव
2 राज्यात ५ हजार शाळांमध्ये स्पोकन इंग्लिशचा प्रयोग
3 मुंबई विद्यापीठाला अखेर परीक्षा नियंत्रक मिळणार
Just Now!
X