News Flash

पाठय़पुस्तकांतील चुका टाळण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक कक्ष

पाठय़पुस्तकांत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी,अभ्यास मंडळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये स्वतंत्र शैक्षणिक कक्ष तयार करून शैक्षणिक सहसंचालकाचे पद निर्माण करण्याचा

| May 31, 2013 04:16 am

पाठय़पुस्तकांत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी,अभ्यास मंडळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामध्ये स्वतंत्र शैक्षणिक कक्ष तयार करून शैक्षणिक सहसंचालकाचे पद निर्माण करण्याचा विचार मंडळाकडून केला जात आहे.
यावर्षीच्या दहावीच्या भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र या विषयाच्या पुस्तकांमध्ये चुका झाल्या आहेत. अशा चुका होऊ नयेत यासाठी आणि अभ्यास मंडळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र शैक्षणिक कक्ष तयार करण्याचा मंडळाकडून विचार केला जात आहे. या शैक्षणिक कक्षामध्ये विविध विषयाचे तज्ज्ञ, संशोधक, मूल्यमापन संशोधक यांचा समावेश असणार आहे. या कक्षाचा प्रमुख म्हणून सहसंचालक दर्जाच्या पदाची स्वतंत्रपणे नेमणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 4:16 am

Web Title: saperate education cell to avoid errors in text book
Next Stories
1 विद्यार्थ्यांनो तुमच्यासाठी.
2 खासगी विद्यापीठे नियंत्रण मुक्त!
3 कॉपीमुक्तीला ‘मुक्ती’ दिल्याचा परिणाम?
Just Now!
X