05 March 2021

News Flash

द बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स

अभियांत्रिकी शिक्षणासाठी देशभरात नाव कमावलेल्या ‘द बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स’ या संस्थेतील निरनिराळ्या अभ्यासक्रमांची ओळख- द बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स, पिलाणी या

| April 29, 2013 05:09 am

अभियांत्रिकी शिक्षणासाठी देशभरात नाव कमावलेल्या ‘द बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स’ या संस्थेतील निरनिराळ्या अभ्यासक्रमांची ओळख-
द बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स, पिलाणी या संस्थेच्या अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशासाठी या संस्थेमार्फत स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली जाते. देशभरातील गुणवंत मुलांना आयआयटी, काही एनआयटीइतकीच ओढ या संस्थेकडे असते. देशभातील किमान लाखभर विद्यार्थी या संस्थेतील अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी BITS AT (बीआयटीएस अ‍ॅडमिशन टेस्ट) ही परीक्षा देतात. या संस्थेला अखिल भारतीय अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला आहे. या संस्थेचे पिलाणी, गोवा आणि हैदराबाद येथे कॅम्पस आहेत. मागील दोन वर्षांपासून दुबई येथेही कॅम्पस उघडण्यात आले आहे. मात्र BITS AT या परीक्षेच्या माध्यमातून दुबई कॅम्पसमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्या ठिकाणी स्वतंत्र काऊन्सेलिंगद्वारे प्रवेश दिला जातो. या संस्थेमध्ये पुढील एकात्मिक अभ्यासक्रम चालविण्यात येतात –

पिलाणी कॅम्पस :

बॅचलर ऑफ इंजिनीअिरग अभ्यासक्रमाच्या विद्याशाखा : बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन केमिकल इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन सिव्हिल इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन मेकॅनिकल इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन मॅन्युफॅक्चिरग इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ फार्मसी (ऑनर्स).

मास्टर ऑफ सायन्स अभ्यासक्रमाच्या विद्याशाखा :
मास्टर ऑफ सायन्स इन बायॉलॉजिकल सायन्सेस, मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री, मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स, मास्टर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स, मास्टर ऑफ सायन्स इन फिजिक्स, मास्टर ऑफ सायन्स (टेक्नॉलॉजी) इन इन्फम्रेशन सिस्टम्स

गोवा कॅम्पस :

बॅचलर ऑफ इंजिनीअिरग अभ्यासक्रमाच्या विद्याशाखा : बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन केमिकल इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रमेन्टेशन इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन मेकॅनिकल इंजिनीयिरग.

मास्टर ऑफ सायन्स अभ्यासक्रमाच्या विद्याशाखा :
मास्टर ऑफ सायन्स इन बायॉलॉजिकल सायन्सेस, मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री, मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स, मास्टर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स, मास्टर ऑफ सायन्स इन फिजिक्स, मास्टर ऑफ सायन्स (टेक्नॉलॉजी) इन इन्फम्रेशन सिस्टम्स

हैदराबाद कॅम्पस :

बॅचलर ऑफ इंजिनीअिरग अभ्यासक्रमाच्या विद्याशाखा : बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन केमिकल इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन सिव्हिल इंजिनीयिरग, बॅचलर ऑफ इंजिनीयिरग (ऑनर्स) इन कॉम्प्युटर सायन्स, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअिरग बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड कम्युनिकेशन इंजिनीअिरग, बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स) इन मेकॅनिकल इंजिनीअिरग.

मास्टर ऑफ सायन्स अभ्यासक्रमाच्या विद्याशाखा :
मास्टर ऑफ सायन्स इन बायॉलॉजिकल सायन्सेस, मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री, मास्टर ऑफ सायन्स इन इकॉनॉमिक्स, मास्टर ऑफ सायन्स इन मॅथेमॅटिक्स, मास्टर ऑफ सायन्स इन फिजिक्स, मास्टर ऑफ सायन्स (टेक्नॉलॉजी) इन इन्फम्रेशन सिस्टम्स.
मास्टर ऑफ सायन्स (ऑनर्स) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांला बॅचलर ऑफ इंजिनीअिरग (ऑनर्स)च्या कोणत्याही विषयात दुसरी पदवी घेण्याचा पर्याय डय़ुएल डिग्री योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिला जातो. या योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीत एमएस्सी (ऑनर्स) आणि बीई (ऑनर्स) या दोन पदव्या प्रदान केल्या जातात.
पात्रता : संस्थेच्या कोणत्याही शाखेतील इन्टिग्रेटेड फर्स्ट डिग्री प्रोग्रॅममध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावी विज्ञान परीक्षेतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स या तीन विषयांमध्ये सरासरीनं ७५ टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. मात्र वरील तीनही विषयांमध्ये प्रत्येकी ६० टक्के गुण मिळायलाच हवे.
प्रवेश पद्धती : BITS AT परीक्षेत मिळालेल्या गुणांवर आधारित अखिल भारतीय गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यानुसार प्रवेश दिला जातो. देशातील कोणत्याही राज्याच्या बोर्ड परीक्षेत किंवा केंद्रीय बोर्डाच्या परीक्षेत पहिला क्रमांक प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शाखेमध्ये थेट प्रवेश दिला जातो.
ऑनलाइन प्रवेश परीक्षा : BITS AT ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेतली जाते. ही ऑनलाइन परीक्षा किमान १५ दिवस चालते. त्यामुळे विद्यार्थ्यांला हवे ते परीक्षा केंद्रे, हवी ती वेळ आणि हवी ती तारीख मिळू शकते. ही परीक्षा तीन तासांची असेल.
परीक्षेच्या पहिल्या भागात फिजिक्स, दुसऱ्या भागात केमिस्ट्री, तिसऱ्या भागात इंग्रजी प्रोफिसिएन्सी व लॉजिकल रिझिनग आणि चौथ्या भागात गणित या विषयांवरील वस्तुनिष्ठ म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पद्धतीचे बहुपर्यायी प्रश्न राहतील. प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तीन गुण दिले जातील आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी एक गुण वजा केला जाईल. प्रश्न सोडवले नाहीत तर त्यास कोणतेही गुण दिले जाणार नाही. १५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका राहील. यामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री या विषयांसाठी प्रत्येकी ४० गुण आणि इंग्रजी प्रोफिसिएन्सी विषयासाठी १५ गुण आणि लॉजिकल रिझिनग या विषयासाठी १० गुण, गणित या विषयासाठी ४५ गुण राहतील.
१८० मिनिटांमध्ये १५० प्रश्न विद्यार्थ्यांना सोडवता यावेत यादृष्टीने प्रश्नांची योजना केली असते. अधिक बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी अतिरित १२ प्रश्न दिलेले असतात. हे प्रश्न फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्सवर आधारित राहतील. अधिक गुण मिळवण्यासाठी हे प्रश्न उपयुक्त ठरू शकतात. या परीक्षेत निगेटिव्ह गुण असल्याने केवळ अंदाजाने प्रश्नांची उत्तरं लिहिणं गरसोयीचं होऊ शकतं. कारण त्यामुळे अचूक उत्तरांसाठी मिळालेल्या गुणांमधून बरेच गुण वजा होऊ शकतात.
हा पेपर सोडवून झाल्यावर शेवटचे बटण क्लिक केले की लगेच कॉम्प्युटर स्क्रीनवर विद्यार्थ्यांचा निकाल झळकतो. त्यामुळे किती गुण मिळाले हे कळतं.
या ऑनलाइन परीक्षेसाठी महाराष्ट्रातील नागपूर, पुणे, मुंबई या केंद्रांचा समावेश आहे. देशातील एकूण ३२ केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाते. यापकी कोणत्याही केंद्रांची निवड परीक्षा देण्यासाठी विद्यार्थी करू शकतात. ही परीक्षा साधारणत: मेच्या दुसऱ्या आठवडय़ापासून सुरू होते आणि ती जूनच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत सुरू राहील.
अभ्यासक्रम : BITS AT या परीक्षेसाठी अकरावी व बारावीच्या एनसीईआरटीचा अभ्यासक्रम असतो. एनसीईआरटीची पुस्तके अभ्यासासाठी उपयुक्त ठरू शकतात.
संस्थेचा संपर्क : द बिर्ला इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड सायन्स पिलाणी- ३३३०३१ (राजस्थान), दूरध्वनी०१५९६- २४२०९०, वेबसाइट- www.bitsadmission.com, ई-मेल – mmsanand@pilani.bits-ac.in
ऑनलाइन प्रवेश परीक्षा : या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन चाळणी परीक्षा १४ मे २०१३ ते १ जून २०१३ या कालावधीत घेतली जाईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2013 5:09 am

Web Title: the birla institute of technology
टॅग : Experience,Job,Ssc
Next Stories
1 पर्यटन क्षेत्रातील नव्या संधी
2 इवलेसे रोप लावियले द्वारी..!
3 साहित्य महामंडळाच्या बैठकीत ‘अशी ही बनवाबनवी’चे पडसाद उमटणार!
Just Now!
X