नर्सरी, ज्युनियर केजी आणि पहिलीच्या वर्गातील २५ टक्के आरक्षित प्रवेशांसाठीची प्रवेशप्रक्रिया २४ मार्चपासून ‘ऑनलाइन’ सुरू होणार आहे. २९ मार्चपर्यंत या प्रवेशांसाठी अर्ज भरता येणार असून प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उभारलेल्या ४५ मदतकेंद्रांवरून किंवा इंटरनेट सुविधा असलेल्या कोणत्याही ठिकाणाहून हे अर्ज भरता येतील.
शिक्षण संचालक महावीर माने यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ६६६.१३ीेंँं१ं२ँ३१ं.्रल्ल या संकेतस्थळावरून या २५ टक्के प्रवेशांसाठी अर्ज भरायचे आहेत. विना अनुदानित, कायम विनाअनुदानित, अल्पसंख्याक शाळा व धार्मिक पाठशाळा वगळून इतर स्वयं अर्थसहाय्यित शाळा आणि सर्व माध्यमांच्या बोर्डाच्या शाळांचा या प्रक्रियेत समावेश आहे.  
माने यांनी सांगितले की, एखाद्या शाळेत क्षमतेपेक्षा अधिक अर्ज आल्यास कोणत्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा हे सोडत (लॉटरी) पद्धतीने ठरवले जाईल.तर आलेल्या अर्जाची संख्या शाळेतील उपलब्ध जागांपेक्षा अधिक नसल्यास थेट प्रवेश मिळालेल्यांची यादीच जाहीर होईल.’’
२५ टक्क्य़ांच्या प्रवेशासाठी शाळेपासून ३ किलोमीटर्पयच्या परिसरात राहणारे रहिवासी अर्ज करू शकणार आहेत. मात्र शाळेपासून १ किलोमीटरच्या परिसरातील अर्जदाराला नियमाने प्राधान्य मिळणार आहे. १ किलोमीटरच्या परिसरातून शाळेतील २५ टक्क्य़ांच्या सर्व जागा भरण्याइतके अर्ज न आल्यासच ३ किलोमीटरच्या परिसरातील बालकांना संबंधित शाळेत
प्रवेश घेण्यासाठी पात्र समजले जाईल.