दहावीचा निकाल आता लवकरच लागेल. आयसीएसई/सीबीएसई बोर्डाचा निकाल लागलाही. त्यामुळे आता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होईल. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही अकरावी प्रवेश ऑनलाईन होणार आहेत. त्याला अपवाद असेल इन हाऊस व अल्पसंख्याक कोटय़ाच्या प्रवेशाचा. अल्पसंख्याक व इनहाऊस कोटय़ाचे प्रवेश हे त्या त्या महाविद्यालयाच्या स्तरावर होतील.
एसएससीचा निकाल लागल्यापासून पहिल्या आठ-दहा दिवसात अल्पसंख्याक व इनहाऊस कोटय़ाचे प्रवेश निश्चित होतील. याचे वेळापत्रक लवकरच शिक्षण उपसंचालक कार्यालयातून जाहीर होईल. या दोन्ही कोटय़ात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.
ऑनलाइन प्रक्रियेत विज्ञान, वाणिज्य व कला शाखेचे प्रवेश होतील. होमसायन्स, व्होकेशनल, रात्र कनिष्ठ महाविद्यालयाचे व द्विलक्षी प्रवेश ऑनलाइन होणार नाहीत.
मुंबई विभागातील (मुंबई शहर व उपनगर, ठाणे, रायगड, पनवेल इ.)विद्यार्थ्यांना लॉग इन आयडी व पासवर्ड असलेली माहिती पुस्तिका आपआपल्या शाळेतून मिळेल. मुंबई विभागाच्या बाहेरील विद्यार्थ्यांना ही पुस्तिका मुंबईतील वेगवेगळ्या मार्गदर्शन केंद्रांवर मिळेल. या मार्गदर्शन केंद्रांची माहिती अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर मिळेल. संकेतस्थळ setexam. unipune.ac.in असे आहे.
माहिती पुस्तिकेतील लॉगइन आयडी व पासवर्डचा वापर करून विद्यार्थ्यांनी लॉगइन केले की त्यांना लगेचच पासवर्ड बदलून नवीन पासवर्ड निवडायचा आहे. हा पासवर्ड तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येतो. तो जपून ठेवणे आवश्यक आहे. तसेच काही सुरक्षेचे प्रश्न विचारले जातील.
त्याची उत्तरे देऊन प्रिंटआऊट घेणे आवश्यक आहे. त्यायोगे आपण पासवर्ड विसरलो तरी तो आपल्याला परत मिळवता येतो. पासवर्ड ठरवण्याचा भाग संपला की आपण आता अर्जाचा भाग १ म्हणजेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक माहितीचा भाग भरू शकतो.
यामध्ये जर विद्यार्थी मार्च २०१५च्या परीक्षेला प्रथमच एसएससी बोर्डातून बसला असेल तर त्याने त्याच्या परीक्षेचा बैठक क्रमांक टाकला की वैयक्तिक माहिती आपोआप भरलेली दिसते.मात्र एसएससी बोर्डाचे मार्च २०१५ला पुनर्परीक्षार्थी म्हणून बसलेले किंवा मार्च २०१५च्या आधी उत्तीर्ण झालेल्या तसेच एसएससी सोडून इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांची माहिती आपोआप येणार नाही.
(लेखक ऑनलाइन समितीचे सदस्य असून, भवन्स महाविद्यालयाचे सहउपप्राचार्य आहेत.)
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2015 रोजी प्रकाशित
ऑनलाइन प्रक्रियेतील सहभाग
दहावीचा निकाल आता लवकरच लागेल. आयसीएसई/सीबीएसई बोर्डाचा निकाल लागलाही. त्यामुळे आता अकरावीच्या प्रवेशाची लगबग सुरू होईल.

First published on: 02-06-2015 at 01:33 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Admission process for 11th in maharashtra