महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मुदत १३ डिसेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे. हा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता महाविद्यालयांना १३ डिसेंबपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरता येणार असून महाविद्यालयांनी आवेदनपत्रांच्या िपट्र प्रतीसह शुल्क चलनासह मंडळाकडे १७ डिसेंबपर्यंत भरता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी २०१४ मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेसाठी यंदा प्रथमच ऑनलाइन आवेदनपत्रे भरण्यास सक्ती करण्यात आली होती. यानुसार सुरू झालेल्या या प्रक्रियेत संकेतस्थळ क्रॅश झाल्यामुळे महाविद्यालयांना अर्ज भरताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. यानुसार काही महाविद्यालयांनी व विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. हे लक्षात घेऊन ही मुदतवाढ करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान हे संकेतस्थळ ७ डिसेंबर रोजी काही तांत्रिक अडचणींमुळे बंद राहणार असल्याचे मंडळातर्फे सांगण्यात आले आहे. हे संकेतस्थळ पुन्हा ८ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल, असेही सांगण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2013 रोजी प्रकाशित
बारावीच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावी परीक्षांचे ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत मुदत १३ डिसेंबपर्यंत वाढविण्यात आली आहे.
First published on: 07-12-2013 at 02:07 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Extension to fill in the online application process of hsc