दहावी आणि बारावीच्या शिक्षकांप्रमाणेच महाविद्यालयीन प्राध्यापकांनाही परीक्षांची कामे असून प्राध्यापक व संबंधित शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकांच्या कामातून वगळावे, अशी मागणी विद्यापीठाने निवडणूक आयोगाकडे करावी, अशी सूचना विद्यापीठाच्या अधिसभेत मांडण्यात आली. त्यावर प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी निवडणूक आयोगाकडे विनंती केली जाईल, असे आश्वासन दिले.
महाविद्यालयीन शिक्षकांची रखडलेली भरती प्रक्रिया २० एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येईल असे आश्वासनही यावेळी देण्यात आले.
मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर
मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेत सन २०१४-१५ या आर्थिक वर्षांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळवण्यासाठी प्रशासनाला रात्री उशीरापर्यंत शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अखेर ५४ कोटी ३० लाख रुपये तुटीचा एकूण ४२७.११ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. अर्थसंकल्पावर रात्री उशीरापर्यंत चर्चा सुरू होती. विद्यापीठाची महाविद्यालये आणि विद्यापीठ विकास मंडळाचे संचालक डॉ. राजपाल हांडे यांनी अर्थसंकल्प सादर केला.
अर्थसंकल्पातील तरतुदी
सन २०१४-१५साठी नियोजित बांधकामेकल्याण उपकेंद्राच्या पहिल्या टप्याचे बांधकाम
*मुलीच्या वसतीगृहाचे बांधकाम
*आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतीगृहाचे बांधकाम
*नवीन परीक्षा भवनाचे बांधकाम
*ग्रीन टेक्नॉलॉजी इमारतीचे बांधकाम