यूपीएससीच्या परीक्षेत इंग्रजीचे हिंदीत अनुवाद करण्याच्या प्रश्नासंदर्भात कोणती प्रणाली वापरली जाते त्यासंदर्भातील माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. उमेदवारांना अनुवादित प्रश्नासंदर्भात अडचणी येऊ नये यासाठी ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भूगोल, प्रशासन, इतिहास, व्यापार, दूरसंपर्क या विषयांतील हिंदी आणि अन्य भाषांतील शब्दांचे अर्थही या संकेतस्थळावर देण्यात आलेले आहेत. ‘वैज्ञानिक आणि तांत्रिक पारिभाषिक आयोगा’कडून (सीएसटीटी) काही पारिभाषिक शब्दांचे अर्थ मागविण्यात आले असून, ते प्रसिद्ध करण्यात आले. हिंदी अनुवादाच्या मुद्दय़ावर यूपीएससीने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने मागणी केल्यानंतर ही माहिती ऑनलाइन करण्यात आली. प्रश्नांचे हिंदीत अनुवाद करताना काही विसंगती आढळल्याच्या तक्रारी अनेक उमेदवारांनी केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Nov 2014 रोजी प्रकाशित
यूपीएससी परीक्षा : भाषांतराच्या प्रश्नांची माहिती ऑनलाइन
यूपीएससीच्या परीक्षेत इंग्रजीचे हिंदीत अनुवाद करण्याच्या प्रश्नासंदर्भात कोणती प्रणाली वापरली जाते त्यासंदर्भातील माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे.
First published on: 13-11-2014 at 05:59 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upsc puts up reference details online