वाढवण्यासाठी यूजीसीचे प्रयत्न
महिलांचा उच्च शिक्षणातील प्रशासकीय कामकाजातील आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढावा यादृष्टीने आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पावले उचलली असून त्यासाठी यूजीसीने ‘कपॅसिटी बिल्डिंग फॉर वुमेन मॅनेजर्स इन हायर एज्युकेशन’ ही योजना तयार केली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अकराव्या पंचवार्षिक योजनेचा सध्या शेवटचा टप्पा आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत विद्यापीठातील आणि पर्यायी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील प्रशासकीय कामकाजामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी यूजीसीने विद्यापीठांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. या योजनेअंतर्गत विद्यापीठांनी महिलांसाठी कार्यशाळा, व्याख्याने अशा उपक्रमांचे आयोजन करायचे आहे. विद्यापीठांना या योजनेअंतर्गत ११ कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. याशिवाय महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढावा या दृष्टीने यूजीसीच्यावतीनेही महिला अधिकाऱ्यांसाठी कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. नाथीबाई ठाकरसी महिला विद्यापीठ या योजनेच्या समन्वयाचे काम पाहात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 7th Nov 2012 रोजी प्रकाशित
निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग
महिलांचा उच्च शिक्षणातील प्रशासकीय कामकाजातील आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग वाढावा यादृष्टीने आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पावले उचलली असून त्यासाठी यूजीसीने ‘कपॅसिटी बिल्डिंग फॉर वुमेन मॅनेजर्स इन हायर एज्युकेशन’ ही योजना तयार केली आहे.
First published on: 07-11-2012 at 12:18 IST
मराठीतील सर्व के.जी. टू कॉलेज बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Women involvement in decision making process