News Flash

आपत्ती व्यवस्थापनाची कोल्हापुरात चाचणी

शोध व बचाव कार्यासाठीच्या लागणाऱ्या आवश्यक साहित्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली असून शोध व बचाव कार्यासाठीचे लागणारे साहित्य आज पंचगंगा नदीकाठी  ठेवण्यात आले.

उन्हाचा तडाखा कमी होऊन पावसाची चिन्हे दिसू लागली असून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या कामाला लागले आहे. या अंतर्गत सोमवारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने पंचगंगा नदीमध्ये मोटरबोटीचे प्रात्यक्षिक व चाचणी घेण्यात आली.

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्यावतीने संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आणि सजग ठेवण्यात आल्या असून आपत्ती काळात करावयाच्या उपाययोजनांमध्ये शोध आणि बचावकार्य महत्त्वाचे असून आज यातील मोटारबोटची पंचगंगा नदीत चाचणी घेण्यात आली.

तसेच शोध व बचाव कार्यासाठीच्या लागणाऱ्या आवश्यक साहित्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. हे साहित्य आज पंचगंगा नदीकाठी चाचणीसाठी ठेवण्यात आले.

या प्रात्यक्षिकावेळी उपविभागीय अधिकारी प्रशांत पाटील आणि तहसीलदार डॉ. योगेश खरमाटे,   निवासी नायबतहसीलदार अनंत गुरव, महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 2:00 am

Web Title: disaster management test in kolhapur
टॅग : Kolhapur
Next Stories
1 कोल्हापुरातील पाणीटंचाई तीव्र
2 सख्ख्या भावांवर हल्ला; एक ठार, एक जखमी
3 डोक्यात दगड घालून हॉटेल कामगाराचा खून
Just Now!
X