ज्या विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी मिळवली त्याच शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होण्याचा मान डॉ. दिगंबर तुकाराम तथा डी. टी. शिर्के यांना मंगळवारी लाभला. शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी त्यांची नियुक्ती केल्याची घोषणा राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी केली. पाच वर्षांच्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचा कार्यकाळ १७ जून रोजी संपल्यामुळे कुलगुरुपद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांचेकडे विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. नवीन कुलगुरू निवडीसाठी संरक्षण संशोधन व विकास विभागाचे सचिव डॉ. जी. सतीश रेडडी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नेमण्यात आली होती.

Neha Hiremath murder case to be transferred to CID
धारवाड हत्येचा तपास सीआयडीकडेच विशेष न्यायालय स्थापण्याची कर्नाटक मुख्यमंत्र्यांची घोषणा, मुस्लीम संघटनांकडून तीव्र निषेध
Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
How many candidates appeared in the last offline set exam The set will be held twice a year
शेवटच्या ऑफलाइन सेट परीक्षेला किती उमेदवारांची उपस्थिती? सेट वर्षातून दोनवेळा होणार?
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान

डॉ. शिर्केनी मारली बाजी

डॉ. जी. सतीश रेडडी समितीने १६९ उमेदवारांमधून २५ जण निवडले होते. त्यातून अंतिम पाच जण मुलाखतीसाठी पात्र ठरले होते. त्यातून शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी डॉ. शिर्के यांनी बाजी मारली. ५३ वर्षीय डॉ. शिर्के यांनी शिवाजी विद्यापीठातून सांख्यिकी विषयात पदव्युत्तर पदवी तसेच पीएचडी प्राप्त केली आहे. त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासन क्षेत्रात व्यापक अनुभव आहे.

सर्व घटकांसमवेत काम करण्यावर भर – कुलगुरु डॉ. शिर्के

अध्ययन केलेल्या विद्यापीठात कुलगुरुपदाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे विद्यापीठाशी निगडित विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थाचालक, सेवक वर्ग अशा सर्व घटकांना सोबत घेऊन कामकाज करणार आहे. इथे मला कोणी नवीन नाही आणि मी कोणाला नवीन नाही त्यामुळे काम करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांमध्ये विद्यार्थी हितासाठी ज्याबाबी गृहित धरल्या आहेत, त्याची उत्तमरित्या अंमलबजावणी करून शिवाजी विद्यापीठाचा लौकिक वाढवण्याचा प्रयत्न राहील. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही अशा पद्धतीने परीक्षा, प्रवेश याचे नियोजन केले जाईल, असे नूतन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले.