07 April 2020

News Flash

एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळातून काढून टाका – चव्हाण

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाउद इब्राहम याचे फोनवरून बोलण्याचा आरोप हा प्रकार गंभीर आहे.

पृथ्वीराज चव्हाण

महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाउद इब्राहम याचे फोनवरून बोलण्याचा आरोप हा प्रकार गंभीर आहे. राष्ट्राच्या सुरक्षिततेशी निगडित हा मुद्दा असल्याने केंद्रीय गृहमंत्र्यांनी याची चौकशी करावी, त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी येथे पत्रकार परिषदेत केली.
भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील भूखंड संपादित करण्याची खडसे यांची कृती बेकायदशीर आहे. या जमिनीची मालकी एमआयडीसीची असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. खडसे यांनी मंत्रिपदाच्या अधिकाराचा गरवापर करून जागा बळकावली आहे.
दरम्यान डॉ. दाभोलकर, पानसरे यांच्या खुनाचा कट रचल्याच्या संशयाची सुई सनातन संस्थेवर आहे. मी मुख्यमंत्री असताना या संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती. याबाबतचे पुरावे दिले असतानाही केंद्र शासन सनातन संस्थेबाबत मवाळ दिसत आहे. या संस्थेवर बंदी घातली नाही, तर आणखी किती खून होतील असा प्रश्न उपस्थित करून त्यांनी केंद्र शासनाच्या अखत्यारीत सनातनवरील बंदीचा विषय असल्याने त्यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2016 2:12 am

Web Title: prithviraj chavan comment on eknath khadse
Next Stories
1 घरावरील मोर्चामुळे चंद्रकांत पाटील त्रस्त
2 महाधिवक्त्यांच्या भूमिकेबाबत एकीकरण समितीकडून साशंकता
3 इचलकरंजीत डेंग्यूचा फैलाव
Just Now!
X