कोल्हापूर जिल्ह्यत गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रविवारी थोडी उसंत घेतली.

मात्र राधानगरी धरणातून मोठय़ा पाण्याचा विसर्ग कायम असल्याने जिल्ह्यातील पूर परिस्थिती काहीशी गंभीर बनत चालली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत रविवारी तब्बल १ फूट ३ इंचाने वाढ होऊन नदीची पाणी पातळी ४४.९ इंचावर पोहोचली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यतील ५० हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून पन्हाळा तालुक्यातील २०, शाहूवाडी १३, गगनबावडा ३, राधानगरी २, तर गडिहग्लज परिसरातील २ गावांचा समावेश आहे, तर ५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले.

धरणातून विसर्ग वाढला

राधानगरी धरणातून वीज गृहातून २२०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर कासारी धरणातून ३ हजार ९९७, कुंभी धरणातून ९५० वारणा धरणातून २५ हजार ६७० असा विसर्ग सुरू आहे. धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.