News Flash

कोल्हापुरात राष्ट्रवादीचा काँग्रेसला पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व १५ नगरसेवक महापौर निवडीच्या वेळी उपस्थित राहून काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व १५ नगरसेवक महापौर निवडीच्या वेळी उपस्थित राहून काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करतील. एकही नगरसेवक अनुपस्थित रहणार नाही. किंवा भाजपच्या उमेदवाराला मतदान करणार नाही, असे राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात नवनिर्वाचित १५ नगरसेवकांची बठक मुश्रीफ यांनी घेतली. महापालिकेतील राष्ट्रवादीचा गट तयार करण्याबाबत व नगरसेवकांच्या कागदपत्रांची पुर्तता करण्याबाबत मार्गदर्शन प्रा. जयंत पाटील यांनी केले. यामध्ये विधिनियम घटना, नगरसेवकाचे वर्तन, याबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल असे सांगितले व गटनेता निवडण्याचे अधिकार आमदार मुश्रीफांना देण्यात आले.
१६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महापौरांच्या निवडीसाठी सर्वानी उपस्थित रहावे, पक्षाने घेतलेल्या भूमिकेवर ठाम रहावे व आपले कर्तव्य बजावावे. भाजप-ताराराणी आघाडीकडून गरहजर ठेवण्याबाबत प्रयत्न होण्याची शक्यता आहे. यासाठी कोणी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास त्वरित पक्षाचे नेते जयंत पाटील, लाटकर यांच्यासह माझ्याशी संपर्क साधावा, असे सांगून मुश्रीफ यांनी महापौर निवडीचे मतदान हात वर करून होणार आहे. त्याचे चित्रीकरण होणार आहे. पक्षाने व्हीप जारी केला व नगरसेवकाने उलट मतदान केले, तर पद रद्द होऊन बदनामी होऊ शकते. याची दखल घ्यावी.
राष्ट्रवादीकडे उपमहापौरसह काही पदे मिळणार आहेत. पक्षाकडे केवळ १५ नगरसेवक असल्यामुळेच पाच वर्षांत सर्वाना पदे मिळणार. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. म्हणून शपथ घेऊन पक्षाच्या भूमिकेशी ठाम रहावे व जनतेची सेवा करावी. उपमहापौर पदाचे नाव निश्चित करण्यासाठी मंगळवारी सर्वाच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्वानी एकत्र जाऊन उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना मुश्रीफ म्हणाले, की राष्ट्रवादीच्या एकाही नगरसेवकाला भाजपबरोबर जाण्याची इच्छा नाही. त्यामुळे सर्व नगरसेवक काँग्रेसच्या उमेदवारास मतदान करतील. राजेश लाटकर यांनी स्वागत केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2015 2:50 am

Web Title: support to congress by ncp
Next Stories
1 समीर गायकवाड १७ रोजी त्याची बाजू मांडणार
2 पंढरपूर मंदिरातील खासगीवालेंचा पूजेचा मान संपुष्टात
3 दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची लगबग
Just Now!
X