कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या २२० माजी नगरसेवकांनी बुधवारी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना जाहीर पाठिंबा दिला. आज न्यू पॅलेस इथं या सर्व माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी कोल्हापूरचा पुरोगामी आवाज लोकसभेत पाठवण्याकरिता शाहू महाराजांना मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धार उपस्थित माजी नगरसेवकांनी केला. या बैठकीत आ.सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ.जयश्री जाधव, आ. जयंत आसगावकर, माजी आ. मालोजीराजे छत्रपती, काँग्रेसचे निरिक्षक पुरुषोत्तम दळवी हे देखील उपस्थित होते.

कोल्हापूरचा पुरोगामी आवाज लोकसभेत पाठवण्याकरिता श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींना मताधिक्यानं विजयी करण्याचा निर्धारही या बैठकीत माजी नगरसेवकांनी व्यक्त केला. या बैठकीला एकूण १७ माजी महापौर उपस्थित होते. यावेळी बोलताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी, नगरसेवक हे प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रतिनिधित्व करत असतात. शहराच्या विकासामध्ये नगरसेवकांचे योगदान मोलाचं असतं. त्यामुळं येणाऱ्या काळात सर्वजण मिळून शहराचा विकास करुया. सर्वांनी एकत्र मिळून शहराचे प्रश्न सोडवूया. शिक्षण, क्रीडा यासाठी केंद्राकडून भरिव निधी मिळवण्यासाठी आपणं काम करू, असं आवाहनही यावेळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी केलं. यावेळी २२० माजी नगरसेवकांनी एकत्र येतं पाठींबा जाहिर केल्यानं श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींनी सर्वांचे आभार मानले.

Thane district candidates withdraw, candidates election Thane, Thane,
ठाणे जिल्ह्यात ९० उमेदवारांची निवडणुकीतून माघार, जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur total 717 candidates in arena with fadnavis and bawankule
फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात
Raigad seven constituencies , Raigad ,
रायगडमधील सात मतदारसंघांत ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात
Vasai Nalasopara Constituency, Vasai Nalasopara latest news, Vasai Nalasopara Constituency candidates,
वसई नालासोपारा मतदारसंघातून १९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
candidates Bhayander, Rebellion BJP,
भाईंदरमध्ये १७ उमेदवार रिंगणात, ६ जणांची माघार, भाजपमधील बंडखोरी शमली, गीता जैन यांना ‘फलंदाज’ चिन्ह
nagpur in seven constituencies After 77 candidates withdrew 102 candidates remain
यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…
maharashtra vidhan sabha election 2024 bjp candidate sumit wankhede contest polls from arvi assembly constituency
Bjp Candidate In Arvi Assembly Constituency : भाजपचा राज्यातील सर्वात ‘लाडका’ उमेदवार, त्याच्यासाठी वाट्टेल ते

आणखी वाचा-कोल्हापूर : अल्पवयीन मुलीला लाखाला विकले; आईसह तिघेजण अटक

यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले, माजी नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे पुरोगामी कोल्हापूर शहर श्रीमंत शाहू महाराज छत्रपतींच्या पाठी मागे खंबीरपणे असल्याचं आज स्पष्ट झालंय. आपण सर्वजण एकदिलानं महाराजांच्या मागे आहात. ही ताकद कायम ठेवूया असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. प्रत्येकानं आपल्या प्रभागातून मत्ताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करा. प्रभागातील सभेचं नियोजन तूम्ही करा. प्रभागात महिलांच्या बैठका घ्या. अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. शिवाय ही उमेदवारी आपल्या घरची आहे. आपला कोल्हापूरचा हा विचार दिल्लीत पाठवायचा आहे. यासाठी माजी नगरसेवकांनी आपल्या प्रभागात नियोजन करावं, असं आवाहनही त्यांनी केलं.