scorecardresearch

कोल्हापूर : गुंतवणुकदारांना लाखोंचा गंडा ; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल

गुंतवणुकीवर भरभक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी पाच जणांविरोधात येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोल्हापूर : गुंतवणुकदारांना लाखोंचा गंडा ; ५ जणांविरोधात गुन्हा दाखल
( संग्रहित छायचित्र )

गुंतवणुकीवर भरभक्कम परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणी पाच जणांविरोधात येथील शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये विश्वास निवृत्ती कोळी (वय ४५, रा. बावची, ता. वाळवा) याचा समावेश आहे.विश्वास कोळी याने ग्रोबज ट्रेडिंग सर्विसेस नावाची कंपनी सुरू केली होती. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास १० महिन्यात १५ टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवून दाखवले गेल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील अनेकांनी त्याच्याकडे लाखो रुपयांची गुंतवणूक केली होती. तथापि त्यामध्ये फसवणूक झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी तक्रार करण्यास सुरुवात केली आहे.

तक्रारी देण्याचे आवाहन
याप्रकरणी रघुनाथ शंकर घोडके (हारपवडे, ता. पन्हाळा) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यामध्ये विश्वास कोळी, उज्वला शिवाजी कोळी, सौरभ कोळी, सोमनाथ मधुसूदन कोळी, स्वप्निल शिवाजी कोळी यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी अद्याप कोणाला अटक केलेली नाही. फसवणूक झालेल्यांनी तक्रारी देण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी शनिवारी केले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या